YMCA

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या घराजवळ एक YMCA आहे. बहुतांश सबर्बन पालकांप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी मुलांना पोहायला शिकवायला नेतो. ( नूतन समर्थ आणि तनुजा समर्थ यांना शिकवून मग आमच्या सारख्यांना पोहायला शिकवणारे भिडे सर आणि छोट्या शाळेची विहीर ज्यांच्या मालकीची होती,ते ( परांजपे बहुतेक) मला क्षमा करतील. )
तिथे काउंटर वर कार्डं तपासतात त्या जागे पाशी काही टेबल खुर्च्या आहेत, एक दोन vending machines आहेत. बरेच पालक तिथे बसून पेपर वाचत असतात. तिथेच लायब्ररीत असतात तशा पुस्तकांच्या ट्रॉली आहेत. येणारे जाणारे आपल्याला नको असलेली पुस्तकं तिथे ठेवतात. ज्याला कोणाला हवी असतील त्याने/ तिने ती घेऊन जायची. वाचून परत केलीच पाहिजेत असा आग्रह नसतो. मी जेम्स फ़्रे चं पुस्तक तिथनंच आणून वाचलं. तिथुन मिळालं म्हणून Nanny diaries सुद्धा वाचलं. काल तिथे Katharine Graham चं आत्म चरित्र मिळालंय. ते मात्र परत करणार नाहिये मी.
गोष्टी पूर्ण करायच्या आहेत म्हणून फक्त पहिली पंचवीसेक पानं वाचली काल. गोष्टी पूर्ण झाल्या की इथे त्या पुस्तकाबद्दल लिहीन.

विषय: 
प्रकार: 

शोनु,
नमस्कार..
मी मायबोलीवर नविन आहे... अधुन मधुन पुर्वी टाकलेल्या कथा वाचत असते.
आषाढ महिन्यातल्या कथा वाचत असताना " एका वर्षाची गोष्ट " ही कथा वाचली. खुप आवड्ली पण २८ जुलॅ ची शेवट्ची पोस्ट वाचली आणि नन्तर कथा सापडली नाही. अजुन अपुर्ण आहे का? नसल्यास क्रुपया लिन्क द्यावी.
पुर्ण वाचल्याशिवाय चॅन पड्णार नाही, म्हणुन ही विनन्ति!

सुप्रिया.