स्फुट - नेहमीप्रमाणेच

Submitted by बेफ़िकीर on 30 January, 2018 - 12:22

स्फुट - नेहमीप्रमाणेच
====

आज तू नेहमीसारखीच एक कविता वाचलीस....
नेहमीप्रमाणेच त्या कवितेत
तुडुंब स्त्रीवाद दिसला....

प्रत्येक पावलाला झालेले शोषण....
नाकारल्या गेलेल्या संधी....
संधीच्या बदल्यात आलेले प्रस्ताव....
चळलेल्या नजरा
गळणारी लाळ
धक्के, स्पर्श
घुसमट, स्फोटक धुमस
सगळे होते त्यात....

थोडेसे शब्द वेगळे,
एरवीपेक्षा वेगळ्या अवयवांचे उल्लेख,
थोड्या निराळ्या वखवखीच्या नोंदी
वगैरे

आणि नेहमीप्रमाणेच....
पुरस्कारही तुलाच मिळाला!!!!

नेहमीप्रमाणेच,
मला आनंदही झाला!!

वाईट ह्याचे वाटले
की पुरस्कार स्वीकारताना तू
पुरस्कार देणार्‍या महान हस्तीकडे
ज्या लाळघोटेपणाने पाहत हसलीस
जे आवाहन बरसवलेस नजरेतून
जी देहबोली वापरलीस
जे मुरके मारलेस

अंहं....

तूही तसलीच निघालीस....
नेहमीप्रमाणेच!!!!

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदिच वास्तविक.
पुरूष बेताल वागतो असं जनरलायझेशन केलं जातं.
कधी कधी स्त्रिया पण सटली असं वागत असतात.