संतसूर्य, साहित्यसंमेलन आणि प्रायश्चित्त

Submitted by संकल्प द्रविड on 18 March, 2009 - 23:59

santasurya.jpg

'संतसूर्य तुकाराम' या तुकारामांवरील चरित्रात्मक कादंबरीतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरावरून उठलेल्या वादंगामुळे आणि भावना दुखावल्याच्या कांगाव्याआडून वारकरी संघटनांनी राबवलेल्या दबावतंत्रामुळे कादंबरीचे लेखक आनंद यादव यांना ही कादंबरी मागे घेत क्षमा याचावी लागली. 'मटा'वर काही आठवड्यांपूर्वी झळकलेल्या कादंबरीतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरात निंद्य असं खरं तर काही नव्हतं. भौतिक सुखलोलुपतेत अडकलेल्या सामान्य माणसापासून संतत्वापर्यंत उत्क्रमत गेलेल्या तुकारामांच्या मनात कुठल्याशा प्रसंगी स्वतःच्या पूर्वायुष्यातील सुखलोलुपतेची, भरकटलेपणाची जाणीव उमटते अशा स्वरूपाचं ते लिखाण होतं. पण त्यावरून 'जेम्स लेन' प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. देहूच्या संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या विश्वस्त समितीने 'तुकाराम खतरेमे' अशी जिहादी हाळी दिली आणि देहूत बंद पाळला गेला. भावना दुखावण्याच्या निमित्ताने मराठा महासंघानेही वारकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आनंद यादवांनी आगामी महाबळेश्वर साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्यास साहित्यसंमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. जेम्स लेन प्रकरणात हात असलेल्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड इत्यादींच्या मांदियाळीत मोडणार्‍या महासंघाने अशी भूमिका जाहीर करणं हे सूचक आहे. दरम्यान यादवांचा पुतळा प्रतीकात्मक निषेध म्हणून जाळण्यात आला. यादवांनी या दबावापुढे क्षमा मागत पुस्तक मागे घेणार असे जाहीर केले. पण निषेधकर्त्यांचं एवढ्यानं समाधान झालं नाही. त्यांना यादवांकडून जो संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा हवा होता, तोही अखेरीस परवा मिळाला. आता वारकरी संघटनांनी एक नवीन मागणी केली आहे : 'खास' संतसाहित्यविषयक सेन्सॉर समिती स्थापून संतचरित्रावरील पुस्तके प्रकाशण्याआधी संमत करवून घेण्याची!

गुलमोहर: 

अतिशय समर्पक....मस्त.

चित्र आणि भाष्य - दोन्ही सुरेख !

Pages