कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ७ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
मागच्या वर्षी पण होते
मागच्या वर्षी पण होते संयोजनात, पुन्हा संयोजक बनायला आवडेल, अर्थात नवीन लोकं असतील तर नाही चान्स दिला तरी चालेल.
ह्या सालातला इशय काय आसंन
ह्या सालातला इशय काय आसंन ह्ये जराशिक लौकर सांग्श्यान तं उल्संक खरडाया मलासुदिक जमू शक्त्येय.
संयोजक बन्नं ह्ये काय आप्ल्यच्यानि न व्हन्यासारखं ह्ये. तव्हा आदुगरच 'स्वारि' मागुन ठुतो.
मला आवडेल.काय काय करायचं असतं
मला आवडेल.काय काय करायचं असतं ते सांगा.मी नवीन आहे.
मला आवडेल.काय काय करायचं असतं
मला आवडेल.काय काय करायचं असतं ते सांगा.मी नवीन आहे.
प्राजक्ता_शिरीन, shamika,
प्राजक्ता_शिरीन, shamika, दिप्ती वैद्य, आपले संयोजन मंडळात स्वागत आहे. कृपया खालील धाग्यावर भेट द्या.
https://www.maayboli.com/node/65178
अजूनही मायबोलीकर हवे आहेत सम्योजनासाठी. कृपया तुमचा सहभाग लवकर कळवा.
आणखी मेंबर लागणार असतील तर
आणखी मेंबर लागणार असतील तर मलाही आवडेल संयोजनात काम करायला
छान. शुभेच्छा. संयोजनाला
छान. शुभेच्छा. संयोजनाला माझा नेहमीसारखाच पास, मात्र मराठी भाषा दिनाचे उपक्रमाबाबत उत्सुक आहे. आशा करतो माझ्यासारखे जेमतेम मराठी जमणारे पण आवड आणि प्रेम असणार्यांनाही भाग घेता येईल असा एखादा हलका फुलका उपक्रम असावा
मले बी घ्यावा तुमच्या संग
मले बी घ्यावा तुमच्या संग
आणखी मेंबर लागणार असतील तर
आणखी मेंबर लागणार असतील तर मलाही आवडेल संयोजनात काम करायला
आणखी मेंबर लागणार असतील तर
आणखी मेंबर लागणार असतील तर मलाही आवडेल संयोजनात काम करायला
युवराज्ञी, madhusudan,
युवराज्ञी, madhusudan, स्वप्नाली,
आपले संयोजन मंडळात स्वागत आहे. कृपया खालील धाग्यावर भेट द्या.
https://www.maayboli.com/node/65178
मला पण आवडेल
मला पण आवडेल
मला आवडेल
मला आवडेल
यंदा तरी जमणार नाही.
यंदा तरी जमणार नाही.
उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!
संयोजक खूप झाले, वाचक शोधा
संयोजक खूप झाले, वाचक शोधा आता.
संयोजक मंडळाला शुभेच्छा
संयोजक मंडळाला शुभेच्छा