ते तिघे - प्यार,इश्क और मोहब्बत (अंतिम)

Submitted by अजय चव्हाण on 21 January, 2018 - 03:58

"ते तिघे"

भाग 3

2 जानेवारी 2010.

आज जयेशला ऑफिसला जायचा खुपच कंटाळा आला होता.
एकतर ख्रिसमसपासून ते कालपर्यंत ऑफिसला सुट्टी होती आणि आज इतक्या दिवसानंतर त्याचा ऑफिसला जायचा मुडच नव्हता तरीही रडतखडत जावं लागणारच होतं आणि आज काय तर म्हणे,सिक्रेट सांता आहे...

ख्रिसमस संपल्यानंतर कसलं डोंबल्याच ख्रिसमस सांता??
ह्या आमच्या वैशाली मॅडमलादेखिल काही कामधंदे नाहीत.
काय पण एक एक खुळ काढत बसते.
ते अमेरिकन तिकडे ख्रिसमसला सिक्रेट सांता खेळो नाहीतर अजुन काय खेळो,आम्हाला कशाला हा ताप ?? त्यांनी तिकडे शेण खाल्लं की आपणही खायचं का??

बरं ख्रिसमसंपण संपली आता मग हा सगळा उपद्व्याप कशासाठी??

ऑफिसला सुट्टी होती त्यात आमचा काय दोष??
बरं पंधरा दिवस मी ट्रेनिंगला बॅगलोरला होतो.ह्या दिवसांत कुठले नविन जाॅईनज आले मला काय माहीत?
मी आज येणार आहे म्हटल्यावर लगेच मलाही सामील करण्यात आलं ह्याला काय अर्थ आहे आणि खेळ काय तर म्हणे,
सिक्रेटली सगळ्याच्या नावाच्या चिठ्ठ्या उडवायच्या.
ज्याला ज्याच नावं आलं त्याने त्या व्यक्तीला गिफ्ट घ्यायचं म्हणजे खिशालापण पाचशे हजारांचा बांबू.

"अरे बापरे मी अजून गिफ्टपण नाय घेतलं.."

"मला कुठलं नाव आलं होत बरे??नविन जाॅईन झालीय वाटतं?

"छे! हे काय नाव आहे?काय म्हणे तर "ऑफेलिया डिसोजा."

मुलीच नाव आहे की, कुठल्या कार्टून कॅरेक्टरच नाव आहे हेच कळतं नाही.

मी तर आजच येतोय ना..तिला अजून बघितलंच नाही मी...
च्यायला जिला मी ओळखत नाही...जिला मी कधी बघितलं नाही..तिला काय गिफ्ट घ्यायचं??...थाॅमस वैगेरे असं काही नाव आलं असतं तर वाईनच्या बाटलीत खुष झाला असता..
हिला घ्यायचं दगड??

मनातल्या मनात विचार करत असताना समोरच दिसत असलेल्या गिफ्टशाॅपसमोर जयेशने बाईक पार्क केली.

"च्यायला..इतके शोपिस..इतके टेडी बिअर..मरू दे...स्वस्तातला घेऊ...."

"नाही नको...कुणी का असेना गिफ्ट द्यायचं तर मनापासून..
नाहीतर नाही"

"काय घेऊ??काय घेऊ?"

"शांत हो जयेश ....शांती...शांती.. रंग दे बंसती..."

चल एक ट्रीक वापरू....

"समजा..तुझी कुणी जी.एफ.असती तर काय दिलं असंतं.??
व्हू नाॅज..चांगलं गिफ्ट दिलं तर इंप्रेशन तरी पडेल आणि थर्टि फस्टला काय ठरवलं होतं आपण.??"

"एक तरी जी.एफ पटवायची त्या एकीमध्ये हिच लक लागलं तर काय वाईट...??"

"छे! आयला गिफ्ट काही सुचत नाही बूवा..."

"मुलीना काय आवडतं...टेडी बिअर..का राॅमेंटीक शोपिस??"

"ख्रिश्चन आहे म्हटल्यावर हिला लहानपणापासूनच्या बर्थ डे ला टेडी बिअर आले असणार."

त्यापेक्षा नकोच ती अवजड ब्याद...न्यायलाही त्रास...

"हा इथे जाम भारी भारी राॅमेंटीक शोपिस आहे...आयला हा मधला जाम भारी आहे...अरे हा कोपर्यातला तर त्यापेक्षा भारी आहे.."

"ओह गाॅड! सो मच कंन्फुजन.....अब मुझे सिर्फ रजनीकांतही बचा सकता है..."

चल एक काम करू...

घट्ट डोळे मिटू..उघडल्यानंतर ज्यावर पहिली नजर पडेल..
ते घेऊ...

एक....दोन..तीन...स्टार्ट...

अरे वा...शाब्बास जयेश...काय चाॅईस आहे...

अरे ही तर स्वप्नपरीच..काय जबरदस्त कलाकृती आहे यार..
काय करतेय ही?? ..हा...ही फुलपाखरू पकडतेय...
हा बघ तो फुलपाखरू...कलर तर इतका मस्त दिलाय की, ते फुलपाखरू जिवंतच वाटतयं... इथे खाली काय लिहलयं बरे...

" आय वाॅन्ट टु फ्लाय...जस्ट लाईक यु...
अॅण्ड लिव्ह दी कलर्स ऑफ जाॅय बिंहाईंड मी..जस्ट लाईक यु..."

वा छान आहे...

"एक्सुजमी...हाऊ मच फाॅर धिसवन???

आला बघ तो पारशी.....आता इतकं हात दाखवून स्पष्ट सांगितलं तरी थेरडा विचारतो. कसा..??

"डिकरा...धिसवन ना? 800 रूपयीज..."

"शी! ही काय भाषा आहे ह्यांची....डिकरा....

आमच्या गावी केस पिकलेल्या माणसाला "डोकरा" म्हणतात.
हे काय डिकरा नि फिकरा..:

"ते काही नाही 500 ला द्यायचं असेल तर द्या..."

"पाचशेच रूपयीच...अरे डिकरा...कशाला तु गरीबाची थट्टा करतेस...दहा रूपये फक्ती आम्ही कमवते...आम्हाला कमवू दे..."

आयला.. म्हातार्याने मराठी व्याकरणाचा लिंगबद्दलच केला..

"नाय जाऊ द्या मग...माझं एवढच बजेट आहे.."

आता बघ कसा लाईनीवर येईल...

" अरे डिकरा... मी काय म्हणते चल जाऊं धे. तुझी नको माझी नको सहाशे दे..."

सहाशे...वाईट नाही..जाऊ दे चल .ऑफिसलाही उशिर होतोय जायला..आणि अजुन बार्गेनिंग करत बसलो तर और लेट हो जायेगा.

"ठीक आहे..प्राईस टॅग काढून मस्त पॅक करून द्या..."

"पेपरचे पाच रूपयीच..पॅक करायचे दहा रूपयीच..आणि बॅग पायजे अशेल तर टोटल 20 रूपयीच अजून लागतील..."

ठीक आहे..द्या लवकर...

.........................................................................................................................................................

हाश हुश पोहचलो एकदाच ऑफिसला....

"वैशालीमॅडम गेम कधी आहे??"

"दुपारी लंचनंतर ...का रे??"

"ते गिफ्ट आणलय ना जड झालय...एकदाच देऊन मोकळा होतो..."

"अरेरे...ते बघ त्या डेस्कवर ठेव सर्वांनी तिथेच ठेवलय..आणि पाॅकेटवर ज्याला द्यायचं आहे ना त्याच नाव लिह..."

"ऑके.. मॅडम.."

"ऐ शैल्या काय स्फेलिंग आहे रे हिच्या नावाची...

नक्की हीच ना ..ते मला असंच सांगितलं होतं..म्हणून एकदा कन्फर्म केलं..."

"ओह..हो..ऑफलिया नाव आलं तर ...लकी बास्टर्ड.."

"तु गप्प रे चमडीचोर...तुला काय नाव आलयं..??"

"अमला.."

" हा....हा....खि ...खी..खी....त्या काळया जाड्या हिंडीबाचं नाव आलं तुला....सो सॅड...पुअर बास्टर्ड..."

एकदाचा गेम सुरू झाला तर....

आयला मलापण गिफ्ट आलयं....हे चांगल आहे...
काय आलंय ते तर बघू....

अरे वा....मस्तच...वाॅलेट आणि परफ्युम ...परफ्युम महागातलं दिसतंय...सुवास खुप छान आहे...

बघू बाकीच्यांना काय मिळालयं...??

आयला..मलाच चांगलं गिफ्ट मिळालंय...कुणी दिलं असेल??

ते नंतर शैल्या सांगेलच..आपण जिला गिफ्ट घेतलयं तिची एक झलक तर बघू.. कशी दिसते ही ऑफलिया.. मॅरीड तर नाही ना....

च्यायला...काय रावस आहे रे हीतर. गिफ्ट आवडलं वाटतं तिला...आवडणारच....घेतलं कुणी??सहाशे वर्थ ईट आहेत हिच्यासाठी....

हिलाच पटवतो.. आमच्या दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणसारखा वाटेल नाही??
पुढे लग्न झालंच तर.....इसकी शक्कल और मेरी अक्कल लेके बच्चे पैंदा होंगे....
काय पोर होतील यार आमची...ब्यूटी विथ ब्रेन...
मग माझ्या बाईकवर पुढे ईशान व पाठीमागे ओफलियाच्या मांडीवर लिझी...ईशान आणि लिझी माझ्या होणार्या पोरांची नावे...

इथेच बघतेय...केस बरोबर आहेत ना...बघू दे एकदा...
अरे हीतर चक्क हसतेय.....

इथेच येतेय...लक्ष नको देऊ...हिला सगळेच अटेंशन देत असतील..

आय नीड टू परफॉर्म समधिंग डिफरंट....

"हॅलो...जयेश...." कसला आवज गोड आहे रे..
लता मंगेशकर फेल ....

"हॅल्लो...न्यू जाॅईनी???..." आता स्वतःच सगळं सांगेल बघ...
पिन बरोबर मारलीय..

"हो...हाय मी ऑफलिया तु जयेश आहेस ना..."

आयला हिला कसं माहीत..?? शैल्याने माझे किस्से सांगितले असतील हिला....फाटक्या तोंडाचा...

हो...तुला कसं कळलं??

एक स्मितहास्य....मिलियन डाॅलरवाली स्माईल..माधुरी फेल..
"तुझं नाव मला आलं होतं... तुझ्या हातातल मी दिलेलं.
गिफ्ट पाहील्यावर कळालं..."

"ओह हो...मस्त आहे हा...आवडलं आपल्याला...
थॅन्क्स...काय योगायोग आहे बघ..

तुझं नाव मला आलं होतं आणि माझं नाव तुला.. "

"अरे वा...दॅट सो नाईस...तु दिलेल गिफ्टपण छान आहे..
अमेंझिंग..माझ्या बीएफनेसुद्धा असं गिफ्ट मला कधी दिलं नव्हतं...."

"शिट.. खट्टाक खळ्ळ...आतमध्ये काहीतरी तडकलं...
वेल मला थोड काम आहे आपण नंतर बोलू...नाईस टु मिट यु..."

"सेम हिअर...बाय.."

........................................................................................................................................................

3 जानेवारी 2010

चुकुन राॅग नंबर लागला...होतं असं कधी कधी...
बट आय रिअली लव्ह हर यार...

काय दिसते...काय बोलते ...काय हसते...हिला फक्त मीच डिसर्व करतो..नाॅट दॅट स्टुपिड फॅलो....

कुछ तो करना पडेगा दया...

लव्ह कर..काय नको पण लवकर कर .

प्लान नं 1..

बीएफची इंन्फो काढायची...कुठे ना कुठे त्याने शेण खाल्लं असणार...सबुत मिलेगा तो बात बनेगी...
इसको हटा डाला तो लाईफ झिंगलाला....
फिर ब्रेकअप...वो लोनली मै लोनली...
सिंमथी...बाॅडींग ...गेन ट्रस्ट...प्रपोज...येस..
बात खतम...

प्लान नं 2..

फेंड्स..बेस्ट फेंन्डस...लव्ह हर विथ पॅशन...विदाऊट एक्सपेक्टशेन...

फिर सच्चे प्यार की जीत...

टाॅस....छापा आला तर प्लान 1 काटा आला तर प्लान 2...

टुक....काटा.....प्लान 2...

शिट....इन्सान प्यार मै पैसे के लिए धोका देते हुए सुना था..
आज पैसे ने प्यार के लिए धोका दिया....

........................................................................................................................................................

23 सप्टेंबर 2010..

नऊ महिने तिचा चांगला मित्र बनून राहीलो...रिस्पेक्ट कमवली..
तिच्या मनात घर केलं...
सगळं शेअर करायची मला ती..विश्वास कमवला....कधी ना कधी तिला कळलच असतं माझं प्रेम...पण सालं काल मी नेमकी स्वतःच्याच हाताने घाण केली...सगळं गेलं..जाॅबतर गेलाच ती पण गेली....

काल रात्री कंपनीच्या अॅन्युल फंक्शनला....
जरा जास्त झाली...आणि काय करून बसलो...
....
काल कंपनीचा अॅन्युल डे होता...
दारू बिरू सगळं होतं...रात्री डीजे लावला...सगळ्यांची पावले डीजेच्या तालावर थरकत होती....मला जरा जास्तच झाली होती...शैल्याने नको नको म्हणत असताना पाजली...
जसा काय स्पाॅनर त्याचा बापच होता....

मी पण स्टेजवर गेलो....माझा अंतरंगी डान्स बघून सगळे बाजूला झाले....डान्स कसला...हात पाय फक्त वाकडे तिकडे हलवत होतो मी... मग माझं फेवरेट गाणं लागलं ... रिमिक्स "मेरी मेहबूब कयामत होगी....आज रूसवा ..तेरे गल्लियो मे मोहब्बत होगी..."

काय चेव आला की, अंगात आलं होतं माझ्या...अजुनच थर्ड क्लास बेवड्यासारखा नाचायला लागलो...

कुणीतरी धरलं मला...मी वळून बघितलं...ऑफलिया मला ओढत होती..कदाचित माझा होत असलेला तमाशा तिला सहन झाला नाही...

मग...मी तिला सगळ्यासमोर लिप टू लिप किस केलं....

सट्टाक ....कानाखाली आवाज आला माझ्या ...सगळी दारू उतरली...पश्चाताप करायलाही वेळ नव्हता...ताड ताड करत निघून गेली ती..
गाण्याचे शेवटचे शब्द "मेरी मेहबूब कयामत होगी"

खरोखर कयामतच आली होती...

दुसर्‍या दिवशी मी रिझाईन केलं तिच्यासाठी...

कारण ती सोडून चालली होती...माझ्या चुकिची शिक्षा तिला का??

जाता जाता....तिला साॅरी बोलून सगळं मनातलं खरखर सांगितलं...मेलवरून...

रिप्लाय नाही आला...

व्हाॅटसअपवर ब्लाॅक.. फेसबुकवर ब्लाॅक...

सगळी दार बंद झाली.....

......................................................................................................

जयेशने उरलेली बाॅटल जोरात फेकून दिली...
खट्टाक खळ्ळ फुटण्याचा पुसटचा आवाज आला...
जयेश रडलेल्या सुरात गाण गात होता...

" मेरी मेहबूब कयामत होगी...आज रूसवा तेरी गल्लीयो मे ममोहब्बत होगी..."

तिघेही एकमेकांना घट्ट धरून रडत होते....
त्या दिवशी तिघांनी ठरवलं नसतं तर आज हे सगळं झालं नसतं...

बट होनी को किसने टाला है...
जो होता है अच्छे के लिए होता है.....

........................................................................................................................................................

19 ऑक्टोबर 2014...

आज डिडीएलजे सिनेमाला 20 वर्षे .. 1000 आठवडे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने राधीका आणि विश्वास ...शाहरूखच्या एका शोमध्ये भाग घेणार होते...
तेव्हाच विश्वास तिला तेच पान देऊन शाहरूख व अख्खा जगासमोर लग्नाला मागणी घालणार होता ...

कै.डाॅ.अरविंद जोशी ( राधीकाचा नवरा ) कामा रूग्णालयात डाॅक्टर होते. पुण्याला एका ऑपरेशनसाठी जात असताना अपघातात गेले..राधिका तीन वर्षांत विधवा झाली...
अरविंदकडून एक मुलगा पण आहे मोठ्या आवडीने तिने त्याच नावं विश्वास ठेवलं होतं...

राधिकाच्या आयुष्यात आता दोन विश्वास आहेत...

......................................................................................................................................................

12 ऑगस्ट 2013

टाईम्स च्या पहिल्या पानावर धक्कादायक बातमी आली...
"चीजवर्ल्ड" ह्या अमेरिकन कंपनीचे एकमेव भारतीय
बोर्ड ऑफ डायरेक्टर श्री. शरद सक्सेना यांचा त्यांच्या पत्नी डाॅलीबरोबर लग्नाच्या दोन वर्षांतच काडीमोड...

शरद सक्सेना रोज दुसर्या मुलीबरोबर त्यांच्याच घरात शय्यासोबत करतात...असा त्यांच्या पत्नी डाॅली यांनी आरोप ठेवला आहे....

काही दिवसानंतर.....

सचिन डाॅलीला त्याच्याच सायबर कॅफेत कुणी नसताना अतिक्षय रोमंटीक पद्धतीने वीलुकअप शिकवतोय..

पुढच्या महिन्यात कुठल्या तरी मोठ्या फाईव्ह स्टार हाॅटेलात त्यांच लग्न आहे म्हणे...

..........................................................................................................................................................

2 जानेवारी 2012

ओफलियालाला जयेशची खुप आठवण येतेय...
दोन वर्षांआधी ह्याच दिवशी जयेश आणि तिची पहिली चमत्कारीत भेट झाली होती...
तिच्या बी एफ ने तिला फसवलं होतं....बी एफनंतर तिच्या सगळ्यात जास्त जवळ कोण होतं तर तो जयेश होता...
नेहमी तिच्याबरोबर असायचा तो...तिला सांभाळयचा....
मान्य आहे त्याने चुक केली...ते पण दारूच्या नशेत..
मुद्दाम थोडी केलं त्याने...मी जात होते म्हणून स्वतःच 4 वर्षांच करिअर दावणीला लावून सोडून गेला.. साॅरीही बोलला...आणि मनातलं खरखुरं ही...

आजच्या जगात कोण भेटत असं..एकदम सच्चा असणारं...
दोन वर्षात कधी त्रास दिला नाही..आडून आडून माझी चौकशी करायचा फक्त....अजुनही करतो....तो अजुनही माझ्यावरच प्रेम करतो...
आज संध्याकाळी भेटते त्याला...शैल्याने त्याच्या नविन ऑफिसचा अॅड दिला होता...सहाला सुटतो तो...

रिकाम नाही जायचं...

जशी एक स्वप्नपरी होती...तसाच त्याच दुकानात ( बॅगेवर दुकानाच नाव आणि पत्ता होता)
तसाच एक राजकुमारदेखिल होता आणि त्याच्या खाली काय लिहलं होतं माहीतेय?

"आय कान्ट फ्लाय विदाऊट यू...कम अगेन..मेक मी फ्लाय..
जस्ट लाईक यु..."

समाप्त...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी तुमची लिखाणशैली बघून मला चेतन भगत आठवतो.
ती गोष्ट वेगळी की मी त्याचे अजून काहीच वाचले नाही. पण बहुधा तो असेच लिहित असावा.
तुम्हीही मोठ्या मोठ्या कथा लिहायला घ्या हळूहळू. एखादा चित्रपट निघेल वा असा एखादा सीन एखाद्या चित्रपटात वापरला जाईन Happy

चेतन भगतच्या स्टोरीज बोल्ड असतात...त्याच नेहमीचच ठरलेलं असतं..

नायकाला कृष्णाचचं एक नाव द्यायचं..
नायक आय आयटीत शिकायला तरी असतो किंवा इंजिनिअर तर नक्कीच असतो..

नायिकेच वर्णन झरीन खान किंवा अलिया भट्ट सारखं केललं असतं..

आणि कथेच्या शेवटी इंजिनिअर दुल्हनिया घेऊन गेलेला असतो..

त्यांचा हनिमूनचा कार्यक्रम आधीच गाडीत किंवा टेरेसवर पार पडलेला असतो हा भाग अलहिदा.

खुप छान.

आता संपूर्ण वाचली तेव्हा बरं वाटलं.शेवट गोड होईल असं अपेक्षित नव्हतं पण शेवट आवडला.

अशाच अजुन कथा येऊ द्यात. तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत खुप छान लिहता तुम्ही...पुलेशु.

ऋन्मेषशी सहमत. अगदी चेतन भगत नाही पण फिल्मी असतात कथा तुमच्या.
Not my type पण यांचा स्वतःचा वाचकवर्ग फॅन क्लब असतोच की; शक्यतो कॉलेजात जाणारा तरुण वर्ग वगैरे....
मराठी आंतरजालाचे सरासरी वय चाळीसच्या आसपास असेल त्यामुळे इथे जास्त प्रतिसाद मिळणार नाही. पण लिहित रहा.

तुमची ती पोत्यात घालून धु धु धुतला कथा फारच आवडलेली. मस्त फ्लो होता त्या लिखाणाला.

बादवे तुम्ही जे इंग्रजी संवाद शब्द लिहिता त्याचे उच्चार चुकीचे असतात. त्यावर अजून थोडी मेहनत घेऊन बरोबर उच्चार लिहिले किंवा सरळ इंग्रजीमधेच लिहिलं तर चालेल.

आणि हो प्रत्येकाचे नाव घेऊन धन्यवाद म्हणायची गरज नाही इथे Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अॅमी..

हो मलाही माहीतेय,माझ्या कथा फिल्मी असतात,अॅक्चुली मी सर्व प्रकारच्या कथा लिहल्या आहेत पण माबोवर फक्त फिल्मीच कथा टाकतो ..

मागे एक सत्यकथा टाकली होती तर त्यावरून इतका वाद झाला की, विचारायची सोय नाही मग विचार केला नकोच अशा सत्यकथा टाकायला इथे...परत आ बैल मुझे मार नको....

त्यापेक्षा एकाच वाचकगटाला धरून राहीलेलं बरं...

इंग्रजीबद्दल म्हणत असाल तर पुढे लिहताना काळजी घेईन..

एकदाच धन्यवाद केलं तर ती मला नुसती फाॅर्मलिटी केल्यासारखं वाटतं..प्रत्येकाच नाव घेऊन धन्यवाद केले तर त्या वाचकाला ही बरं वाटतं आणि ते त्यांचा वेळ काढून कथा वाचतात,प्रतिसाद देतात त्यामुळे प्रत्येक वाचक हा माझ्यासाठी महत्वाचा आहे...हेच वाचक असतात जे आमच्यासारख्या लेखकांना प्रोत्साहन देतात,चुका सांगतात एकूण काय तर लेखक म्हणून अजुन establish व्हायला मदत करतात आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तीगत आभार मानयला मी माझं कर्तव्य समजतो..

Mast. Khup chan khup avdali
Versatile writer ahes tu. Halu halu saglya katha vachnar ahe tujya.

>>>>>>>>>>> "नाही नको...कुणी का असेना गिफ्ट द्यायचं तर मनापासून..>>>>>>>> टाळ्या (धनु रास Happy )
>>>>>> काळया जाड्या हिंडीबाचं >>>>>>>> नाही आवडलं Sad
>>>>>>शिट.. खट्टाक खळ्ळ...आतमध्ये काहीतरी तडकलं...>>>>> हाहाहा
शेवट सुंदरच!!

@सामो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

माझी धनु रास आहे आणि कथेतला नायक आणि माझं रिअल कॅरेक्टर थोडस सेमच आहे..

काळ्या हिडिंबाबद्दल गमतीत घ्या बाकी मी हि बॉडीशेम विरोधात आहे.

Happy कुल!!!
अग्नी तत्वाच्या राशीना भेटवस्तू देण्यातून आनंद मिळतो जसे कर्क राशीला बचत करुन तसाच. पैकी धनु तर दिलदार गुरुची.

अप्रत्यक्षरित्या स्तुती केल्याबद्दल आभारी आहे..

@ प्राजक्ता - धन्यवाद. असाच लोभ असू द्या.

याचे आधीच भाग कुठे आहेत?

मी तुमच्या लेखनात जाऊन एक कथा वाचत होते इट जस्ट हॅपन्ड.. त्याचे पुढचे भाग कुठे आहेत.

प्रतिसादाबददल धन्यवाद रियाजी.

आधीच्या भागांची लिंक -

भाग एक : https://www.maayboli.com/node/64901

भाग दोन: https://www.maayboli.com/node/64989

इट्स जस्ट हॅपन्डचे पुढचे भाग लिहले होते पण माझ्या भाच्याच्या हस्ते अनावधानाने इथे प्रकाशित करायच्या आधीच डीलिट झाले..

सो आता पुन्हा लिहावं लागणारं आहे...वेळ मिळाला की, नक्की लिहेन..

तोपर्यंत असाच लोभ असू द्यावा.