Submitted by skyprince on 18 March, 2009 - 07:44
आता तळीरामाला
मार्ग कोणी दावा...
उघड बार देवा आता
उघड बार देवा.
पिते दारू डोळे मिटुनी
जात बेवड्याची,
मनी त्याच्या भीती का हो
नशा चढण्याची?
सरावल्या पायांनाही
कंप का सुटावा?
उघड बार देवा आता
उघड बार देवा.
रोज रात्री करतो देशी
बारची हा वारी.
घरी मात्र जाताना का
शोधी दिशा चारी?
बेहोश होई रोज करूनी
मदिरेची सेवा.
उघड बार देवा आता
उघड बार देवा.
रस्त्यावरूनी चालताना
मोजतो हा पावले.
झिंग चढल्यावाचून घरी
जाणे नाही भावले.
शेजा-याच्या दारातही अपुला
दरवाजा दिसावा.
उघड बार देवा आता
उघड बार देवा.
मिपावरील एका मित्रवर्याच्या सुचनेनुसार उघड दार देवा आता मधे दार ऐवजी बार ह शब्द जोडला. तुमच्या प्रान्जळ अभिप्रायाची वाट पाहत आहे.
गुलमोहर:
शेअर करा
चांगला
चांगला प्रयत्न .....पण ह्याचे मूळ गाणे जास्त आवडीचे असल्याने नाही आवडले !
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
अप्रतिम!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!
अशी कविता करण्याची कल्पनाच किती सुंदर आहे.
विडंबन फार छान साधल आहे.फारच विनोदी <<<<<
उत्तम
उत्तम प्रयत्न! काही ठिकाणी चालीत म्हणताना धावपळ होतेय एवढंच!
छान केलय
छान केलय विडंबन. अगदी चालीत छान बसतय.
ही कविता
ही कविता कदाचित मी आधी ऐकलेली आहे.. आम्ही ट्रिप ला वगैरे गेलो कि हमखास म्हणायचो... फक्त थोड्याफार शब्दांचा फरक असेल...
मला काही
मला काही फायदा नाही बंद काय आणि उघडे काय!
छान
छान प्रयत्न!!!
<<उघड बार>>
रस्त्यावर
रस्त्यावरूनी चालताना
मोजतो हा पावले.
झिंग चढल्यावाचून घरी
जाणे नाही भावले.
शेजा-याच्या दारातही अपुला
दरवाजा दिसावा.
---------------------------
वरील ओळी अशा लिहुन पहा...
रस्त्यावरूनी चालताना
मोजतो पाउले.
झिंग चढल्यावाचून घरी
जाणे न भावले.
शेजा-याच्या दारी अपुला
दरवाजा दिसावा.
एकंदरीत मला आवडले गाणे...
मला काही
मला काही फायदा नाही बंद काय आणि उघडे काय!>>
अहो आम्ही विडंबनाबद्दल बोलतोय. या माणसाला जिथे तिथे तेच दिसतं, वर पुन्हा मी नाही त्यातली आन कडी लावा आतली
बाकी प्रिन्स अफलातुन हा !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)