carrom aanaicha aahe

Submitted by समर्या on 10 January, 2018 - 13:05

India varun kuni carrom aanla aahe ka? konta ani kasa hya baddal mahiti havi aahe.

Pune madhe maagchya trip madhe Shakti Sports & Champion Sports madhe jaun paahila hota. Rs. 5000 paryant tyanchya kade aslela top of the line carrom milat hota. ithe general grocery store madhe $60-$75 la OK carrom milto. pan konta carrom brand changla hi mahiti havi hoti? tasech packing karun detaat ka te? naahitar checkin kelya nantar ithe yei paryant vaat laagleli asaichi Sad

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

समर्‍या,
भारतातून आणण्यापेक्षा इथे अमेरिकेत ऑनलाईन (किंवा ऑफलाईन ) पाहिले का? फक्त देसी दुकानेच नाही इतरही अमेरिकन दुकानात मिळू शकतात.

It is probably not worth bringing one from India. Here is why
1. Since it is a wood product, it needs to have a certificate that it has been fumigated. There are two agencies in Pune. They charge approx. 12,000 (this was 3 years ago) and the process takes 2 to 3 days as the fumigation needs to be for 24 hours.
2. You need to have it specially packed and then can only carry it as checked in baggage (there goes one piece of luggage)
3. There are good 14mm to 18 mm thickness Surco carrom boards available in USA for similar or even less price.

I purchased from http://gandhiappliances.com/product-tag/carrom-board/
and am very happy.

भारतातुन स्वतः कॅरम आणणं हा द्राविडी प्राणायाम ठरु शकतो. आमच्या गावांत फार पुर्वि वीसेक जणांनी मिळुन मीरत मधुन मागवले होते; मस्त क्वालिटी आहे. इथे वाल-मार्ट मध्येहि मिळतात असं दिसतंय...

मी कित्येक वर्षांपासुन कॅरमच्या वर लावतात त्या लँपच्या शोधात आहे. मुंबईत तसे लँप्स कशालाहि लटकवता येत होते, इथे ते शक्य नसल्याने एखादा साइडला उभा करता येणारा पण कॅरमच्या मध्यावर ठेवता येण्यासारखा मिळत नाहि. काहि वेगळी आय्डिया असल्यास प्लीज कळवा...

TenStar Carrom Board Champion Professional Carrom Stand Lamp Shade Equipment. Be the first to review this item ... These are available on Amazon

>>TenStar Carrom Board Champion Professional Carrom Stand Lamp Shade Equipment.<<

हा लँप कॅरमबोर्ड्लाच क्लँपने अ‍ॅटॅच करायचा असल्याने प्रॉब्लेम आहे - एस्पेशियली ४ जण खेळताना. आय्डियली, जमिनीवर उभा करता येण्याजोगा जायंट टेबललँप सदृश माझ्या डोक्यात आहे, पण अजुन कुठे सापडलेला नाहि. थँक्स एनीवे...

लॅम्प शेड, बल्ब, वायर मिळत असेल तर घरीच करता येईल तसा लॅम्प. हा ते शेड मात्र अ‍ॅल्युमिनिअम टाईप मिळेल का ते मात्र आहे...

>>लॅम्प शेड, बल्ब, वायर मिळत असेल तर घरीच करता येईल तसा लॅम्प<<

हो, पण तो स्टँड - भाषणाला किंवा गायक (तबलजी) बसुन गाणं गाताना (वाजवताना) माइकस्टँड वापरतात तसा मिळायला हवा...

राज Ikea मधे तुला हवा तशा प्रकारचा लँप मिळतो. जमिनीवर बेस असतो नि कर्व्ड दांडी वरून आलेली असते ज्याला खाली दिवा लावलेला असतो. त्या शिवाय जर खेळायची जागा फिक्स असेल तर down point chandelier साठी वायरींग करून त्याला खाली lowes, homedepot मधे जे work lamps मिळतात ते वापरू शकतोस. त्यांना अ‍ॅल्युमिनियम शेड असते असा प्रकारचा
https://www.lowes.com/pd/Bayco-Incandescent-Portable-Work-Light/3122291.
इथे लोक तसे फीटींग करून गॅराजमधे कॅरम खेळतात.

अ‍ॅमॅझॉन वाला दिवाच कॅरमच्या जवळ एखादे बारकेसे एंड टेबल ठेऊन त्याला क्लिप करता येईल का ?

ओव्हर आर्चिंग फ्लोअर लॅम्प्स असे सर्च केल्यास बरेच मिड सेंचुरी मॉडर्न स्टाइलचे दिवे दिसताहेत.

असामी, आय्कियात बघतो. सध्या बेसमेंटमध्ये आहे पण खेळण्याची जागा आणि मर्जी फिक्स नसल्याने इलेक्ट्रिक पॉइंट करुन घेतलेला नाहि. हे सगळं (कॅरम बोर्ड, त्याचा स्टँड, लँपस्टँड) पोर्टेबल असलं तर घरात हव्या त्या लेवलला खेळु शकतो हि सुद्धा त्या मागची भावना... Proud

मेधा, ओवरआर्चिंग हि थोडेफार बघितलेले, पण मर्जीत उतरले नाहित. आर्किटेक्ट फ्लोर लँप्स आर समव्हाट ओके, बट नॉट क्लोज इनफ...

>> lowes, homedepot मधे जे work lamps<<
तो लँप बघुन सुरुवातीच्या बॅचलरहुडच्या आठवणी चाळवल्या. तेंव्हा एक्जात सगळ्यांनी असले लँप्स अपार्टमेंट मध्ये घेतलेले होते... Happy

कॅरम मस्तच !
माझे डिप्लोमाचे अर्धे कॉलेज तर जिम मध्ये कॅरम खेळण्यातच गेले.. मी तर चॅम्प होतो.. लिहीत बसलो आठवणी तर लिहीतच बसेन. पण हा धागा तो नाही म्हणून मोह आवरतो Happy
तुमच्या कॅरमला मात्र शुभेच्छा. जागा मोठी असेल घरात तर एक कोपरा वा मोकळी जागा राखूनच ठेवा कॅरमसाठी.. मूड आला की पटकन एखाददुसरा डाव खेळायचा... लहानपणी बिल्डींगमध्येही फ्लोअरवर कॉमन पेसेजमध्ये एक जागा कॅरमला राखीवच असायची आमच्याकडे.. पावसाळ्यात मात्र खेळून झाल्यावर कॅरम आमच्या घरी यायचा Happy
घेतल्यावर फोटो जरूर टाका .. बघायला आवडेल.. रस्त्याने जाता जाता कुठे गल्लीत पोरे क्रिकेट खेळताना दिसली की बघायला जितके आवडते तितकेच कॅरमबाबतही होते माझे... मी टाकतो आता कधीतरी लेख यावर Happy

हो, पण तो स्टँड - भाषणाला किंवा गायक (तबलजी) बसुन गाणं गाताना (वाजवताना) माइकस्टँड वापरतात तसा मिळायला हवा...
Submitted by राज on 11 January, 2018 - 22:42 >>>>>
हा बघा सूट होतो का --
http://www.ikea.com/us/en/catalog/products/00331383/

https://www.terralumi.com/Exterior-Wall-Lights/Large-Extendable-Outdoor-...

// धाग्यासाठी अवांतर //

हो अशाच प्रकारचा बघतोय. थँक्स...
Submitted by राज on 12 January, 2018 - 04:55 >>> Happy माय प्लेजर. अजूनही आहेत काही डिझाईन्स रचनेत थोडाफार फरक असलेली.

किंमत फक्त ११८९ युरो ? :o
Submitted by उपाशी बोका on 12 January, 2018 - 10:06 >>> हो !! मी पण पाहिले होते, पण त्यांच्या गरजेच्या / अपेक्षेच्या जवळपास जाणारा म्हणून चिकटवला. या दिव्यापेक्षा जेव्हा जेव्हा कॅरम खेळतील तेव्हा पलिता घेऊन माणूस उभा करणे सोपे पडेल.

>>तेव्हा पलिता घेऊन माणूस उभा करणे सोपे पडेल.<<

हा हा. अहो पण तो लँप उजेडाकरता नकोय. कॅरमबोर्डवर असा लँप तो तापवण्याकरता लावतात. कॅरम तापला कि सोंगट्या मस्त मख्खन लावल्या सारख्या पॉकेटमध्ये जातात. एकदा खेळुन बघा हा सगळा जामानिमा गोळा करुन...

अरे देवा, हे कोणाला माहीत? मी एवढे शास्त्रोक्त खेळले नाही कधी. मला वाटले पूर्ण खोलीत ट्यूबलाईटचा उजेड बाकीच्याना त्रास नको म्हणून आपल्यापुरता दिवा लावून खेळतात. Happy गरजेपेक्षा जास्त बोलले की असे अज्ञान उघडे पडते.

ज्याला सोंगट्या पॉकेटमध्ये घालवताच येत नाहीत त्याला मख्खनचा काय उपयोग? फारतर १-२दा कडांवर आदळून स्ट्रायकर मध्यभागी जातो आणि क्वीन पॉकेटच्या कडेपर्यंत जाते, पुढच्या भिडूसाठी आयती.
घेतला पाहिजे नवीन बोर्ड आता, जुना खराब झाल्यवर फेकला मग खेळणे झालेच नाही.

हे शेवटचे अवांतर समर्या...... माफ करा..

मला वाटले पूर्ण खोलीत ट्यूबलाईटचा उजेड बाकीच्याना त्रास नको म्हणून आपल्यापुरता दिवा लावून खेळतात. Happy गरजेपेक्षा जास्त बोलले की असे अज्ञान उघडे पडते.
>>
भारी Proud
प्रत्येकाला कॅरम बघून पहिल्यांदा दिव्याचे प्रयोजन उजेडासाठीच वाटते. मग कधीतरी लवकर वा उशीरा त्या दिव्याचे महत्व कळते. बाकी बोलल्यानेच अज्ञान दूर होते आणि ज्ञानात भर पडते Happy

अरे ऐकले आहे की कॅरम च्या स्पर्धांमधे वापरून नंतर जे विकायला काढतात ते कॅरम बेस्ट कंडिशन मधे असतात. इथे अमेरिकेत तसे मिळतात की नाही माहीत नाही पण बघा कोठे मिळतात का.

Dhanyavaad _/\_

Ajay, Ababa, Raj ani itar - khup khup dhanyavaad. ekdam technical mahiti dili Happy Chicago chya Gandhi Appliances madhe yevdhe carroms aahet paahun naval vaatle ... kadachit online jasti vikat astil, dukanaat kadhi yevdhe disle naahi. pan parat ekda jaun baghin.

ithe (Milwaukee) madhe tari American stores madhe kuthe carrom disle naahi. Chicago la jaun gheun yein kivva online order karin.

Asamya - Bayco brand cha light mhanje nakkich changlach ujed padel Wink

now the next big question - how to pick the right carrom? Happy

>>तेव्हा पलिता घेऊन माणूस उभा करणे सोपे पडेल.<<
हा हा. अहो पण तो लँप उजेडाकरता नकोय. कॅरमबोर्डवर असा लँप तो तापवण्याकरता लावतात. कॅरम तापला कि सोंगट्या मस्त मख्खन लावल्या सारख्या पॉकेटमध्ये जातात. एकदा खेळुन बघा हा सगळा जामानिमा गोळा करुन...
नवीन Submitted by राज on 12 January, 2018 - 19:54
>>>>
असा दिवा पोलीस स्टेशनला पण असतो ना ? (धन्स टू बॉलीवूड ) आरोपी तापला की मख्खन सारखा बोलतो मग. Rofl

असा दिवा पोलीस स्टेशनला पण असतो ना ? (धन्स टू बॉलीवूड ) आरोपी तापला की मख्खन सारखा बोलतो मग>>
Lol
तो दिवा माझ्या मते आरोपीच्या चेहर्यावरचे भाव बारकाईने दिसण्यासाठी असतो Happy

कॅरमबोर्डवर असा लँप तो तापवण्याकरता लावतात. कॅरम तापला कि सोंगट्या मस्त मख्खन लावल्या सारख्या पॉकेटमध्ये जातात.>>>>>>>>>>>> Uhoh
मला वाटले पूर्ण खोलीत ट्यूबलाईटचा उजेड बाकीच्याना त्रास नको म्हणून आपल्यापुरता दिवा लावून खेळतात> +१ मलाही असंच वाटलेलं Lol

माझा पण एक अनुभवातला सल्ला -
टिपिकल कॅरम बोरिक पावडर पेक्षा LOWE स मध्ये अँट रोच किलर पावडर मिळते, ती खूप स्मूथ आहे कॅरम साठी.
पूर्वी कॅरम स्पर्धा झाल्या होत्या गावात तेंव्हाची आठवण आहे.

वैधानिक इशारा -

बर्‍याच जणांना कॅरमबोर्ड वरच्या लॅम्पचा उपयोग त्याला तापवण्याकरता (लिटरली, फिगरेटिवली नाहि) हि असतो याची क्ल्पना नसल्याने, मूळात कॅरम तापला कि सोंगट्या मस्का लावल्या सारख्या पॉकेट्स मध्ये जातात हे ठाऊक नसल्याने केवळ कॅरम तापवण्याकरता त्यांनी कॅरमच्या बुडाखाली स्टोव वगैरे ठेऊन त्याला तापवु नये. कॅरमबोर्ड लाकडी असल्याने पेट घेऊ शकतो.

बाकि, कॅरमबोर्ड वरच्या सोंगट्या मस्का लावल्या सारख्या सुळसुळीतपणे जात नसतील तर कॅरम खेळणे हा मानसीक अत्याचार/छळ आहे. विचार करा, महत्प्रयासाने तुम्ही क्विन पॉकेट केलेली आहे आणि कवर पॉकेट करताना, दमटपणामुळे कॅरमबोर्डवर जमा झालेल्या बोरीक पावडरच्या पुटांमुळे तुमचा स्ट्रायकर किंवा कवर ढुऽऽस्स होऊन अर्ध्यावरच थांबला/ली तर झालेली मानहानी सहजासहजी विसरता येइल काय?.... Proud

वरच्याला जोडूनच
वैधानिक ईशारा २
सोंगट्या मख्खन सारख्या जाव्यात म्हणून सोंगट्यांना खरोखरचे मख्खन लाऊ नये. त्याने कॅरमला मुंग्या होतील. आणि आता या मुंग्यांचे करायचे काय म्हणून पुन्हा ईथेच विचारायला याल Happy

च्रप्स, अजूनही एक कुठलीशी डिस्को पावडर मिळते कॅरमसाठी. नेमके तिचे नाव गाव आता आठवत नाही. पण ती बहुधा महाग असते.
ईथली कॅरमची चर्चा ऐकून वाचून कॅरम खूप मिस होऊ लागलाय Sad

how to pick the right carrom? >> नक्की रिक्वायरमेंट काय आहे? जनरल खेळण्यासाठी हवा असेल तर साधा चालेल, जरा चांगला खेळण्यासाठी हवा असेल तर मिडियम आणि एकदम एक्स्पर्ट लेव्हल चे खेळायचे असेल तर चँपियन बोर्ड.. बॉर्डरच्या जाडीवर आणि प्लायच्या स्मूथनेस वर ठरते हे सगळे.

बॉर्डरची जाडी.. येस्स.. आणि त्याला खण्णकन आपटणारा स्ट्राईकर हस्तीदंताचाच हवा.. पण त्यावर अनंत काळापासून बंदी आहे. माझ्याकडे मात्र द. मुंबई चोरबाजारातून मिळवलेला एक कडक हस्तीदंती स्ट्राईकर आहे. म्हटलं तर पतलाच आहे, पण सोंगटीवर बसताच तिला आपली जागा दाखवतो. आता तो ओळखायचा कसा याचीही एक ट्रिक असते. ते असो. पण त्या स्ट्राईकरची खरी मजा चॅम्पियन बोर्डवरच. साध्या मोठ्या कॅरमवर मजा नाही येत. तिथे जाडजूडच स्ट्राईकर बरे..

आता अवांतरच चाललय, तर माझा पण एक अनाहूत प्रश्नः कॅरम तापवून सोंगट्या घालवण्यापेक्षा, सोंगट्या च तापवून खेळायला घेतल्या तर? Wink

@फेरफटका Lol
थंड नाही का होणार?
मग खेळताना बाजूला सोंगट्या आणि स्ट्रायकर गरम करायची सोय करून बसा. प्रत्येक स्ट्राईकला सगळ्या गोट्या स्ट्रायकरसहीत बाहेर काढायच्या कढईत तापवायच्या मग खेळायचे.

सगळ्या गोट्या स्ट्रायकरसहीत बाहेर काढायच्या कढईत तापवायच्या मग खेळायचे >>> Lol जर अमेरीकेत असाल तर या कामासाठी ओवन वापरता येईल .. आणि हॉस्टेलवर असाल तर ईस्त्री देखील चालेल Happy

जोक्स द अपार्ट,
कॅरम घासायचा पॉलिश पेपर असतो. आम्ही खेळ सुरू करण्याआधी कॅरम तापवून घ्यायचो त्यावर पावडर मारायचो. आणि पॉलिस पेपरने घासून घ्यायचो. मग ती कॅरम घासायला वापरलेली पावडर पॉकेट थ्रू फेकून द्यायचो. नवी पौडर शिपंडायचो आणि मग खेळ चालू...
थोडे शौक होते, पण मजेसाठी कायपण

कॅरम घासायचा पॉलिश पेपर असतो. आम्ही खेळ सुरू करण्याआधी कॅरम तापवून घ्यायचो त्यावर पावडर मारायचो.>>>>
पण पॉलिश पेपरने कॅरम घासला तर त्यावरच्या रेषा, बाण निघून नाही का जात???

Air hocky chya table war carrom che chitra kadhoon khela.
Lamp nako ni powder nako. Lol Lol

पण पॉलिश पेपरने कॅरम घासला तर त्यावरच्या रेषा, बाण निघून नाही का जात???
>>>>>
नाही, तो खास कॅरम घासायचाच असतो.
ज्यांचे रेषा बाण निघून जातात ते कॅरम गरीबांचे असतात. ते लोकं सिगारेटच्या चंदेरी पेपरने कॅरम घासतात. आणि गेल्याच रेषा तर स्केचपेनने पुन्हा आखतात..

>> ज्यांचे रेषा बाण निघून जातात ते कॅरम गरीबांचे असतात. <<<
खरं आहे, आम्ही गरीब साध्या कागदानेच आमचे कॅरम घासायचो आणि आम्हाला कुणी गफ्रे. पण न्हवती नाहीतर कदाचित एखादा पॉलिश पेपरपण मिळाला असता. Wink

>>> माझ्याकडे मात्र द. मुंबई चोरबाजारातून मिळवलेला एक कडक हस्तीदंती स्ट्राईकर आहे. म्हटलं तर पतलाच आहे, पण सोंगटीवर बसताच तिला आपली जागा दाखवतो. आता तो ओळखायचा कसा याचीही एक ट्रिक असते. ते असो. पण त्या स्ट्राईकरची खरी मजा चॅम्पियन बोर्डवरच. साध्या मोठ्या कॅरमवर मजा नाही येत. तिथे जाडजूडच स्ट्राईकर बरे.. <<<
न्यूटनच्या नियमाने वस्तुमान जास्त असले की कमी फोर्सने पण चांगले त्वरण मिळते. म्हणून स्ट्राईकर जाडजूडच चांगला, जाड आणि जड हवा. मग तो हस्तीदंती असो वा नसो. माझ्या लहानपणी माझ्याकडे हस्तीदंती स्ट्राईकर होता, तेव्हा त्याच्यावर बंदी न्हवती. हस्तीदंती स्ट्राईकर तसेही प्लॅस्टिकपेक्षा जड असतात आणि त्याच्यावर एक डॉट असतो तो लगेच दिसतो (झाडाच्या खोडावर जशा रिंग्स दिसतात काहीसा तसा प्रकार असतो).

सिरियस कॅरम खेळायचा असेल तर स्ट्रायकरचे वजन ठराविकच असते, त्यापेक्षा जास्त किंवा कमी असून चालतच नाही. आणि सोंगट्यांचे वजन पण ठरलेले असते, तेव्हढ्याच वजनाच्या सोंगट्या असतात. हस्तीदंती स्ट्रायकरवर बंदी अणून खूप वर्ष झाली. सध्या फायबरचेच स्ट्रायकर वापरतात. स्ट्रायकरची बाजू कशी आहे ते पण महत्त्वाचे असते, एकदम सरळ की जराशी फुगीर. फुगीर असेल तर ब्रेकच्या वेळेस उत्तम पण मग कट्स मारताना फार उपयोग होत नाही, कारण कट्स शार्प लागत नाहीत.

कॅरम साठी वेगळी डिस्को पावडर मिळते पण त्याच्या पेक्षा रेग्युलर बोरिक पावडर मिळते PCI ची तीच उत्तम. दुसरी कुठलीही पावडर चुकूनही वापरु नये, बोर्ड खराब होण्याची खात्री.. आणि कुठल्याही खोरपेपरने कॅरम घासू नये, साधा वर्तमान पत्राचा कागद घेऊन त्याने बोर्ड स्वच्छ करावा. बोर्डवर पावडर चिकटणार नाही ह्याची काळजी घ्या.. (कोणे एके काळी कॉलेज मध्ये सलग चार वर्ष पोडियम वरच १ला किंवा २रा नंबर आणि डबल्स मध्ये १ला नंबर)