तुझ्या नाजूक ओठांनी...

Submitted by सत्यजित... on 9 January, 2018 - 11:40

अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी
तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी!

फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना
तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

कपाळी चंद्र कोरावा,चुड्याने चांदणे ल्यावे
तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी!

जरासा तोल ढळला की मला बाहूंत घ्यावे तू
तुझ्या आरक्त डोळ्यांची शराबी धुंद मी प्यावी!

सुगंधी स्पंदने अपुली उराशी खोल लपवू,ये...
फुलांचे देह शिणले की धुक्याची शाल ओढावी!

—सत्यजित

Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर !

तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी!

तसेच

तुझ्या नाजूक ओठांची कळ्यांनी चुंबने घ्यावी!

कसे अजून रोमॅन्टिक वाटते ...

एकदम रोमँटिक रचना आहे सत्या.
पण अलिंगने असं हवं ना?
आलिंगणे खटकत्तंय जरा Sad

का ते मीटर बिटर मध्ये बसावं म्हणून केलंय?

सर्व प्रतिसादकांचे खूप-खूप धन्यवाद!

>>>आलिंगणे खटकत्तंय जरा>>>
हो,ते नंतर लक्षात आले!
'आमंत्रणा'चे 'आलिंगन' होता होता,राहिलेला तो बदल!
प्रतिसादाबद्दल खूप-खूप धन्यवाद!