कोतबो - माझं एक्स्ट्रॉमॅरिटल प्रेम

Submitted by थिसियस on 29 December, 2017 - 04:52

रामराम
माझा प्रॉब्लेम छोटासाच आहे, आणि कदाचित तुम्हाला तो ऐकून नवल वाटेल ,पण तरी जेन्युइन आहे हे नक्की. तो सांगण्याआधीच सांगून टाकतो की हा अर्थातच डुआयडी आहे. कारण तुम्ही ते नंतर ओळखालच ..
माझा मूळ आयडीही फार तसा जुना नाही. त्या आयडीचं स्वतःच लेखन असं काहीच नाही केलेलं आणि प्रतिसादही फार क्वचित .आता हेच डुआयडी वापरून का लिहिलं हाही प्रश्न बरोबरच आहे ,,तर त्याचं उत्तर असं आहे की माझ्याबद्दल आजवर मी कधीच इथं काहीही लिहिलं नाही .तसं लिहिण\आवडतही नाही .लाइमलाइट नको अजिबातच.. आणि रोमात गपचिप वाचत बसणे यासारखं सुखद सुख नाही .

असो . आता माझ्या छोट्याशा प्रॉब्लेमबद्दल.

मला वाचनाची आवड आहे . पण व्यासंग नव्हे हा.

घरात एक बायको नि एक बारक्या .बार्क्या लय लहान आहे अजून पन तरी इंगजी चम्पक ,काही कॉमिक सिरीज वाचतो. मोठेपणी मोठा नाही पण छोटामोठा वाचक होणार अशी आशा करायला हरकत नाही .नाही झाला तरी काय बिघडत नाही. वायोलिन वाजवलं किंवा कॅरम खेळला तरी आय डोंट माईंड .खरंतर काहीच नाही केलं त्याने तरी आपण माईंड करून काय असा तीर मारणारोत . ते जाऊदे.
आता घरात ही जी एक बायको आहे ,तिचा पुस्तकांशी शून्य संबंध आहे. काही वर्षांपूर्वी ती माझ्या घनदाट प्रेमात होती तेवा मी तिला मला आवडलेलं वाच म्हणून म्हमणालो तर दुसर्‍या दिवशीए ती म्हणे ते पुस्तक धरून हाताला कळ लागून आली म्हणून मूडच लागला नाही . हे पुस्तक होतं सव्वाशे पानांचं ..

तुम्हाला सांगतो मी फू म्हणता कढीभात ओळखला आणि नंतर कधी पुस्तक वाच म्हणालो नाही. तक्रारही केली नाही . पुस्तके वाचल्याने किंवा न वाचल्याने संसारात फार काही फरक पडत नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलं . म्हणजे संसार तसा लौकिक्द्रूष्ट्या सुखाचा आहे . आम्हाला एकमेकांना वाटणार्या प्रेमाचं आता काळजीत रुपांतर झालं आहे . (म्हणजे मी कार चालवताना आणि ती माझ्याशेजारी आणि बारक्या मागे बसलेला असताना तिला अतोनात काळजी वाटून ती ताठ अ‍ॅटेंशनमध्ये , आपल्या स्टॉपची कळकळीने वाट पाहणार्‍या सिक्स सीटरच्या प्रवाशासारखी अवघडून बसलेली असते ,,आणि शिवाय रस्त्यातल्या इतरांना आणि मला सतत सावध करत असते .,यात थोदा खंड पडला की बार्क्या मागून ओरडून तिला सावध करतो )

आता तुम्हाला मुख्य प्रॉब्लेम सांगायला हरकत नाही . आजकाल ती पुस्तकांचा फार द्वेष करू लागली आहे.सोफ्यावर, टीपॉयवर्,बेडवर, डायनिंगवर ,खुर्चीवर, फरशीवर ; बाथरुममध्ये असं कुठंही पुस्तक दिसलं की तीचं डोकं फिरतं आणि ते ती सरळ कुठेतरी जप्त करून टाकते.
पाहुणे आले की आपण कसं फुलदाण्या सजवतो,रूमफ्रेशनर मारतो ,साफसफाई करतो. काही न वाचणारे लोक तर पाहुण्यांना दिसेल अशा प्रद्धतीने पुस्तकांचा ढीग मांडून ठेवतात .पुस्तकाचे कपाट मुद्दाम उघडं ठेवतात वगैरे . आमच्या घरी गंमत अशी की साधारण्पणे दिसेल असा कागद ,मासिक्,वर्तमानपत्र, पुस्तकं हे सारं साहित्य गडप केलं जातं . जप्त केलं जातं. तुम्हाला सांगतो एकदा पाहुणे यायच्या आधी हे साहित्य थोडं जास्त सापडलं म्हणून तिने आमच्या शेजार्‍याकडे पाठवून दिलं चक्क .

माझी अडचण अशी आहे की मी वाचण्याशिवाय जगू शकत नाही . थोडंफार वाचलं नाही तर मी शांततेने कामही करू शकत नाही कारण आज काहीच वाचलं नाही हे सारखं डाचत राहतं. तुम्हाला सांगतो अगदीच कन्फुशियस सात्र काफ्का वगैरे मी वाचू शकत नाही कारण कळतच नाही . शिवाय इंग्रजी फारसं बरं नसल्याने इंग्रजी पुस्तकंही नाही . पण बहुतेक सारे मराठी लेखक आणि अनुवाद मनापासून वाचतो...

बायको म्हणते एवढं डोकं आणि वेळ धंद्यात खर्च केला तर जरा आणखी प्रगती होईल . तुम्हाला सांगतो आता माझ्या टूव्हीलर ऑटो स्पेअर्स शॉपमध्ये मी केली आहे त्यापेक्षा जास्त प्रगती शक्य नाही आणि असली तरी मला नको आहे हे मी एकदा प्रेमाने समजावून सांगितलं तर भांदण झालं . 'लग्नापुर्वी तू इतका निगेटिव्ह नव्हतास' हे आणखी वरून..

तुम्हाला सांगतो मला मरायच्या आधी फार वाचायचं आहे आणि मनापासून वाचायचं आहे . अजून पस्तिशीतच आहे त्यामुळे अजून भरपूर वेळ आहे तसा पण तुम्हाला सांगतो छातीत बारीक कळबीळ आली ना तर मला लोन्स ,देणीघेणी, पॉलिसीज वगैरे न आठवता आधी राहून गेलेल्या पुस्तकांची यादी आठवते आणि आणखी कळ येते .

बायकोशी इतर काही भांडणं नाहीत (तिच्या विशलिस्टवरचे दागिने वगैरे सोडा ते ऑनगोइंग आहे .धंद्यातल्या करू शकत असलेल्या प्रगतीसारखंच ते नेव्हर एंडिंग आहे.)). आणि आमचा संसार सुखाचा चालू आहे हे मी तुम्हा;ला सांगितलंच . आणि या छोट्याशा गोष्टीवरून तिला काय नाराज करा म्हणून मी लक्ष देत नव्हतो .. कारमध्ये, पार्किंगमध्ये ,बारकूला गारडनमध्ये फिरायला नेल्यावर, टॉयलेटम्ध्ये, टेरेसवर ,प्रवासात आणि घरात जमेल तेव्हा आणि शिवाय रात्री बेरात्री जाग आल्यावरही असं जमेल तिथं मी पुस्तक वाचत अस्तो . पण आता हा मुद्दा मला महत्वाचा वाटू लागला आहे . वाचणे हे माझ्या आयुष्यात गंभीर स्वरूप धारण करू लागलं आहे ,मला व्यापू लागलं आहे .इतकंच काय पण रोजच्या जगण्यातल्या आणि कामातल्या अनेक समस्यांची उत्तरं मला थोडं वाचलं आणि मन फ्रेश झालं की सापडू लागली आहेत . हे तिला समजावं अशी प्रामाणिक इच्छा आहे पण त्याच वेळेला माझं हे एक्स्ट्रॉमॅरिटल प्रेम ती समजून घेइइल याची सुतराम शक्यता वाटत नाही . आणि मला काय करावं हे मात्र समजत नाही...

तुमच्या आयुष्यात कमीजास्त फरकाने असं काही झालं आहे का आणि असेल तर त्याला तुम्ही काय उत्तर शोधून काढलं आहे ?हे ऐकायला आवडेल ..

थँक्स!

Group content visibility: 
Use group defaults

सर्व प्रथम: दुसर्‍या बाजूस पुस्तकांचा इतका तिरस्कार निर्माण होण्यासारखी काही घटना भूतकाळात तुमच्याकडून/आणि कोणाकडून घडली का याचा विचार करणे.

माझ्या पुरता हा प्रश्न असा सोडवला:
मला लग्नापूर्वी पुस्तकं वाचायची आवड आणि वेळ होता.एक पुस्तक बैठक मारुन पूर्ण वाचल्याशिवाय उठतच नसे.
आता व्हिजिबली आयडल बसून प्रिंटेड पुस्तकं वाचणं/तितका वेळ व्हिजिबली काही कामं न करता/कामं टाकून त्या गिल्ट मध्ये मिळवणं अशक्य आहे.प्लस 'इतकी बुद्धी भूत खेत आणि डिटेक्टिव्ह आणि सुशि ऐवजी अभ्यासाच्या पुस्तकात लावलीस तर जरा २-३ इन्टरव्ह्यु क्लियर करशील' असे रास्त सल्लेही मिळतात. Happy
रात्री स्वयंपाक, आवरा आवरी, झोपाझोप झाली की माझी आवडती पुस्तकं बुकगंगा इ-रिडर वर आणि डेलीहंट वर वाचते.इंग्लिश पुस्तकांच्या पी डी एफ विकत आणि फुकट मिळतील तश्या घेऊन सेव्ह केल्या आहेत.
बरेचदा पुस्तक वाचण्या इतकी एनर्जी नसते.म्हणून हे काम शुक्र/शनी रात्र करते.सकाळी लवकर उठायचा वेळ आहे म्हणून.
खूपच झोप येत नसेल तर टेक्नॉलॉजी ची पुस्तकं वाचायला घेते. ३ पानं वाचली की गुडुप्प Happy

(सिक्स सिटर मधला प्रवासी मी पण आहे.समोरुन कोणी राँग साइड ने येत असेल आणि मी पॅसेंजर सीट वर असेन तरी श्वास रोखून ताठ शक्य तितक्या मागे बसते)

सिक्स सिटर मधला प्रवासी मी पण आहे.समोरुन कोणी राँग साइड ने येत असेल आणि मी पॅसेंजर सीट वर असेन तरी श्वास रोखून ताठ शक्य तितक्या मागे बसते>> +१००००

माझी पण अशिच आहे अवस्था. नवर्याला कन्टाळा आहे वाचायचा अन मी राहु शकत नाही वाचना शिवाय.

पण अता मायबोली किंवा मिपा वाचुन पोट भरतेय सद्ध्या. :(

आपल्या पत्नीला मायबोलीचे सभासदत्व घ्यायला सांगा. त्यांच्या आवडीचे काहीतरी ईथे सापडेलच. पाकशास्त्र, विणकामकला, संगीत, चित्रपट, प्रवासवर्णन, प्रकाशचित्रे.. गेला बाजार ऋन्मेषचे धागे वगैरे... वाचनातल्या एखाद्या प्रकारात जरी मन रमले तर सवतीसह सुखाने नांदायला तयार होतील Happy

तुमचं पुस्तक/वाचनवेड अतिरेकी होतं आहे का? शेवटून दुसरा परिच्छेद वाचून तसं वाटतंय.
बायकोला, मुलाला पुरेसा वेळ देता का? पुस्तकांचा द्वेष करण्याचे हे कारण तर नाही? अर्थात पुस्तकं वाचणं, विकत घेणं हा पैशाचा, वेळेचा अपव्यय आहे असं मुळातच ठाम मत असणारी लोकं असतीलही.
तिची एखादी आवडती गोष्ट करण्यासाठी तिला प्रोत्साहन द्या. त्यात तुम्हाला सहभागी होता आले तर उत्तम.
पुस्तकांचा पसारा आटोक्यात ठेवता येईल का?

बायकोला, मुलाला पुरेसा वेळ देता का? पुस्तकांचा द्वेष करण्याचे हे कारण तर नाही?......+१.
गार्डनमधे मुलाला नेल्यावरही तुम्ही पुस्तक वाचता असं म्हटलं आहे.तिथे वाचण्याऐवजी मुलाबरोबरच एन्जॉय करा.
भरत यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तकांचा पसारा आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.

गेला बाजार ऋन्मेषचे धागे वगैरे.. तरी म्हटलं,ताम्हणकर अजून कसा आला नाही? Wink Wink

अरे माझीपण हीच अवस्था आहे.
दिवसभर हापिसात वाचता येत नाही रात्री मोबाइलवर माबो वाचतो तर मोबाईलमध्ये तोंड घालून बसतो म्हणते. (स्वतः दिवसभर फेबु व्हाॅअॅ व्हूट बघते ते तीला माफ)

भरत +१
तरीही, तुमची तगमग समजू शकते. आमचीही सुरवातीला काही वर्ष पुस्तकांवरुन भांडणं / वादावादी झालीत. आता मीही बराच कमी केला आहे पसारा. दर खेपेस घर बदलावे लागले की फार जड जाते पुस्तकामुळे. आता बरेच वाचन लायब्ररीच्या क्रुपेने.

मला वाटतं त्यांचा आक्षेप नक्की कशाला आहे ते बोलून घ्या
- पतीपत्नीत पुरेसे संभाषण न होणे
- पुरेसा वेळ न देणे
- पुस्तकांवर होणारा खर्च
- त्यांनी व्यापलेली जागा
- त्यांच्या maintenance ची जबाबदारी
- उपलब्ध जागा पाहून पुस्तकं एकतर काढून टाका नियमीतपणे द्यायला म्हणजेच नवीन घ्यायला जागा होईल. नाहीतर ऑनलाईन.
वगैरे .. एकदाLनेमके कारण कळले की त्यानुसार करता येईल तितकी उपाययोजना/ तडजोड करा.

मी _अनु - असे टनावारी सल्ले ऐकले आहेत. आताशा पटत नाहीत. मला उपलब्ध असलेल्या वेळ हा माझा आहे आणि त्यात मी काय करायचे हे मी ठरवणार. Proud

रैना, मला कधी पटतात कधी नाही.म्हणजे या वेळेचा उपयोग अभ्यास पुस्तके किंवा लिंडा वाचून केला तर फायदा नक्की होईल हे पटतं.
पण दिवसभर ऑफिस, ट्रॅव्हल, स्वयंपाक आणि हाऊसकीपिंग केल्यावर "अवांतर पुस्तके वाचून तोटा होतो, लेकिन हाय....वो भी क्या हसिन तोटा होगा..." म्हणून अवांतर वाचन आणि व्हिडीओ पाहणे चालू ठेवते Happy

दिवसभर हापिसात वाचता येत नाही रात्री मोबाइलवर माबो वाचतो तर मोबाईलमध्ये तोंड घालून बसतो म्हणते. (स्वतः दिवसभर फेबु व्हाॅअॅ व्हूट बघते ते तीला माफ)

>>>>>

ईथे काय होत असावे ते मी सांगतो.
जेव्हा बायको दिवसभर मोबाईलमध्ये तोंड खुपसून असते तेव्हा नवरा सोबत नसतो. पण नवरा सोबत असताना दोघांपैकी कोणीही मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसू नये अशी तिची अपेक्षा असावी. ईथे जर नवरयाला दिवसभर ऑफिसमध्ये वा ऑफिस ते घर प्रवासातही मोबाईल चेक करता येत नसेल तर त्याने जमल्यास जॉब चेंज करावा. पण फॅमिलीला जो टाईम देणे अपेक्षित आहे तो जर मोबाईलला दिला गेला तर वाद होणारच.

हे तुमची पोस्ट कोट करत लिहिले तरी तुम्हाला असे नाही, जनरल लिहिलेय.

मॉरल ऑफ द स्टोरी सांगायची झाल्यास तुमच्यासाठी प्रायोरीटी तुमचे वैयक्तिक छंद आहेत की फॅमिली यावर शेवटी सारे काही ठरते.
ईथे छंद हा शब्द वापरला आहे. जर पॅशन असेल तर मात्र फॅमिली सुद्धा समजून घेते आणि सपोर्ट करते..

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2018 - 00:38
>>>
@ ऋ शतप्रतीशत सहमत.
पण मुळ प्रश्न रहातो स्वत:साठी क्वालिटी वेळ कधी आणि कसा द्यावा.
(धागा काढू शकतोस)

पाथफाईंडर, तुम्ही पतंग उडवणार्‍याकडून विमान कसे उडवायचे यावर धाग्याची अपेक्षा करत आहात Happy
विवाहीत लोकांचे आयुष्य वेगळे असते, त्यांची कमिटमेंट वेगळी असते, त्यांचा दिनक्रम वेगळा असतो... मी या प्रश्नाचे माझ्या परीने उत्तर दिले तरी ते त्यांना लागू होईलच असे नाही. मी फक्त एक रूल सांगितला जो सर्व केसेसना लागू व्हायला हवा. ते म्हणजे वेळकाळानुसार प्रायोरीटी. तुमची फॅमिली असली तरी घरी तुम्ही जे (झोपायची वेळ वजा करता) रोजचे चार सहा तास असता, आणि सुट्टीचे बारा-चौदा तास असता त्यात तुमची फॅमिली तुमच्याकडे तो सर्वच्या सर्व वेळ नक्कीच मागत नसेल. त्यांची अपेक्षा सहातले ४ तास द्या अशी असेल. आणि ते तुम्ही द्यायला तयारही असाल. फक्त ते असे रँडमली देण्याऐवजी जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हाचा द्या. तुम्ही जो वर स्वतःसाठी क्वालिटी वेळ म्हणत आहात तो त्यांना कसा देता येईल याचा विचार करा. मग कदाचित तुम्हाला सहापैकी ४ तास द्यायची गरजही पडणार नाही, ते दोन तासांतच खुश होतील.

वर मी उल्लेखलेली प्रायोरीटी - तुम्ही व्हॉटसपवर ग्रूपवर चॅट करत आहात वा माबोवर टाईमपास करत आहात, तेवढ्यात बायकोने हाक मारली, तिचे काम असेल कि सहजच हाक मारली असेल. याचा विचार करू नका. आपले हातातले काम थांबवून तिला आधी ओ द्या. तिच्याशी चार गप्पा मारून या. तिला आपण प्रायोरीटी देतोय हे तिला दाखवा. बघा फरक पडेल. बरेचदा बघा तुमच्यासाठी माझ्यापेक्षा मायबोली, व्हॉटसप जास्त महत्वाचे आहे हे पुन्हा पुन्हा दाखवून द्यायलाच मुद्दाम हाक मारली जाते. हे सारे थांबून जाईल. एकदा आपण आपल्या जोडीदारासाठी प्रायोरीटी आहोत हे समजल्यावर .... जर त्यांनी कटकट न करता तुम्हाला उरलेला जो काही तुमच्या स्वतःसाठी वेळ दिला तर तो "बिनाकटकटीचा वेळ" तुम्हाला आपसूकच क्वालिटी टाईम वाटेल.

बघा आता, तुम्हा विवाहीत लोकांचे तुम्हालाच ठाऊक. मी तरी घरी आईशी आणि बाहेर गर्लफ्रेंडशी असाच वागतो Happy

ऋन्मेष.. तुझे शेवटचे दोन प्रतिसाद वाचून मी पुन्हा नव्याने तुझ्या फॅनक्लबात उडी घेतली आहे. सिरियसली.

आशा करते की इथे तू जितकं छान लिहिलं आहेस तितकंच छान घरी बायको आणि मुलांशी वागत असशील. तसं असेल तर तुझ्या कुटुंबाला स्वर्ग दोन बोटं उरला असेल.

(अर्थात तू नसशील वागत तरी तुझ्या फॅनक्लबातून बाहेर येणार नाही. काही वेळा उत्तम विचार खुद्द ते मांडणाऱ्याला वास्तवात आणता येत नाहीत. पण तरीही त्यामुळे त्या विचारांचं उत्तमत्व आणि महत्व कमी होत नाही.)

च्रप्स धन्यवाद,
पियू आपल्याही चुकीच्या तपशीलाचा भाग वगळता ईतर कौतुकासाठी धन्यवाद Happy
जे विचार मला आचरणात आणायला जमतात किंवा पुर्णपणे नाहीच जमले तरी त्यादृष्टीने माझा सतत प्रयत्न असतो तेच मी ईथे मांडतो.
वरचा विचार देखील मी टप्प्याटप्य्याने सुधारणा करत अंगी बाणवला आहे. अजूनही इम्प्रूवमेंटला स्कोप असेलच. पण तुर्तास त्यामुळेच मी माबोवर पडीक दिसत असलो तरी माझ्या फॅमिलीला, गर्लफ्रेंडला माझ्याबद्दल तक्रार नाही. की ऑफिसमध्ये कोणी मला कामात टंगळमंगळ करणारा वा कामचुकार समजत नाही. तिथेही हाच फंडा वापरतो. ऑफिस कामालाच पहिली प्रायोरीटी. अर्थात ऑफिसबाबत हे बरेच जण करत असतील. कारण तिथे पर्यायच नसतो. ते पगार देतात आपल्याला. कामात दिरंगाई झाली तर उद्या काढून टाकतील. घरी मात्र तसे नसल्याने आपला रवैय्या बदलतो. बस्स तोच बदलू द्यायचा नाही ईतकेच. आणि बायकोच नाही तर अगदी तुमच्या छोट्या पोराने हाक मारली तरीही..

ऋ भाऊ धन्यवाद.
माझा प्रश्न स्वतःसाठी वेळ कसा द्यावा असा होता. तो विवाहीत असो वा अविवाहित.
आपली दिवसभर कामाप्रती निष्ठा आणि स्वतःसाठी रात्रभर क्वालिटी वेळ ही विभागणी या प्रतिसादांतून जाणवली. तुम्ही कितीही आपले यशस्वी टाईम मॅनेजमेंटचे गुपीत लपवले तरी पुर्ण रात्रभर तुमचे न चुकता येणारे प्रतिसाद हे आवडत्या कामासाठी वेळ कसा काढावा हे उत्तम उदाहरण आहे.
एवढे कष्ट आम्ही साधी माणसे घेऊ शकू असे वाटत नाही.
स्वतःसाठी वेळ कसा द्यावा या माझ्या मागणीला तुम्ही नवीन धागा न काढता येथेच सोदाहरण उत्तर दिल्याबद्दल पुनश्र्च धन्यवाद.

थँक यू फ्रेंड्स .
तुमच्या प्रतिसादांनंतर मी माझ्याबबतीत काय व कसं घडलं असावं ते रिव्हु करून बघितलं . या निमित्ताने थोडं ब्रेन्स्टोर्मिंग झालं ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ठ आहे ...

anjut >> किंडल आहेच . मला फारसं आवडलं नाही , तरी तिच्या द्रुश्टीकोनात काही बदल होतो का; ते बघण्यासाठी मी वापरलं काही दिवस . पण नाही . याबद्दल आणखी विस्त्रुत पुढे सांगतोच ..

mi_anu >>> एकझॅ़क्टली हाच सिंड्रोम आहे : 'इतकी बुद्धी भूत खेत आणि डिटेक्टिव्ह आणि सुशि ऐवजी अभ्यासाच्या पुस्तकात लावलीस तर जरा २-३ इन्टरव्ह्यु क्लियर करशील'
मी सार्या बाजूंनी नीट विचार करून बघितला तर पुस्तकं दिसणं व पसारा होणं हा प्रॉब्लेमच नाही आहे . (पुढच्या प्रतिसादांमधे ही अनेकांनी या प्रश्नाचा उल्लेख केला आहे रैना भरत आणि इतर काही सदस्यांनी ) मुळात मलाच असं गचाळ्पणा आवडत नाही . कटाक्षाने सारं नीटनेटके आवरून ठेवत असतो .याबतीत बायको इतरांजवळ माझं कौतुककरतानाही मी एकलं आहे ..
मी धीरगंभीर पुस्तके अती गंभीर चेहेरा करून वाचत असतो असे ती म्हणते . इतक्या गंभीर चेहेर्‍याने हा त्याचा 'अभ्यास ' करर्तो आहे की काय असं तिला वाटत असणार .इतकं मन लावून आणि गांभीर्याने करियरच्या सुरुवातीलाच कष्ट केले असते तर एडमिनिस्ट्रेटिव्ह वा फॉरीन सर्व्हिसेस मधे गेला असता -- असं ती म्हणते ! अगदी खरं! ! आता दरवेळी हे ऐकून मला हसावे की रडावं कळत नाही .मी माझी तथाकथीत प्रचंड बुद्धिमत्ता योग्य त्या ठिकाणी वापरली नाही व वापरत नाही हे ऐकून आता मला फार क्न्टाळा आलाआहे .. मी ""तितका' बुद्धिमान नाही किंवा माझ्या बुद्धिच्या मानाने मला पुरेसं मिळालं आहे आणि माझी तक्रार नाही असे मी सांगुनसुचवून पाहिले .पण ते फारसे पटल्याचं दिसत नाही ;
anjut >> हेच स्पश्टीकरण तुमच्याहीसाठी ..

शिल्पा नाईक >>>> अहो नुसता '' कंटाळा' आणि तोही स्वतः वाचायचा :- यापुरते मर्यादित असेल तर तुम्ही त्यातल्यात्यात सुखी आहात . तुमचे मिस्टर वाचन आणि पुस्तके यांचा द्वेष '' करत नाहीत हे बरेच आहे म्हणायचे ....

अजून उत्तरे लिहित आहे ...
Thank you once again friends

by ऋन्मेऽऽष o >>> हे करून झालं आहे .मायबोलीवरही वाचायचंच असतं हे नीट पक्कं मत झालं आहे तिचे .मग किंडल आणि मोबाईल / लॅपटॉप यात फरक तो काय ... सब घोडे १२ टके वगैरे. नाही म्हणायला फॅशन डिझायनिंगमध्ये तिने थोडंफार काम केलं आहे आणि ती चांगलं करू शकेल असे मलाही वाटते . पण कुठचीही गोष्ट either पॅशन किवा urge असल्याशिवाय होउ शकत नाही .हे माझं मत आणखी पक्के झाले

y च्रप्स >>> टिंडर काय प्रकार आहे मला खरेच माहिती नाही पण शोधतो ...
तसेच शनाया व राधिकाबद्दल समजले नाही .

भरत व रैना :: काही मुद्दे वर स्प्ष्ट केले आहेत .
संभाषण व communication पुरेसे आहे असं मला नक्की वाटतं .(तीन दिवस बायको मुलगा मी फिरायला गेलेलो व त्यामुळेच तुमच्या सार्यांच्या प्रतिसादांवर उत्तर द्यायला उशिर झाला ..) पण याबाबत भविष्यातही काळजी घेतली पाहिजे हे यानिमित्ताने स्वताला बजावून ठेवले आहे . विशेषता भरत यांनी अतिरेक होतो आहे का? या मांडलेल्या मुद्द्याबाबत ...
पुस्तकांचा खर्च जागा आणि maintenance : मी आजकाल विकत घेण्याचे प्रमाण फार कमी केलं आहे .म्हणजे शंभर पुस्तके वाचली तर त्यातली ५-७ फक्त विकतची .दोन मोठ्या लायब्ररी लावल्या आहेत आणि त्यातून मला जुनी नवी अशा सर्व प्रकारची पुस्तकं मिळतात .

भरत व देवकी : मी माझा परिछेद वाचून पाहिला .तर तसा ग्रह होणे शक्य आहे हे जाणवले ..
"'कारमध्ये, पार्किंगमध्ये ,बारकूला गारडनमध्ये फिरायला नेल्यावर, टॉयलेटम्ध्ये, टेरेसवर ,प्रवासात आणि घरात जमेल तेव्हा" असे लिहिले आहे याचा अर्थ बायको मुलाला वेळ दिल्यानंतर उरलेल्या वेळात जमेल तसे जमेल त्या ठिकाणी वाचतो असा क्रुपया घ्यावा .
गार्डनमधे वाचतो म्हणजे मुलावर लक्ष ठेउनच अर्थात .शिवाय अगदी शेजारी वा जवळच थांबतो ;तो मारत असलेल्या गप्पांना व बडबडीला प्रतिसाद देतो .शिवाय माझ्यासारखे खेळवायला आलेले व वाचत बसलेले अनेक असतात (ते सारे माझ्यापेक्षा जरा वा खूप जास्त आहेत वयाने हे आहेच : ) ) आणि overall च सार्यांचे सगळ्या मुलांकडे लक्ष असते ..हे आहेच

भरत ::अतिरेकी वाचनवेड :: तुम्ही म्हणता तसा तिचा ग्रह झाअला असण्याचीही शक्यता आहे . वर ते गंभीर चेहेर्याने वगैरे मी लिहिले आहेच . हा पुस्तके वाचवाचून वेडा होतो की काय ?? असे तिने मैत्रिणिकडे एकदा ((हसतहसत ) बोलल्याचेही मला आठवते .

आता एक आठवले ते म्हणजे मी गंभीर वाच्त नाही हे दाखवण्यासाठी एकदा हॅरी पॉटर सिरीज चालू केली .पण ती वाचताना माझा चेहेरा काहीतरी जादूइ उत्सुकतेपोटी आणखी गंभीर झाला असावा . नंतर झोपेत त्यातल्या अगणित पात्रांशी कायकाय बडबडत असताना बायको वैतागुन जागी झाली /.. पण समग्र हॅरी मी कसाबसा आणि चोरून्मारून का होएना - संपवलाच ..

mi_anu >>> तुमच्याही साठी वरील अ‍ॅडिशन ..

ऋन्मेऽऽष >>>> ""वेळ देणे याबाबत तुम्ही भरपूर लिहिलेले दिसत आहे .ते फारसं समजले नाही .. आणि माझ्यापरीने मी वरील प्रतिसादामधे ' वेळ देणे ' याबाबत स्पष्ट केले आहे .
शिवाय आणखी एक म्हणजे :: तुमचे लग्न झालेले नाही असा माझा समज आहे . तरी गर्लेफ्रेंड ,,आई आणि बायको यांना द्यायचा वेळ आणि त्यामागची जबाबदारी व कर्तव्ये यात फार फरक असतो हे मान्य असेलच .. नसेल तरी भविष्यात मान्य होईल असे वाटते . ''बायकोला द्यावा लागणारा वेळ ' ' यामागे भरपूर बॅकग्राउंड स्टोरीज ,फॅक्टर्स आणि संचित काम करत असते ...

पाथफाइंडर ,पियु ,, व अंकु >> धन्यवाद ...

Thank you all again.. या चर्चेचा मला खरोखर फायदा होत आहे व होइल .धन्यवाद

संचित
अगदी अगदी!!
इतिहासाच्या बखरीतून 'शके एकोणीसशे छपन्न च्या तिन्हीसांजेला संध्याकाळी ६ ते ९ तू मित्रांबरोबर बोलिंग करायला गेला होतास आणि मला ताप होता आणि तरी बेबी सिटिंग आणी स्वयंपाक करावा लागला' अशी उदाहरणे कोणत्याही क्षणी समोरुन येऊ शकतात.

तुमचा पसार्‍याचा पॉईंट वाचला म्हणून kindle चा उपाय सुचवला. पण आता पुढील उत्तरांवरून असं लक्षात येतंय की काहीतरी दुसर्‍याच कारणामुळे read frustration हे वेगळ्या प्रकारे व्यक्त केलं जातय! ''बायकोला द्यावा लागणारा वेळ ' ' यामागे भरपूर बॅकग्राउंड स्टोरीज ,फॅक्टर्स आणि संचित काम करत असते ...हे अगदी खरं आहे. तेव्हा या बाबतीत संयमित चर्चा झालेली बरी. समस्येच्या मुळाशी पोहोचलात तर काही उलगडा होऊ शकेल!
शुभेच्छा

राधिका आणि शनाया माहीत नाही याबद्दल खरच अभिनंदन ( एक नंबर फालतू सिरीयल आहे.. जितकी कमी लोक बघतील तितकी लवकर बंद होय्यील)..
Tinder माहीत नाही हे वाचून आश्चर्य वाटले.

पण हे दोन्ही सल्ले विनोदात दिले होते.. त्यामुळे इग्नोर करा..

खरा सल्ला पुढे देतोय...

Netflix वर rules of engagement एक सिरीज आहे. त्यातला सिसन 5 एपी 2 - the bank बघा टाईम मिळाला की. एक चांगली ट्रिक आहे त्यात सर्व नावर्याना आशा प्रसंगी वाचवू शकणारी.

तुम्हाला राधिका शनाया माहीत नाही मग बायको तुमच्यावर चिडते याबद्दल जराही आश्चर्य नाही. तुम्हाला खरेच पुस्तकातून डोके वर करून आजूबाजुचे जग बघायची गरज आहे. तरी पुन्हा एकदा कन्फर्म करायला विचारतो, तुम्हाला खरेच राधिका शनाया माहीत नाही. सिरीअसली???

मला पण माहिती नाही.
पण ही एका फेमस मराठी सोप मधली पात्रे आहेत आणि शनाया हे खलनायकी पात्र आहे इतकी कल्पना आहे.
सिरीयल चं नाव बहुतेक तुझ्यात जीव रंगला.

शनाया हे खलनायकी पात्र आहे इतकी कल्पना आहे >>>> चुकीची कल्पना आहे Happy शनाया हिरोईन आहे, गुरुनाथ खलनायक आहे, आणि राधिका बिनडोक कॉमेडी सहकलाकार आहे.

रून्मेष >>> (आता हे तुमचं नाव काॅपीपेस्ट केल्या िवाय लिहिलं आहे . साॅरी जमत नाहीआहे)). तुम्ही म्हणता आहात ते खरंच माहिती नाही . बायको बघत नाही सिरीयल्स नाहीतर नक्की माहिती असते .

आणि हे सोलुशन असेल तर नक्की बघेन ..
ती नाॅर्मली सोलूशन् स पटकन सांगून टाकते . कधीकधी वर्क होत. ाही पण बर्याचदा इट वर्कस. माझा त्यावर विश्वास पण आहे...

भरत>> थॅंक्स ..

थिसियस तो शनाया वगैरे गंमतीच्या पोस्टी आहेत Happy

ऋन्मेष हे RunmeSha हे साधारण असे लिहिले जाते
ऋ = Ru ईतकेच ..
आयुष्य खूप सोपे आहे, आपण उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो Happy

You are right Runmesh.

complicated आहे असं म्हणायचंच नाही आहे. Even माझं पहिलंच वाक्य “ माझा प्राॅब्लेम छोटाच आहे ‘ असं आहे. जगात अनंत भयंकर प्रश्न आहेत याची कल्पना आहेच. पण प्रश्नाचं स्वरूप लहान म्हणून महत्वही लहान असं होत नसतं ना . किती ेगळे परसपेक्टिव असतात ! आता हे सारं इथं मांडल्यावर हे कळलं आणि इतके लोक त्यावर बोलत असताना बघून किती छान वाटत आहे ते सांगता येणार नाही . कदाचित सोलुशन मिळालं तर ती value addition. नाही तरीही all is well. I am actually living with it ...

तुम्ही बायकोला, तुम्ही नक्की कशासाठी वाचता, फक्त अभ्यास, परीक्षा, जास्त पैसे कमावणे याशिवाय वेगळ्या कारणांसाठीही (रादर वेगळ्या कारणांसाठीच ) वाचायचं असतं हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांना असलेल्या एखाद्या छंदाचं उदाहरण द्या. अगदीच काही नाही, तर आपण खातो ते फक्त जगण्यापुरतं आणि पोट भरण्यापुरतं नव्हे तर जिभेचे चोचले पुरवायला हे सांगा. शक्य झालं तर त्यांनाही त्यांच्या आवडत्या विषयावर वाचन करुन पाहायला सांगा.
किंवा दोघांनी (मुलगा धरून तिघांनी )मिळून एखादं पुस्तक वाचा.