गँबलींग/ जुगाराच्या सवयीपासून सुटका करायचीय...

Submitted by भित्रा ससा on 28 December, 2017 - 21:31

वय वर्ष २९.५. गेल्या २.५ वर्षांपासून ज्या ठिकाणी राहतोय, तिथे गँबलींग लीगल आहे. इथे आलो, तेव्हा लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे सॅलरी खूप जास्त आणि खर्च मोजका. पैसे सेव्ह करत होतो, घरी पाठवत होतो. एफडी केल्या. हळुहळू एकटे राहण्याचा कंटाळा येऊ लागला, आणि एंटरटेंमेंटची साधनं, जागा शोधायला सुरू झालं. आधी नव्या देशात खूप फिरलो, अ‍ॅक्टीव्हिटीज सुद्धा केल्या. मित्र खूप असे नव्हते, पण ओळखी भरपूर झाल्या होत्या, महाराष्ट्र मंडळात बराच अ‍ॅक्टीव्ह होतो. हे सर्व करता-करता, कॅसिनोमध्ये जायची सवय लागली. तिथे छोट्या-छोट्या गेम्सपासून सुरुवात केली. पैसे जिंकायचो, बँकेत जमा करून ठेवायचो. कधीच कर्ज काढलं नाही, कुणाकडून उसने पैसे घेतले नाहीत. पण नंतर पुढच्या ६ महिन्यांत, सॅलरी आली, की कॅसिनोची पायरी चढायला लागलो आणि पहिल्या ४-५ दिवसांत फक्त महिन्याचा खर्च निघेल एवढेच पैसे उरायला लागले. पुढच्या काही महिन्यांत, ते सुद्धा नाही उरायचे. मग क्रेडीट कार्ड घेतलं, आणि बिलं / रेंट भरण्यासाठी कॅश अ‍ॅडव्हान्स घेऊ लागलो. पुढच्या सॅलरीत व्याजासह सगळं बिल भरायचो, मग उरलेल्या पैशात सगळी बिलं, महिन्याचा खर्च रेंट भागवायचो. मग आपली सवय आता व्यसनात बदलतेय, हे उमजून कॅसिनोपासून सेल्फ-एक्सक्लूजन घेतलं.
पुढचे दोन महिने व्यवस्थित गेले. पण कॅसिनोजच्या बाहेर पण, पोकीज नावाचे छोटेखानी कॅसिनोज चालतात, आणि तिथे पण त्याच मशीन्स चालतात, फक्त छोट्या डिनॉमिनेशन्समध्ये हे समजले. एक दिवस तिथली पायरी चढलो, आणि पुन्हा सेम चक्र सुरू झालं. गेल्या महिन्यांत या सगळ्याचा कहर झालाय, आणि क्रेडिट कार्डावर ७५% कॅश अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतली होती. ती फेडतो न फेडतो, तोच उरलेली रक्कम काल पुन्हा हरून आलोय.
हे सगळं इथे लिहून फक्त मन मोकळं करू इच्छितो. पुढची सॅलरी येईपर्यंत लढणार, पॉजिटीव्ह विचार करून आपण यातून बाहेर पडू म्हणून स्वतःला सावरणार आणि निराश होणार नाही हे जाणतो. पण ही सवय सोडण्यासाठी जे जे शक्य आहे ते करून झालंय, पण यातून बाहेर पडता मात्र येत नाहीये. घरी हे सगळं सांगू शकत नाही, किंवा मला आपल्या दु:खांचा पाढा वाचून आपण कमजोर आहोत हे दाखवता येत नाही, आणि कितीही वाईट परिस्थिती आली, तरी हार न मानता लढायचं असं वाटतं, पण मी कमजोर झालोय खरा. पैसा येईलही, पण माझा आत्मविश्वास डळमळतो, ओव्हर रिअ‍ॅक्ट सुद्धा होतो. मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधतो, सगळे कार्यक्रम अटेंड करतो, कुणालाच हे कळू देत नाही की मी माझ्या या सवयीमुळे आर्थिक अडचणीत आहे. उलट एका गरजू मित्राला भारतात पैशांची गरज असतांना, मी सध्याच्या माझ्या परिस्थितीतही मोठी मदत केलीय. कधी खूप पश्चात्ताप होऊन एकट्यात रडून घेतो, सावरतो आणि पुन्हा सारं सुरू करतो, पण अचानक हाव सुटते आणि सगळ्या तत्त्वज्ञानाचा, अक्कल-हुशारीचा कडेलोट करून येतो. काही चांगल्या गोष्टी आहेत/करतोय आयुष्यात, पण त्या घडायला/ पूर्ण व्हायला वेळ लागतोय आणि तोपर्यंत ही सवय मला सोडायचीय. होपफुली आय विल डू इट...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ऑफिस मीटींग, घरी जाऊन स्वैपाक, आणि व्यायामाला वेळ द्यायचा होता आणि म्हणून नाही गेलो. रात्री चित्रपट पाहिला, आणि शांत झोपलो. आता पुढची लढाई चालू... >> शाबास ! कीप इट अप. मोकळा वेळ असेल तर इन पर्सन क्लासेस, किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटीज सुरु करु शकता.

https://www.meetup.com/ इथे बूक क्लब पासून मॅरथॉन रनिंग पर्यत बर्‍याच प्रकारच्या गृप अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती मिळेल.

तुम्हाला हवी असलेली एखादी महागडी वस्तू किंवा घर घायचे ध्येय ठेवा आणि दरमहा थोडी थोडी रक्कम त्या खात्यावर जमा करत रहा.

पुढील प्रवासासाठी शुभेच्छा .

सही...
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्यासाठी..
आता ईथून माबोकरांचा विश्वास तोडणे तुमच्यासाठी अवघड आहे. पगाराचा दिवस काढलात म्हणजे सुटलीच की ओ तुमची सवय.. एंजॉय !

माणूस जुगारावर उतारा म्हणून जुगाराचाच सहारा घेतो आणि फसत जातो.. पण आता जुगार न खेळता चार पैसे गाठीशी जमा झाले या स्थितीतील आनंद आधीच्या महिन्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अनुभवला आहे. त्यामुळे आता तुमची पावले कसिनोकडे सहजतेने वळणार नाहीत. तसेच जर यात तुमचा कोणी पार्टनर नसेल, जो तुम्हाला पुन्हा तिथे वळवेल, तर मग शून्य टक्के चान्स ! Happy

इथे बोलण्याने हुरूप येतोय, की खरंच चांगलं पाऊल उचललंय... धन्यवाद तुम्हा सार्‍यांचे Happy
मेधा, तुमचा (महागडी वस्तू/घर घेणे) सल्ला मनात आहे, प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवात करेन. मीटप ची लिंक दिल्याबद्दल आभार.
ऋन्मेष, नक्कीच. पॉजिटीव्ह प्रतिसाद देणे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. धन्यवाद.
च्रप्स, तुमचे विचार प्रॅक्टीकल सोल्युशन्स आहेत, इट हेल्प्स. धन्यवाद .

खूप खूप शुभेच्छा.

एखादा छंद / कला जोपासता आली तर बघा.

उदा. चित्रकला, बेकिंग त्याने वेळ पण छान जाईल आणि परत कॅसिनो ई. ला जायची ईच्छा पण कमी होईल.

च्रप्स, तुमचे विचार प्रॅक्टीकल सोल्युशन्स आहेत, इट हेल्प्स. धन्यवाद .
>>>मीदेखील यातून गेलेला आहे त्यामुळे असेल कदाचित. ब्लॅकजाक वर खूप उधळले आहेत 2015 मध्ये. नंतर सावरलो.

मेधा, तुमचा (महागडी वस्तू/घर घेणे) सल्ला मनात आहे, प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवात करेन. मीटप ची लिंक दिल्याबद्दल आभार.
नवीन Submitted by भित्रा ससा on 1 February, 2018 - 06:54

एक (फुकटचा) सल्ला! वस्तू घेताना शक्यतो अशी घ्या की ज्याची किंमत उत्तरोत्तर वाढत जाईल. उदा. घर
घर आणि गाडी यांची तुलना करता घराची किंमत वाढत जाते तर गाडीची किंमत घेतल्यादिवसापासून कमी कमी होत जाते.

घराची किंमत वाढेलच असे नाही हो..
पण घर भाड्याने लावून उत्पन्नाचा एक पर्यायी स्रोत निर्माण करता येतो. शिवाय इमारत जुनी झाल्यावर पुनर्विकासासाठी (redevelopment) गेली तर आहे त्याच घराच्या बदल्यात आणखी थोडे मोठे घर मिळते.
शिवाय सोने चोरीला जाऊ शकते, घर नाही!

बरं, धागा कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली? वर जाण्यापूर्वी परत या Happy