मला आवडलेले काही हाॅलिवूड आणि टाॅलीवूड चित्रपट.

Submitted by अजय चव्हाण on 28 December, 2017 - 03:12

खुप असे चित्रपट असतात जे आपल्याला खुप आवडतात आणि इतरांनीही ते पाहावे असे आपल्याला वाटते तर हा धागा अशाच चित्रपटांसाठी आहे.

मला अत्यंत आवडलेल्या चित्रपटांची यादी मी खाली दिली आहे आणि तुम्हीही अशीच यादी देऊ शकता किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगितल्यास उत्तम..

1.Intersteller
2.Shownsank Redemption
3.The Walk
4.Lucy
5.The Martian
6.Conjuring 2
7.Perfume (Adult)
8.Taken & Taken 2
9.Inception
10.Train to Busan ( korean)
11.Persuit of Happiness
12.Orphan
13. Final Destination (all parts).

1.मगधीरा
2.हॅप्पी
3.आर्या & आर्या 2
4.टेंम्पर
5.चिरूठा
6.वेदलम
7.लकी द रेसर.
8.येवडू
9.ओरू वडकन सेल्फी (मल्याळम)
10.अपरिचित
11.प्रेमम ( मल्याळम)

टीप : टाॅलिवूड चित्रपटांची खरी नावे आहेत. हिंदीमध्ये डब असल्यास नावे वेगळी असू शकतात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिक्स्थ सेन्स
पॅसेंजर्स
द प्रपोजल
फायनल देस्टिनेशन ३

मगधीरा
ध्रुवा

मिर्ची
रेबेल
मिस्टर परफेक्ट
डार्लिंग
बाहुबली 1 आणि 2
मगधीरा
ध्रुवा
येवडू

खुप छान सस्मित..

सिक्स्थ सेन्स नावावरूनच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असं वाटतयं.

बघु वेळ मिळाला तर नक्की बघेन हा सिनेमा..

टकमक टोक माहीतीबद्दल धन्यवाद.
तमिळ चित्रपटसृष्टीला काय म्हणतात हे माहीत नव्हत..मला तेलगू आणि तमिळ दोन्ही चित्रपटसृष्टींना टाॅलीवूड म्हणत असतील असं वाटल होतं म्हणून लिहलं..

बाकी वर तुम्ही दिलेल्या कन्नड सिनेमे सबटायटल्ससह कुठे पाहायला मिळतील?

@ टीना मी इथे फक्त माझ्या आवडत्या सिनेमाची लिस्ट टाकली आहे...

आणि इथे बाकी माबोकराची लिस्ट मागितली आहे जेणेकरून एखाद्या चांगल्या कलाकृतीची आदान प्रदान करता येईल..

तुमच्या धाग्यावर बरेच प्रतिसाद आलेत आणि मला हव्या असलेल्या टाॅलिवूड आणि हाॅलीवूड सिनेमाबद्दल बघायच झालं तर खुप छाननी करावी लागते..

इथे शाॅर्टकट मध्ये अपेक्षित असलेलं मिळवता येईल म्हणून हा धागा काढलाय ..

माझ्यासारखं इतर कुणाला अपेक्षित असेल तर त्यांनाही सोयीच होऊ शकत ..हा दुसरा उद्देश..

अनिश्का ..

मिर्ची माझापण आवडता सिनेमा आहे... वरच्या लिस्टमध्ये लिहताना विसरलो...

च्रप्स
मुंगारे माले हा कुठला सिनेमा आहे?

किंग्ज स्पीच
ला ला लँड
रेव्हनंट
द थिअरी ऑफ एव्हरीथिंग
Everest

Mungaru male :

It was the first film in India (for any language) to be screened continuously for over one year in a multiplex,[7][8][9][10][11] and holds the record for the longest-running film at a multiplex in addition to having the highest recorded box-office collections in history of Kannada cinema and went on to become National Record in Indian cinema for running one year in PVR cinemas.[12][13][14][15][16][17][7] It ran over 865 days in Karnataka[18] and collected an estimated ₹50[2][3]–75 crore[4] (₹500–750 million). It was remade in 2008 in Telugu as Vaana,[19] in 2008 in Bengali as Premer Kahini [20][21] and in 2017 in Marathi as Premay Namaha.[22][23]

A sequel to the film titled Mungaru Male 2 was released in 2016.

Wiki

>>ह्याकरता एक सेपरेट धागा आहे माबोवर.. जेथे सगळे आपापले आवडते चित्रपट डिस्कसतात..
एकाच ठिकाणी पोस्टा ना प्लिज सर्व माहिती, नविन धागे कशाला.

एकाच ठिकाणी पोस्टा ना प्लिज सर्व माहिती, नविन धागे कशाला.>>+१

कोण जुना धागा शोधणार.>> काही असे कॉमन गोष्टीवर धागे काढण्यापूर्वी निदान या नावाने किंवा कंटेंटने कुठला धागा आहे का याआधी काढलेला याची खातरजमा करण्यासाठी मायबोलीच्या 'शोध' या सुविधेचा वापर करावा.. एखादा शब्द जसे इथे चित्रपट अस टाकुन शोध घेतल्यास त्यावरील सर्व धागे दिसतीलच तुम्हाला.

@टीना

साॅरी टू सेय बट तुमचा सल्ला मला हातात टी व्ही चा रिमोट देण्याऐवजी कोचावरून उठून मॅन्युली चॅनेल बदलण्यासारखा वाटला..

काही चुकीच लिहलं असेल तर माफ करा हा..खोचक बोलण्याचा हेतू नाहीये माझा फक्त जे वाटलं ते स्पष्ट बोललो इतकंच होप सो लहान भाऊ समजुन तुम्ही समजुन घ्याल..

English : mama , WALL•E ,

Tollywood : हल्लीच बघितलेला इंटरनॅशनल रावडी- इरु मुगन (बघाच एकदा), एकाडिकि (Ekkadiki Pothavu Chinnavada ) , मगधीरा, अपरिचित, आर्या & आर्या 2 .

तुमच्या धाग्यावर बरेच प्रतिसाद आलेत आणि मला हव्या असलेल्या टाॅलिवूड आणि हाॅलीवूड सिनेमाबद्दल बघायच झालं तर खुप छाननी करावी लागते..>> माझा धागा? तो जो धागा आहे तो दोन तीन भागात विभागला आहे.. आणि मी त्या धाग्याबद्दल म्हणतच नाहीए अहो.. तुम्ही हे जे लिस्ट दिलीए त्याबद्दलच म्हणतेय. एक धागा आहे ज्यावर सर्वांनी स्वतःच्या लिस्ट टाकलेल्या आहे.. असो..

काही चुकीच लिहलं असेल तर माफ करा हा..खोचक बोलण्याचा हेतू नाहीये माझा फक्त जे वाटलं ते स्पष्ट बोललो इतकंच होप सो लहान भाऊ समजुन तुम्ही समजुन घ्याल..>> इथे मी बस वाचायला येते.. खोचक बोलण म्हणुन मानु नका पण ते आई बाई बहिण भाऊ बाप काका मामा मावशी नकोच.. सध्याचे आहेत तेच पेलवेना त्यात इथे येऊन परत नात्याच्या भानगडीच नको..

मी तुम्हाला दिलेला सल्ला साधा सरळ होता.. तुम्ही इथे त्यामानाने नविन दिसता म्हणुन मदतीच्या हेतुने..
तुम्हाला रुचला नसेल तर नसो बापडा .. Happy