मायबोलीवर नवीन सुविधेच्या चाचणी साठी मदत हवी आहे

Submitted by webmaster on 27 December, 2017 - 13:08

मायबोलीवरच्या नवीन सुविधा, मायबोलीकरांनी वेळोवेळी केलेल्या चाचणीच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात आणू शकलो आहोत.

काही नवीन सुविधांच्या चाचणीसाठी मदत हवी आहे.
मदतीचा वेळ : एका भेटीत ५- १० मिनिटे
आठवडयातून किती वेळा: कमीत कमी २ वेळा, जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तसे.
किती काळासाठी: चाचणी सुविधा सगळ्यांना उपलब्ध होई पर्यंत , आजपासून अंदाजे २-३ आठवडे.
कामाचे स्वरूप : सुविधा तपासून तुमचा फीडबॅक देणे

वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात सुविधा कशा काम करतील हे तपासायचे आहे. वेळेअभावी सगळ्यांनाच यात सामील करून घेता येणार नाही. तुमची मदत होईल हे लक्षात आले की तुम्हाला एका नवीन ग्रूपमधे सामावले जाईल आणि तिथे पुढील सूचना मिळतील.

तुम्ही मदत करणार असाल, तर प्रतिसादात खाली माहिती लिहा.
तुम्ही मायबोलीवर यायला काय वापरता: मोबाईल/ डेस्क्टॉप
कुठला ब्रँड
ऑपरेटींग सिस्टीम आणि वर्जन (उदा. नुसते अ‍ॅन्ड्रॉईड, विंंडोज लिहू नका . अ‍ॅन्ड्रॉईड लॉलीपॉप , अ‍ॅन्ड्रॉईड ५.१ , विंंडोज १० असे लिहा)
तुमचा ब्राऊझर आणि वर्जन.

विषय: 

वेमा/अ‍ॅड्मिन,

अवल यांनी वर सांगितलेली अडचण "नवीन लेखन करायचे आहे?" च्या खाली नवीनच सुरू केलेल्या सदस्यनामावर क्लिक करून प्रोफाईलला डायव्हर्ट केल्यानंतर दिसत आहे. माझे सदस्यत्व मधून केल्यास ही अडचण येत नाही.

कृपया तपासावेत.

'माझे सदस्यत्व' या पानावर ज्याप्रमाणे आपण केलेले 'लेखन' पाहू शकतो, त्याप्रमाणे आपल्या 'प्रतिक्रिया' पाहण्याची सोय ठेवता येईल का?

admin साहेब धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल

>> शीर्षक क्रम नि मज्जा हा "विरंगुळा" ग्रूपातील वाहता धागा आहे
>> ३. मायबोलीवर नवीनः यात दिसणार नाही कारन तो वाहता धागा आहे.

याचे कारण मात्र कळले नाही. जे काही नवीन आहे ते (वाहते असो किंवा कसेही) "सगळ्या मायबोलीवरचे लेखन (माझे ग्रूप + इतर ग्रूप + नवे + आधी पाहिलेले)" यात दिसायला हवे असे युजरला अपेक्षित असेल ना...

पहिले काही दिवस, app सुरू केल्यावर लॉगिन करावे लागत होते, पण काल केलेले लॉगिन सेशन अजून valid दाखवत आहे. प्रत्येक वेळी लॉगिन करायचा आळस असणाऱ्याकरिता ही सुविधा चांगली आहे.

जे काही नवीन आहे ते (वाहते असो किंवा कसेही) "सगळ्या मायबोलीवरचे लेखन (माझे ग्रूप + इतर ग्रूप + नवे + आधी पाहिलेले)" यात दिसायला हवे असे युजरला अपेक्षित असेल ना...

>> +७८६

अरे काय हे? आम्हाला ही पानं दिसायला नकोत, ती पानं दिसायला नकोत, अशी लोकांची मागणी होती, म्हणूनच ती सोय दिलीय.
मायबोलीवर नवीनमध्ये फक्त वाहती पानं नाहीएत.
त्यासाठी माझ्यासाठी नवीन आहे की.
मायबोलीवर नवीनमध्ये सतत पाचसहा गप्पांची पानं, चार-पाच अन्ताक्षरी असं वर दिसत राहायला हवंय का?

>> मायबोलीवर नवीनमध्ये सतत पाचसहा गप्पांची पानं, चार-पाच अन्ताक्षरी असं वर दिसत राहायला हवंय का?
ह्म्म्म... पॉइंट आहे तुमच्या म्हणण्यात. पण काही वाहते धागे कुठेही क्लिक केले तरी गायबच असतात हे सुद्धा खरे आहे. नवीन कोणी त्यात लिहिले तर कदाचित दिसत असतील अन्यथा नाही. उदा. "शीर्षक क्रम नि मज्जा" धागा परवा शेवटी गुगलला साकडे घातले मगच दिसला.

मला 'शोध' मधे आधी दिसत होतं तसं काही का दिसत नाहीये... गुगल सर्च असं काहीतरी येतं.. जिथे फक्त इंग्लिश टाईप होतं आणी काही शोधता येत नाही माबोवरचे.... असं का ?

मला 'शोध' मधे आधी दिसत होतं तसं काही का दिसत नाहीये... गुगल सर्च असं काहीतरी येतं.. जिथे फक्त इंग्लिश टाईप होतं आणी काही शोधता येत नाही माबोवरचे.... असं का ?>>> अगदी अगदी. मलाही असाच अनुभव येत आहे. माबो वरच्या शोधासाठी काही वेगळी लिंक आहे का?

<पण काही वाहते धागे कुठेही क्लिक केले तरी गायबच असतात हे सुद्धा खरे आहे.>

त्यासाठी "ग्रुपमध्ये नवीन" आहे.

>> त्यासाठी "ग्रुपमध्ये नवीन" आहे.

जसे मी आधी उल्लेख केला त्यानुसार नवीन प्रतिसाद असेल तरच दिसतो इथे सुद्धा. "ग्रुपमध्ये नवीन".
असो. त्याला निवडक दहा मध्ये टाकून समस्या सुटली आहे सध्या.

नवीन प्रतिसाद नसलेली वाहती पानंसुद्धा ग्रुपमध्ये नवीनमध्ये दिसतात. तूम्ही त्या ग्रुपचे सदस्यत्व घेतलेले असायला हवे.

विंडोज ७, क्रोम ६१.०.६१६३ , काही जुन्या धाग्यांवर आयडीच्या पुडे अन व्हेरिफाइड असे दिसतेय. या धाग्यावर नाही. टॉमेटो राइस धाग्यावर

>काही जुन्या धाग्यांवर आयडीच्या पुडे अन व्हेरिफाइड असे दिसतेय.
२००८ मधे जुन्या मायबोलीवरून नवीन मायबोलीवर स्थलांतर चालू होते त्यावेळेस काही त्रूटी राहून गेली दिसतेय.

कुणाच्या अवलोकनात गेले तर वर त्या व्यक्तीचे नाव बोल्ड मधे दिसू लागते, त्यानंतर त्याच्या निवडक १० मधे गेल्यावर देखील त्या व्यक्तीचे नाव वर बोल्ड मधे दिसते. परंतू जेव्हा "विचारपूस" मधे गेले तर त्या व्यक्तीचे नाव न दिसता विपू जो करत आहे त्याचे नाव बोल्ड मधे दिसत आहे. प्रोटोकॉल नुसार तर समोरील व्यक्तीचे नाव दिसायला हवे ना? Uhoh

हो. हो. हा विपुचा गोंधळ परवाच दिसला.
रच्याकने: त्यात कुणी विपु वाचा असं लिहिलं आणि आपण वाचे पर्यंत ती डिलिट मारली तर आपण कोणाच्या विपुत बघतोय... आपण खुमासदार काही तरी मिसलं याची टोचणी आणि दुसर्‍याच्या विपुत काही रेफरंस बघायला जावं तर "विपु नसती डिलिट केली तरी चाललं असतं" अशी मखलाशी असं सगळं दिसलं की अगदीच हिरमोड होतो.
मायबोलीवरचं मिसलेलं गॉसिप असा एक बीबी हवा बॉ! Wink

कालपासून एक अडचण जाणवतेय. नवीन प्रतिसादावर टिचकी मारल्यावर धागा पटकन उघडतोय, पण कर्सर नवीन प्रतिसादावर पोहोचायला फार वेळ लागतोय. प्रत्येकवेळी अंदाजे दहा सेकंदाचा वेळ लागतोय. अजून कोणाचे असे होतेय का?

Pages