चरैवेति . . . चरैवेति . . . - भटकंती मागोवा २०१७

Submitted by जिप्सी on 27 December, 2017 - 10:19

बघता बघता २०१७ वर्ष संपायला आता काही दिवसच उरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या भटकंतीचा मागोवा घेताना जाणवले कि यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा थोडं कमीच भटकलो. नविन वर्षाची सुरूवात किल्ले तोरणाच्या दुर्गभ्रमंतीने झाली. नंतर निसर्गरम्य दापोली, सिन्नर, नाशिक येथील श्री गोंदेश्वर व ऐश्वर्येश्वर मंदिर व गारगोटयांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह असलेले गारगोटी संग्रहालय, नगर जिल्ह्यातील अकोले येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर व टाहाकारी येथील श्री जगदंबा मंदिर, मुंबईतील काहीसे दुर्लक्षित सायन व रिवा किल्ले, राणीबाग व भाऊ दाजी लाड संग्रहालय, रायलिंग पठारावर लिंगाण्याच्या सहवासातील भटकंती, अलिबाग येथील आवास-वरसोली बीचवरील भटकंती, पावसाळ्यातील धुंदमय महाबळेश्वर-पाचगणी भटकंती, पंढरपुर वाखरी येथील उभे रिंगण आणि विठोबा माऊलींच्या मंदिराचे कळस दर्शन, पालघर येथील केळवा बीच वरील भटकंती, कसारा विहिगाव येथील धबधबा, अप्पर वैतरणा, ६० मेगा वॅटचा विद्युत प्रकल्प, इगतपुरी, माळशेज घाट, नाणेघाट, सातारा शहर, ठोसेघर धबधबा, सज्जनगड, चाळकेवाडी पवनचक्की व फुलांचे पठार, वाई मेणवली येथील नाना फडणविसांचा वाडा व कृष्णेकाठचा मेणवली घाट, रायरेश्वर पठार, किल्ले रतनगड व किल्ले हरिहर गड दुर्गभ्रमंती, भांडुप पंपिंग स्टेशन येथे पक्षीनिरीक्षण, मायबोलीवरील निसर्गाच्या गप्पा ग्रुपमधील काही सदस्यांसोबत बदलापुर, राणीबाग, उरण, सागर उपवन, बेलापुर येथे निसर्ग व खादाडी गटग.

२०१७ मधील भटकंतीच्या आठवणींचा हा पिटारा

(०१) जानेवारी :- किल्ले तोरणा अर्थात प्रचंडगड दुर्गभ्रमंती

|
(०२) फेब्रुवारी :- कोकणच्या गालावरची खळी-दापोली भटकंती

|
(०३) मार्च:- सिन्नर (गोंदेश्वर, ऐश्वर्येश्वर मंदिर, गारगोटी संग्रहालय) अकोले (सिद्धेश्वर मंदिर, टाहाकारी जगदंबा मंदिर)

|
(०४) एप्रिल:- सायन किल्ला, रिवा किल्ला, राणीबाग, भाऊ दाजीलाड संग्रहालय - मुंबई भटकंती

|
(०५) मे :- रायलिंग पठार

|
(०६) जुन:- आवास-वरसोली-अलिबाग भटकंती

|
(०७) जुलै :- आषाढीवारी (पंढरपुर, वाखरी येथील रिंगण)

|
(०८) ऑगस्ट :- अप्पर वैतरणा-इगतपुरी पावसाळी भटकंती

|
(०९) सप्टेंबर :- माळशेज घाट, नाणेघाट पावसाळी भटकंती

|
(१०) ऑक्टोबर :- सातारा-वाई-रायरेश्वर भटकंती

|
(११)नोव्हेंबर:- किल्ले रतनगड दुर्गभ्रमंती

|
(१२)डिसेंबर:- किल्ले हरिहर अर्थात हर्षगड दुर्गभ्रमंती

|
निसर्गायण ग्रुपच बदलापुर येथील आरण्यक फार्म हाऊसवर निसर्गायण कम खादाडी गटग Happy

|
निसर्गायण ग्रुपचा मायबोलीकर जागू, साधना यांच्या घरी आणि राणीबाग येथे निसर्गायण कम खादाडी गटग Happy

|
___/\___यावर्षीही ज्यांच्यासोबत यावर्षी मनसोक्त भटकंती करता आली त्या सर्वांचे मनापासुन आभार ___/\___
 Happy समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy

Group content visibility: 
Use group defaults

Wah...

अप्रतीम भटकन्ती!
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जिप्सी, घरी गेल्यावर तुझी पत्रिका ( खरी जन्म कुंडली ) बघुन सांग की चंद्र कोणत्या स्थानात आहे ते. नक्कीच पहिल्या, तिसर्‍या किंवा ९ व्या स्थानी असावा. फार नशीबवान आहेस. असाच भटकत रहा आणी आम्हाला मेजवानी देत रहा. नवीन वर्षाच्या तुला व तुझ्या कुटुंबीयांना अनेक शुभेच्छा.

मस्त फ़ोटो आणि भटकंती!
जिप्स्या, खरचं नशीबवान आहेस. असचं तुला खूप खूप भटकायला मिळो, आणि आम्हाला फ़ोटोंची मेजवानी मिळो. Happy

सुंदर गोषवारा.
तुला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
असाच भटकत रहा आणि फोटो काढून आम्हाला पण त्या निमित्ताने व्हर्चुअल टुर घडवून आण.

अप्रतिम! डोळ्यांचं पारणं फेडलंस अगदी. तुलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा __/\__
जर शक्य झालं तर (०१)फोटोमधला तो घर आणि झाडाचा फोटो आहे ना त्यात saturation, contrast वाढवून पूर्ण फोटो टाक ना. खूप छान आकृतीबंध आहे त्या फोटोत.

Khup Chan Pudhil bhatkantisathi shubhecha

मला चरेवेती म्हणजे चरणेच लक्षात राहते. जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा भापोच झालेले, नंतर कळल्यावर थोडी निराशा झाली.

जिप्सी तुझा खरेच हेवा वाटतो. कसे जमावतोस हे सगळे शनिवार रविवारच्या दोन दिवसात.

बाकी फोटोंबद्दल काहीच म्हणायचे नाहीय, तेच ते शब्द वापरून गुळगुळीत झालेत आता.

वॉव काय कन्सिस्ट्न्सी आहे. नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा..... असाच भटकत राहा आणि आम्हाला फोटुन्ची मेजवानी देत राहा Happy

भारी झाली २०१७ ची भटकंती!

बाकी फोटोंबद्दल काहीच म्हणायचे नाहीय, तेच ते शब्द वापरून गुळगुळीत झालेत आता >>> + १००

शिर्षकात चरैवेति अस हवंय, चरैवैति नाही.

सुंदर आढावा .
येणाऱ्या नवीन वर्षात ही तुझी अशीच भटकंती होऊ दे म्हणजे आम्हाला असे सुंदर सुंदर फोटो बघायला मिळतील.

....फोटोंबद्दल काहीच म्हणायचे नाहीय, तेच ते शब्द वापरून गुळगुळीत झालेत आता +१
नवीन वर्षातल्या फोटोंच्या प्रतिक्षेत..