उच्च विचारसरणी

Submitted by भरत. on 27 December, 2017 - 00:21

कर्नाटकातल्या कोपल जिल्ह्यातील कुकनूर येथे ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर लोक, भारताची घटना यांबद्दलचे आपले मौलिक विचार श्रोत्यांपुढे मांडले.
" आजकाल सेक्युलर प्रस्थ बोकाळलं आहे. कोणी म्हटलं की, " मी मुस्लिम आहे, मी ख्रिस्ती आहे, मी लिंगायत आहे किंवा मी हिंदू आहे," तर मल बरं वाटतं; कारण या लोकांना त्यांचं मूळ माहीत असतं. पण हे जे लोक स्वतःला सेक्युलर म्हणवतात, त्यांना काय म्हणावं तेच मला कळत नाही. या लोकांना आपल्या धमन्यांतून कोणाचं रक्त वाहत आहे, हे माहीत नसतं. त्यांना स्वतःची अशी ओळख नसते. आपले आईबाप कोण आहेत हे माहीत नसतं. पण हे लोक बुद्धिवादी असतात."
पुढे ते म्हणाले, लोकांनी आपापल्या धर्माच्या आणि जातीच्या आधारावर ओळखलं जावं. अशा व्यक्तींना मी नमन करेन. पण तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवत असाल तर तुम्ही आहात तरी कोण? असा प्रश्न मला पडेल.

भारताच्या घटनेबद्दल ते म्हणाले "भारताची घटना ही जणू आंबेडकरस्मृति आहे. मला या घटनेबद्दल आदर आहे. पण यापुढे ती बदलली जाईल. आम्ही इथे (सत्तेत/राजकारणात) त्यासाठी आहोत. त्यासाठीच आम्ही इथे आहोत."

सेक्युलरिज्मपासून भारताच्या घटनेची मुक्तता करणे, (भारतीय मूल्यांची तिथे प्रतिष्ठापना करणे) , ज्यायोगे प्रत्येकाला आपल्या धर्माने, जातीने, वंशपरंपरेने (इथे वंश= बीज, रक्त, गुणसूत्र bloodline) ओळखले जाऊ शकेल, हे भाजपचे ध्येय आहे.

सरसंघचालकांनी ज्याचं अनेकदा सूतोवाच केले आहे , ते विचार, बेत, उद्दिष्ट एका भाजप सदस्याकडून, केंद्रीय मंत्र्याकडून, कर्नाटकच्या संभाव्य मुख्यमंत्र्याकडून उघडपणे सांगितले गेले हे छान झाले.

टीप : इथे मला बिहारी लोकांच्या डीएनएत असलेल्या दोषांची आठवण झाली. शस्त्रक्रिया करून ते डीएनए आता सुधारले आहेत. पण आपण कोणत्या वंशाचे आहोत हे माहीत नसणे यासाठी प्रत्येक बोलीभाषेत काही ना काही सुंदर शब्द आहेत. ते इथे लिहायची गरज नाही. अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर लोकांसाठी एक नवे विशेषण सुचवून नेटभगव्यांसाठी एक टांकसाळच उघडून दिली आहे. त्यांचे अभिनंदन.

टीप :- भाजपच्या उच्च विचारसरणीचे साक्षात्कार घडवणारे आणखीही काही प्रसंग गेल्या दोनतीन दिवसांत घडले आहेत. त्यांबद्दल क्रमशः याच धाग्यावर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली वंशपरंपरा काय आहे हे माहीत नसतं.
<<
त्यांना आपले आईबाप कोण हे ठाऊक नसतं असं ते मूळ संस्कारी वाक्य आहे, भरत.
Better call a spade, a spade.

महाराष्ट्रात एक कॉन्ट्रोव्हर्शीयल लेखक आहेत ,नाव घेत नाही.या उजव्या विचारसरणीच्या जातदांडग्यांच्या धमण्यांमध्ये ॲक्च्युली कोणाचे रक्त सळसळत असते त्याचं फार सुंदर विश्लेषण त्यांनी केले होते.मी स्पष्ट लिहले असते पण नियमांची मर्यादा आहे.

मी बातमी इंग्रजीत वाचलीय. त्याचा अनुवाद केलाय. कन्नड समजणार्‍यांकडून त्यांच्या मूळ शब्दांचा अनुवाद करून घेतो.

अतिशय गलिच्छ भाषा आणि हेतू,

भाजप, रोज नवीन नीचांक गाठते आहे, आताशा त्यांचा निषेध करायचा सुद्धा कंटाळा येऊ लागला आहे,

यांची आणि यांच्या संघटनेची आयुष्य लोकांमध्ये जातीयवाद आणि धार्मिक तेढ वाढवण्यात खर्ची झालेले आहे त्यामुळे सेक्युलर म्हणून एकत्रित लोक बांधलेले त्यांना बघवत नाही.
भाजपात अश्या चांडाळ चौकडीचा जास्त भरणा झालेला आहे.
एकीकडे संविधान दिवस साजरा करायची नौटंकी करायची आणि दुसरी कडे अशा लोकांना "छु" म्हणत मोकळे रान द्यायचे. ही बाजपाची जुनी खेळी आहे.
हे भाषण दुसर्या कुठल्या समाजाच्या मेळाव्यात दिले असते तर फाटक्या कपड्यावर घरी गेला असता.

राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. लायकी नसणाऱ्याना तर ती जरा जास्तच असते.. त्यामुळेच आजच्या राजकारणात वाचाळवीर बनून सवंग प्रसिद्धी मिळवणार्यांचा बाजारच जास्त भरलेला दिसतो. काहीही करून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात. आपल्या वक्तव्याचा काय परिणाम होईल, याची यांना कुठलीच तमा नसते.. या बोलभांडाना काहीही करून प्रसिद्धी हवी असते. एकदा यांच्या गळ्यात एखाद्या पदाची माळ पडली की ही मंडळी बोंबा ठोकायला मोकळी होतात....केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांची तथाकथित वक्तव्य हि याचाच एक भाग आहे..यासाठी 'अकलेचे तारे तोडणे' हाच शब्दप्रयोग योग्य राहील.

हि वक्तव्ये " तथाकथित" आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

"तथाकथित गोष्ट " म्हणजे माझ्या सुमार बुद्धी प्रमाणे "सांगितली जाणारी गोष्ट, खरी खोटी माहित नाही , here say, " असा अर्थ होतो.
त्या एका शब्दाच्या वापराने तुमच्या प्रतिसादाचा अर्थ बदलतो असे मला वाटते.

तथाकथित शब्द हा 'विवादास्पद' आशयानेही वापरल्या जातो.. माझ्या माहितीप्रमाणे.. बाकी मातृभाषा असली तरी व्याकरणाच्या बाबतीत माझी गफलत झाल्याचे मान्य करत काही चुकले असल्यास क्षमस्व..

प्रसिद्धी मिळण्यासाठी केलेली बेताल बडबळ, वाचाळ वक्तव्य, परिणामांचा विचार केलेला नाही, या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत. ही विधाने त्यांची विचारसरणी दर्शवतात. ती उघड करण्याची योग्य वेळ आता आली आहे असं त्यांना वाटतंय.
ती बातमी वाचताना मला रोलिंगबाईचं प्युअर ब्लड, मगल्स, मडब्लड, इ. आठवले.
दरम्यान AIMIM शी संबंधित गुरुशांत पट्टेदार नावाच्या एका पंचायत सदस्याने हेगडे यांचे जीभ कापून आणणार्‍याला १ करोडचे इनाम जाहीर केले आहे. या मूर्खपणाबद्दल आणखी काय बोलणार?

ह्याच महाशयांनी आम्ही संविधान बदलण्यासाठी'च' सत्तेवर आलो आहोत असेदेखिल वक्तव्य केले आहे.
हा माणूस केंद्रात मंत्री आहे. प्रधान सेवक ना त्याची कानउघाडणी करत ना त्याला त्याची वक्तव्ये माघारी घ्यायला लावत. एकूण काय 'मागचे मौनमोहन' आणि हे ५६ इंच वाले यांच्यात तसा काही फरक नाही.. हे सुद्धा सोयीचे नसेल प्रकरण तर मूक राहतात. मग यांच्या मौनाला संमती समजले जावे का?

लोकांनी भाजपसारख्या जातवादी धर्मवादी पक्षाला मत दिले आहे व लोक त्यांच्या कर्माची भळे भोगत आहेत.
आज घट्ना बदलत आहेत ,उद्या न्यायनिवाड्याचे काम शंकराचार्याला देतील .भोआकफ

भाजपच्या पदाधिकार्‍यांना विरोधकांच्या वंशपरंपरेत खूप रस असतो.
हार्दिक पटेलमध्ये नेहरूंचे डीएनए आहेत. राहुल गांधी अल्लाउद्दिन खिल्जीच्या नात्यातल्या आहे. ही विधानं अनुक्रमे भाजपचे आयटीसेल प्रमुख अमित मालवीय आणि प्रवक्ते GVL Narasimha Rao यांची आहेत.

नक्की काय प्रॉब्लेम आहे बिचार्‍यांचा?

हेगडेचं स्टेटमेंट निषेधार्ह, चूक आहे.

हे भाषण दुसर्या कुठल्या समाजाच्या मेळाव्यात दिले असते तर फाटक्या कपड्यावर घरी गेला असता.

प्रदीपके यांचं हे वाक्य तुम्हाला आवडलं असावं भरत अन्यथा निषेध केला असतात. 'हा ज्यू समाज सरसकट असाच' म्हणून जग पादाक्रान्त करणारा हिटलर आठवला. वरील स्टेट्मेंटमधील एका समाजाला टार्गेट करणं आणि कपडे फाडण्याची भाषा संविधानाला धरूनही असेलच तुमच्यामते.
हेगडे चूक आहेच. प्रदीपके मात्र योग्यच बोलत असावेत. अभिनन्दन.

केंद्रीय मंत्र्याकडून अशा भिकार,बेताल वक्त्तव्यं होतात तेव्हा कपाळाला हात लावण्यापलिकडे काय करु शकतो.

बागड्यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपात, खुनी आणि वेडे सोडून सर्वांची भरती चालू आहे.

तुम्ही तुमचे शब्द माझ्या तोंडी कोंबू नका. त्याबद्दल मी काहीही लिहिलेलं नाही, म्हणजे त्यांना माझं समर्थन आहे हा अर्थ काढण्यासाठीच तुम्ही नक्की इथे याल अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली.
तुमच्या लक्षात आलं नसेल, तर त्यांच्या कोणत्याही प्रतिसादावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही. मग भले ती मला पटणारी असो वा नसो. अर्थात मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. माझे विचार काय आहेत हे मला नक्की माहीत आहेत.

तुम्ही त्यांना इतकं इग्नोअर मारता हे माहीत नव्हतं. लोल्स!
एनिवेज, पण मुद्दा हाच की ही मानसिकता काँग्रेस समर्थक विचारसरणीच्या लोकांच्याही मनातही भरलेली आहे आणि ती अशी व्यक्त होऊन जाते. त्यामुळे एकट्या भाजपला दोष देऊ शकत नाही.
एनिवेज भाजप पक्ष व सरकारने हेगडेंशी असहमत असल्याचे सांगितलं आहे.

ओ ... माझ्यापाशी बोला
काय बारगळला माहीत आहे का तो? मी तिथे असतो तर पायतान घेतले असते. सेक्युलर लोकांना स्वठाचे आई बाप माहीत नसतात हे वाक्य बोलला आहे. तुम्हाला काय त्या वाक्याचे कौतुक वाटत आहे? मार देण्याच्याच लायकीचे ते वाक्य आहे. कोण हा मोठा लागून गेलाय इतरांचे आईबाप काढणारा?
आनि तुम्ही इथे जाब विचारात आहे ... काय म्हणायचे काय तुम्हाला? त्याची अशा वाक्यावद्दल आरती ओवाळ्याची इच्छा आहे?
जरा सुधारा.. भाजपा गटारात जाऊन पडला तरी तुम्ही गंगेत अंघोळ करतोय म्हणाल..
पुढच्या वेळेस वैयक्तिक मानसिकता काढायच्या आधी सनव विचार करून बोल.

सनव,
तुम्ही एक सोशल मीडियावरील id ची तुलना केंद्रीय मंत्र्याबरोबर करत आहात? Are you serious?

हेगडे जे बोलले त्याचा हिंदीत अनुवाद:-
सोमवार को हेगड़े ने जनसभा में कहा कि एक नई परंपरा चलन में है जिसमें लोग अपने आप को धर्मनिरपेक्ष बताते हैं। उन्होंने जोर देकर कहा कि उन्हें खुशी होगी अगर कोई यह दावा गर्व से करे कि वह मुस्लिम, ईसाई, लिंगायत, ब्राह्मण या हिंदू है। केंद्र सरकार में कौशल विकास एवं उद्यमिता मंत्री हेगड़े ने कहा, 'मुझे खुशी होगी क्योंकि वह व्यक्ति अपनी रगों में बह रहे खून के बारे में जानता है। लेकिन मुझे यह नहीं पता कि उन्हें क्या कहकर बुलाया जाए जो अपने आप को धर्मनिरपेक्ष बताते हैं।'

आता मला काय वाटते मी हिंदू असण्या बद्दल:-
मी एकाच वेळेस असे म्हणू इच्छिते की मी हिंदू असल्याची मला लाज वाटत नाही. अभिमान वाटतो असं म्हंटल तरी हरकत नाही. पण त्यात माझा धर्म महान आणि इतरांचा घाण ही भूमिका नाहीये किंवा नसावी.प्रत्येकालाच स्वतःच्या धर्माला कुणी कमी लेखलेलं आवडत नाही.
ऑब्जेक्टिव्हली सर्व धर्मांची तुलना होणार असेल आणि त्यात प्रत्येक धर्माच्या गुण दोषा विषयी ऑब्जेक्टिव्हली चर्चा होणार असेल तेव्हां कुणी हिंदू धर्माचे गुण आणि दोष दाखवून दिल्यास माझी हरकत नाही.पण तसे होत नसतांना संधी मिळाली की येता जाता फक्त माझ्याच धर्माला जे नावं ठेवतात किंवा कमी लेखतात,काही जणांच्या वागण्या वरून आख्या हिंदू धर्मा विषयी ग्रह करून घेतात ते मला रुचत नाही.

Secular हा शब्द प्रथम constitution मध्ये आहे त्याचा अर्थ धर्म निरपेक्ष किंवा प्रत्येकाला आपला धर्म मानण्याची मुभा आहे.
मुळात secular आहोत म्हणून आपल्या roots माहिती नाहीत किंवा त्या बद्दल आम्ही इंसेन्सिटीव्ह आहोत असा अर्थ का लावल्या जातो? secular म्हणजे आपल्या roots बद्दल जाणीव आहे आणि आपल्याला जसे आपले roots भावनिक दृष्ट्या प्रिय आहेत तसेच इतराना त्यांचे प्रिय आहेत ह्याचे भान राखणे म्हणजे secular.

Secular आणि atheism वेगळं त्याची गल्लत होता कामा नये. Atheist लोक धर्मच मानत नाहीत आणि देवही नाही त्यामुळे त्यांच्या बाबतीत धर्म निरपेक्ष असण्याचा सवाल येत नाही.पण बऱ्याच वेळा हिंदू धर्मातले atheist प्रोग्रेसिव्ह होण्याच्या नादात फक्त हिंदू धर्माचेच दोष दाखवताना दिसतात. त्या वेळेस कुणी इतर धर्माचे दोष दाखवयास गेले तर त्यांना तुम्ही secular नाहीत असे हेच लोक म्हणतात. हे माझ्या पल्ले पडत नाही.

ह्यात भाजप चे हे नेते असल्या लोकांमुळे सगळ्या लोकांना एकाच तराजूत तोलल्या जाते. प्रत्येकाकडे आधी संशयानी बघितल्या जाते, चाचपडल्या जाते-हा कोण आहे सिक्युलर आहे की नाही. थोडं जरी बोलणं इकडे तिकडे झालं किंवा इतर secular जनतेशी मेळ खात नसेल तर secular नाही असा ठपका लागलाच असे समजा. असे आपण आपल्याच लोकां मध्ये विभाजित झालो आहोत.

सिम्बा, हे उदाहरण या धाग्यावरच आहे म्हणून दिलं, irony वाटली म्हणून. एकीकडे हेगडे यांचा निषेध करायचा दुसरीकडे एका समाजाला हेट करत राहायचे हा दुहेरीपणा झाला.

तसं कोंग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्रयांनी ट्विटरवर दिलेल्या अश्लील शिव्या, मोदींबद्दलची वक्तव्ये, सिद्धरामय्या कर्नाटकात करत असलेलं जातीय राजकारण, गुजरातेत केलेलं आरक्षणाचं राजकारण, एका विशिष्ट धर्माचा देशातील रिसोर्सेवर पहिला अधिकार हे मनमोहनांचं वाक्य.राहुलचं जानवं याबद्दल माहिती आहेच. त्यामुळे भाजपमध्ये एक हेगडे असला तर कोंग्रेसचं पूर्ण राजकारणच जातपात धर्म याभोवती फिरणारे आहे.

ज्या सभेत तो हे लज्जास्पद वाक्य बोलला कोणी विरोध केला का? नाही याचा अर्थ एक तर ती लोक सेक्युलर नाहीत आणि त्याचा त्या वाक्याला पाठिंबा होता असेच समजले जाणार.

जसे सनव यांनी भरत यांचे समर्थन समजले आहे.
तोच न्याय त्या सभेत उपस्थित लोकांना लावा मग

तसं कोंग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्रयांनी ट्विटरवर दिलेल्या अश्लील शिव्या, }}}}}}

जरा विचार करून लिहा.. कोणत्या अश्लील शिव्या सांगा बर नाही तर माफी मागा

एका विशिष्ट धर्माचा देशातील रिसोर्सेवर पहिला अधिकार हे मनमोहनांचं वाक्य.}}}}}
काहीही लिहायचे ? विशिष्ट धर्म ? की अल्पसंख्याक? काय तुमची कुजकी मानसिकता अरे रे रे कीव यायला लागली आता..
मनमोहन सिंग साहेब म्हणाले की बहुसंख्य असलेल्या जनतेने अल्पसंख्याक लोकांना प्राधान्य द्यावे. अल्पसंख्याक मध्ये शीख मुस्लिम जैन पारसी बरेच जण येतात पण तुमच्या मानसिकतेला मुस्लिम शिवाय काही दिसत नाही

खोटे बोंबला आणि रेटून बोला हे तुमच्या भाजप्याचे सवय आहे

मुळात घटना बदलण्यात चूक काय आहे?
घटना हे काही अपरिवर्तनीय कुराण बायबल गीता सारखे धर्मग्रन्थ तर नाही ना?
कालानुरूप घटना बदललीच पाहिजे , जर ती परिवर्तनीय नसती अथवा १००% पर्फेक्ट असती तर इतक्या १७६० घटनादुरुस्त्या कराव्या लागल्या असत्या का? याचा विचार करावा...

उगाच घटना आणि घटनाकार हा संवेदनशील विषय बनवून आपल्या राजकीय पोळ्या भाजणार्‍या महाभागाना हे घटनेचे तुणतुणे वाजवत भाजपच्या नावाने रडगाणे गायची जुनी खोड आहे ......

घटना दुरुस्ती वेगळी आणि सडक्या मानसिकतेतून घटना बदलण्याची वलग्ना करणे वेगळे मंदार

घटना हे काही अपरिवर्तनीय कुराण बायबल गीता सारखे धर्मग्रन्थ तर नाही ना?

<<

हाय कात्रे.
आखातातून भारतात आलात का परत?

तुमचे हिंदुत्व अन विचार कोणे एके काळी केळ्याची साल सोलल्यागत सोलले होते असे वाटते. पुन्हा सुरू करू या का?

ता.क.
आखातातली नोकरी (आयमीन मुसलमानांकडची,) सोडून परतला असाल, तर मनुस्मृती बदलायचं काम जॉईंट व्हेंचर म्हणुन इंडिया मेकिन स्टार्टप सुरू करू आपण. बघा जमत असेल तर माबो संपर्क सुविधा आहेच.

त्यामुळे भाजपमध्ये एक हेगडे असला तर कोंग्रेसचं पूर्ण राजकारणच जातपात धर्म याभोवती फिरणारे आहे.
<<
हेगडे चूक आहेच. प्रदीपके मात्र योग्यच बोलत असावेत. अभिनन्दन.
<<

अजूनही सनवमहाशय भाजपा आयटीसेलचे हँडल आहेत, असे कुणाला वाटत नसेल, तर गमतचच्चै Lol

रच्यकने, प्रदिप,
तुम्ही अन भाजपाचे केंद्रिय मंत्री एकाच लेव्हलचे आहात असे "प्रधानसेवक" स्टाईल प्रतिपादन वाचून कंट दाटून आला बर्का.

हेगडेला "असला" वगैरे बोललं, आय मीन हेगडे"जी" ऐव"जी", तर आम्ही किती संतुलित हेच सिद्ध होते, हे यानिमित्ताने सिद्ध झाले, असे म्हणतो.

प्रदीपके, थापा मारु नका. पंतप्रधान मनमोहन एका धर्माचं नाव घेऊन बोलले होते त्यांचाच पहिला अधिकार असं. गुगल करून बघा.
https://m.timesofindia.com/india/Muslims-must-have-first-claim-on-resour...

Pages