पोटी एक मुलगी जरूर असावी ...

Submitted by संजय जोशी on 24 December, 2017 - 04:47

पोटी मुलगी नसलेल्या एका बापाची खंत या कवितेतून मांड्यांचा प्रयत्न करतो आहे ...
रसिक माय बाप गोड मानून घ्या .....

======================================
पोटी एक मुलगी जरूर असावी...
तीच्या जन्मावर आनंदाने बर्फी वाटण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बेटी धनाची पेटी, असे बाबाला गर्वाने म्हणण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
प्रेमाने पहिला शब्द, बा ss बा म्हणण्यासाठी ..

पोटी एक मुलगी जरूर असावी...
इवल्याश्या पायात पैंजण घालून, छूम छूम घरात धावण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
छानसा फ्रॉक घालून , परी भासण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबा माझा सुपरमॅन , असं म्हणण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी ...
पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
रडू नको ना बाबा म्हणण्या साठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
मुलगी असून आईची माया देण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबाला बरं नाही, म्हंटल्यावर धावत माहेरा येण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबाचे, बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी...
बाबा गेल्यावर, सगळ्यात जास्त शोक करण्यासाठी ...

पोटी एक मुलगी जरूर असावी ... पोटी एक मुलगी जरूर असावी ...
===========================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजय छान कविता. मी इथे एकटे पालक फ्लॅग बेअरर आहे. तर कायम बाबांची अनुपस्थिती कशी हँडल करावी असे विचार डोक्यात असतात. हे सर्व करायला बाबा हवा होता गं असं मनात कायम येत असतं म्हणून ही कविता बरेच दिवस वाचलीच नव्हती. सो स्वीट. तुम्हाला एक गोड नात नक्की देइल देव.

आ़ज परत वाचली ही कविता, खुप खुप खुप आवडली.

पहिल्यांदा जेव्हा तुम्ही टाकली न ईथे तेव्हाच वाचली होती पण तेव्हा खुप हळवी झाले होते, टचकन डोळ्यात पाणीच आले, सो प्रतिसाद दिला नव्हता.