कापीलोट्यातली कॉफ़ी ....२

Submitted by नितीनचंद्र on 22 December, 2017 - 08:34

कॉफ़ीची अनेक स्वरुपे भारतात आणि भारताच्या बाहेर प्रचलीत आहेत. कॉफ़ी चे प्रकार ते बनविण्याची पध्दत, ते पिण्याची पध्दत आणि त्यासोबत घडणार्या गोष्टी यावर एखाद्याला पीएचडी करता यावी इतका मोठ्ठा विषय आहे.

एकदा एका मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा तो घरी नसताना त्याच्या बहिणीने कॉफ़ी दिली. मी सहजच म्हणालो की छान झाली आहे कॉफ़ी. ती धीटपणे म्हणाली की मुद्दाम लक्षात राहील अशी कॉफ़ी बनविली आहे. ती कॉफ़ीवाली अशी काय मनात बसली की बस. दररोज भेटते. आता विषय बदलले आहेत. आम्ही आमची मुलगी आणि तिचा मुलगा यावर सध्या बोलतो. कधी तरी मुडात असल्यावर ती कॉफ़ी बनवते अगदी लक्षात राहील अशी पण तिची नोकरी, घरची कामे यातून शांतपणा मिळायला मधे काही महिने जावे लागतात.

मला नोकरी १९८२ साली लागेपर्यंत कॉफ़ीची दोनच स्वरुपे माहित होती. आईने लहान पणी बनविलेली पोलसन ब्रॅंड ची कॉफ़ी आणि अजून बायकोला विचारायचे राहूनच जाते की तिने तिच्या माहेरी दिलेली ती कॉफ़ी कोणत्या ब्रॅंड ची होती. काहिही असो आज त्या ब्रॅंडच नाव मी ठरवून टाकतो. " ती पहिली कॉफ़ी". ही आठवण आली की पटत की कॅफ़े कॉफ़ी डे वाले जाहिरात करतात ते खर आहे. A Lot Can Happen Over Coffee.

महाराष्ट्रात मुखमंत्री विधानसभेतल्या अधिवेशना आधी विरोधी पक्षाला चहाला बोलवतात. उद्देश असा असावा की त्या निमीत्ताने अनौपचारीक चर्चा होऊन काही विषयावर एकमत होते का ते पहावे. बरेच वेळा विरोधी पक्षाने राडा घालायचाच हे ठरवलेले असेलच तर ते चहापानावर बहिष्कार घालतात आणि एकमत होणे सोडा विधानसभेत दिवस फ़ुकट जातात. मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनी तो चहा देण्याऐवजी ती कॉफ़ी द्यावी. कॉफ़ीला मराठीत ती कॉफ़ी म्हणतात. किमान स्त्री लिंगी शब्दाचा मान ठेऊन स्त्री दाक्षिण्य दाखवत सगळे येतील. हव तर कॅफ़े कॉफ़ी डे वाल्यांची कॉफ़ी दिली जावी कारण ही कॉफ़ी पिल्यावर बरेच काही घडणार असेल तर विधानसभेचे दिवस वाया जाऊन जनतेचे पैसे वाया जातात त्या पेक्षा हे बील कमी असेल. बाकी सर्व आमदार जेव्हा आपला भत्ता वाढवतात तेव्हा तो किती असावा यावर एकमत कसे होते ? त्यावेळेला चहा ऐवजी कॉफ़ी असते असे दिसते.

माझ्या बायकोच्या वडीलांचा जन्म बळ्ळारीचा कर्नाटकातला. महाराष्ट्रात येऊन ते स्थायीक झाले. माझे दोन्ही साले कानडी बोलतात पण अगदी आवश्यकता असेल तर. बायकोला कानडी समजते पण ती कर्नाटकातल्या नातेवाईकांशी हिंदीतच बोलते. माझ्या सासर्यांनी कधी मराठीचा द्वेष केला नाही. आजच्या कानडी धोरणाच्या विपरीत मराठी बोलणे सोडाच ते मराठी लिहायला सुध्दा शिकले होते. एकदा ते आम्हाला त्यांच्या मुळ गावी म्हणजे बळ्ळारीला घेऊन गेले. तिथे पोचताच पहिला पाहूणचार म्हणुन मिळाली ती कापीलोट्यातली कापी. लोटा हा शब्द उत्तर हिंदुस्थानापासून दक्षिण हिंदुस्थानापर्यंत प्रचलीत आहे. उत्तरेत थंडे पानी का लोटा म्हणजे फ़िरकीचे झाकण असलेला, पिण्याचे पाणी पिण्याचा लोटा. तो लोटा शब्द महाराष्ट्रात महाराष्ट्रात दोन अर्थाने प्रचलीत आहे. एक "कचरा लोटा" ज्याचा संबंध पाण्याशी नसून लोटा हे क्रियापद म्हणून आलेला शब्द आहे. तर पाण्याशी संबंध घेऊन येणारा मराठीतला दुसरा लोटा हा एकेकाळी लोटापरेड म्हणुन प्रचलीत होता. आज अमिताभ जे करु नका म्हणुन सांगतात ते एके काळी नदीकिनारी सर्व करत. काही घरातून भरलेला लोटा घेऊन जात तर काही टमरेल. टमरेल म्हणजे डालडा ब्रॅडचा तुपाचा कडीवाला डबा रिकामा झाला की पाणी भरुन नदी किनारी जाण्यासाठी वापरला जाई. कारण तोवर पितळ धातूचा लोटा किमती होऊ लागला होता.

कर्नाटकात लोटा म्हणजे कॉपी पिण्याचा स्टीलचा ग्लास. आजही काही हॉटेल मधे तो ग्लास एका वाटीत घालून त्यातून चहा किंवा कॉफ़ी महाराष्ट्रात दिली जाते. याचे दोन उपयोग असतात. चहा किंवा कॉफ़ी पिण्यासाठी खालच्या वाटीचा उपयोग होतो. मग अचानक मित्र समोर आला तर त्या वाटीत तो चहा किंवा ती कॉफ़ी शेअर करता येते. यात जे आपले पण असते ते अगदी महागड्या कपातून मिळालेल्या चहात किंवा कॉफ़ीत नसते. महागड्या कपातल्या चहात त्या कपाचा दिमाख असतो आणि चहाच्या टपरीवर लहानश्या ग्लास मधून एक चहा दोन ग्लास मधून पिताना जी मजा आहे, जे आपले पण आहे ती आजही आहे.

कर्नाटकातला कापी लोटा घरात वाटी शिवाय येतो. कारण ती कापी घरातल्या घरात देताना त्याची आवश्यकता नसते. ही कापी घरातली कर्ती स्त्री सकाळीच बनवते. यासाठी घरात एक फ़िल्टर असतो. त्यावर कापी पावडर टाकून गरम पाणी घालून ठेवतात. या कापी पावडरवरुन कापी त्या कोणत्याही ब्रॅंड नसलेल्या ताजी दळून त्यात चिकोडी घातलेल्या कॉफ़ीचा मनमोहक गंध हे गरम पाणि फ़िल्टर वरुन खाली येताना घेऊन येत. याला तिकडे डिकॉशन म्हणतात. साधारण एक लीटर डिकॉशन जमा करेल या आकाराचा तांबे धातूचा फ़िल्टर घराघरात असतो. घरात जर स्ट्रॉग कापी हवी असलेले लोक असतील तर पावडर जरा जास्त टाकतात आणि कमी स्ट्रॉंग हवी असेल तर कमी. पण इथले पाणी त्या कापीचा स्वाद आणि रंग आणि गंध इतका मस्त पकडते की पानी तेरा रंग कैसा हे हिंदी शब्द कर्नाटकात गेले म्हणजे आपली वृती न बदलता जिसमे मिलाए वैसा अस दाखवत बरोब्बर तो स्वाद आणि रंग त्याच बरोबर गंध घेऊन येते.

मग आवश्यकते नुसार त्या डिकॉशन मधे दुध आणि साखर मिसळून पुन्हा गरम करुन तयार होते ती कापी. घरातल्या लहान मुलींना बोलाऊन हे लोटे घरभर फ़िरवले जातात. ज्याला हवे तो तितके वेळा सकाळ पासून जेवायला बसे पर्येंत त्याची रेलचेल असते. परकर पोलके घातलेल्या, लांब केसांची वेणी असलेल्या लहान मुलींची ती वेशभुषा अजून टिकून आहे की आता मुली ट्रॅक पॅन्ट घालून घरात वावरतात हे पहायला गेल्या पंधरा वर्षात बळ्ळारी सारख्या ठिकाणी जाणे झाले नाही. पण खात्री आहे. एकवेळ मुलींची वेशभुषा बदलेल पण कॉफ़ीचा रंग, स्वाद आणि गंध यात बदल होईल असे वाटत नाही.

जन्मापासून मी चिंचवडला स्थायीक आहे. बायकोचे एक काकाही चिंचवडला रहातात. आठवण आली की मी त्यांच्याकडे जातो आणि त्याच कॉफ़ीच्या रंगात, स्वादात आणि गंधात बुडून जातो. मला हल्ली वेळ असतो त्यामुळे मी एकटाच जातो. बायको ऑफ़ीसला गेलेली असते. काफ़ीचा लोटा पुढे करत चिकाम्मा म्हणजे काकू तिच्या खास हिंदीत विचारते " क्या बोलता है मीना ?" मीना माझ्या बायकोचे नाव. काका शुध्द मराठीत बोलतात. कानडी हेल काढत नाहीत. पण काकू अजूनही कानडी माणसांशी कानडीत तर इतरांशी हिंदीत संवाद साधत असते.

काकूने मला दोन चार कप कापी बनविता येईल असा एक फ़िल्टर दिलेला आहे. पण ती लहर येत नाही आणि कॉफ़ी पावडर जरा जुनी झाली की तो गंध येत नाही त्यामुळे हा प्रयोग मी दोन चार वेळा केला पण पुढे केला नाही कारण ती मजा येत नाही. त्यापेक्षा काकांच्या घरी जाऊन काकू कापी कोडरी अस म्हणत पाहूणचाराची ऑर्डर सोडली जी कापी, कापी लोट्यातून मिळते ती माझ्या घरी मी फ़िल्टर केलेल्या कॉफ़ीत आणि कपातून पिली तर अजीबात मिळत नाही. माझा जावई सुध्दा मीनाला सासूबाई कॉफ़ी बनवा म्हणून सांगतो. पण मीना इंन्सटंट कॉफ़ी बनविते आणि कपातून देते. मीनाला फ़ारसे कॉफ़ी प्यायला आवडत नाही. पण तीला कॉफ़ी बनवायला आवडते.

असे हे कर्नाटक कापी चे दुसरे व्हर्जन. आवडले तर कळवा आणि हो नावासकट कापी नाही कॉपी पेस्ट करुनही पुढे पाठवा.

नितीन जोगळेकर
चिंचवड.
२२/१२/२०१७

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>ती धीटपणे म्हणाली की मुद्दाम लक्षात राहील अशी कॉफ़ी बनविली आहे.<<

असुम इट वाज नॉट स्पाइक्ड... Happy Light 1

फिल्टर कॉफिच्या बाबतीत सहमत. तिची युनिक चव बीया आणि बनवण्याच्या प्रोसेस मधे दडलेली असावी. इथे मिळणारी डार्क रोस्ट/बोल्ड कॉफि हि मस्त; पुढचे ३-४ तास सजग ठेवणारी. गॅरंटिड...

बर्‍याच वर्षांपूर्वी माझे एक सहकारी (ते वयाने व हुद्द्याने खूपच वरिष्ठ सायंटिस्टहोते-भयंकार मूडी माणूस-पण का कुणास ठाउक आमचे चांगले मैत्र होते) MVS MURTHY (मद्दाला वेंकटा सूर्य नारायणा मूर्थी - मूर्ती नव्हे बरं!)त्यांच्या घरी गेल्यावर मला आवडते म्हणून त्यांच्या मिसेस आवर्जून गर्रमागर्रम कापी द्यायच्या. ती चव तुम्ही म्हणता त्याप्रमाणे न विसरणार्‍यातली. कुण कुणाच्या हाताला 'चवीची' दैवी देणगी असते..!!

मस्त लेख.
जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूच्या गल्लीत मद्रास कॅफे होते(अजून असेलही) तिथे कॉफीचा दरवळ सुटलेला असे.बरेचदा तिथे कॉफी प्यायला जात असू.एकदा असेच डोसा खात असताना जॅकी श्रॉफ,हॉटेलच्या दाराला ओठंगून उभा असलेला पाहिला होता.त्यावेळी तो मॉडेलिंग करायचा.

चिंचवडला,एकीच्या मद्रासी शेजारणीने मस्त फ़िल्टर कॉफी दिली होती.अप्रतिम सुवास.