'हरे कृष्ण': एक नयनोत्सव!

Submitted by पद्म on 16 December, 2017 - 08:27

हरे कृष्ण!
आजकाल नको तितक्या रोमँटिक, ऍक्शन, सस्पेंस, हॉरर, विनोदी, ई. चित्रपटांची रेलचेल झालीये, त्यातही बघण्यालायक किती असतात तो भाग तर वेगळाच!
पण आज पहिल्यांदा चित्रपटावर लिहितोय, कारण कालच एक नविन चित्रपट प्रदर्शित झाला. माझ्या मते, भरपूर दिवसांनी एक आध्यात्मिक आणि हृदय परिवर्तन करणारा चित्रपट, चित्रपट म्हणण्यापेक्षा एक उत्कृष्ट कलाकृती आपल्यासमोर आलीये.
विशेष म्हणजे, एका भारतीय संन्यास्याच्या आयुष्यावर आधारित हा हॉलिवूड चित्रपट आहे. जॉन ग्रीजर यांनी भरपूर मेहनतीने हा चित्रपट बनवलाय; कारण ते प्रोफेशनल फिल्ममेकर नाहीयेत. भारतात, हिंदीतून हा चित्रपट रोहीत शेट्टी यांनी प्रदर्शित केला. या चित्रपटाला अमेरिकेत भरपूर पुरस्कार मिळाले आणि अमेरिकेनंतर भरपूर देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळीकडे याला भरभरून प्रतिसाद मिळाला. कालच हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.

या चित्रपटात ISKCON चे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष, जो त्यांनी ISKCON ची स्थापना करण्यासाठी १९६५ पासून १९७७ पर्यंत केला, तो पहायला मिळतो. PVR फक्त Box Office Hits च प्रदर्शित करतात, परंतू ते हा चित्रपट प्रदर्शित करताहेत कारण, प्रदर्शित करतांना त्यांनी सांगितलं की, "this is the story of Real Hero!". भरपूर जणांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच प्रभूपादजींचं कार्य ही एक उल्लेखनीय ऐतिहासीक कामगिरी आहे.

  • वयाच्या ७० व्या वर्षी अमेरिकेला जाणं.
  • इतक्या म्हातारपणी मालवाहू जहाजाने प्रवास करणं.
  • परदेशात फक्त ४० रू. आणि काही भागवतम चे सेट घेऊन जाणं.
  • आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत एका विश्वव्यापी संस्थेची स्थापणा करणं.
  • ईत्यादी.....

हरे कृष्ण आंदोलन ही भारताची अशी संपत्ती आहे, जी माणसाला संपूर्णत्त्वाकडे घेऊन जाते. आणि भक्तीमार्गाच्या या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी प्रभूपादांना पार करावे लागलेले अडथळे इथे पहायला मिळतात. त्यांनी हे सर्व केवळ सर्व जीवांप्रती असणार्या त्यांच्या प्रेमामुळे केलं.
अजून जास्त काही लिहीत नाही; नाहीतर पूर्ण कथा ईथेच लिहून होईल. त्यापेक्षा मोठ्या स्क्रीनवर पूर्ण कथा पाहीलेलं योग्य ठरेल.

माझी सर्व माबोकरांना विनंती आहे की, सर्वांनी हा चित्रपट पहावा आणि दुसर्यांनाही पाहण्याचा सल्ला द्यावा. नको ते सिनेमे आपण भरपूर पाहतो, पण थोडा वेळ इथेही द्या.
भारतात काल (१५ डिसेंबर) PVR च्या जवळपास ६०० सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हा चित्रपट सर्वांना ISKCON चं खरं स्वरूप दाखवेल, आणि कोणाचे काही गैरसमज असतील तर तेही दूर होतील.

हरे कृष्ण!!

English Trailer: .......
Hindi Trailer: https://www.youtube.com/watch?v=0FtYmk8h9ak

IMG-20171130-WA0005.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून जास्त काही लिहीत नाही; नाहीतर पूर्ण कथा ईथेच लिहून होईल.
>>>>
फार असे काही लिहिलेच नाही आपण. जास्त वाचायला आवडेल.. जर त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल आदर, कुतुहल वगैरे निर्माण झाले तरच पब्लिक पिक्चर बघायला जाणार ना Happy

हा चित्रपट सर्वांना ISKCON चं खरं स्वरूप दाखवेल, आणि कोणाचे काही गैरसमज असतील तर तेही दूर होतील.
>>>>>>>>
सध्या काय गैरसमज आहेत?
मला फारशी माहिती नाही, पण मागे स्टेशनबाहेर गर्लफ्रेंडची वाट बघत असताना सहजच यांचे भगवदगीतेचे पुस्तक विकत घेतलेले. वाचले नाही अजून पुर्ण (तीन वर्षे झाली, जेमतेम तीनच पाने वाचली) पण पुस्तकाची क्वालिटी, छपाई वगैरे अल्प किंमतीच्या मानाने खूप भारी होती. जणू विकत नव्हते तर भगवदगीतेचा प्रसार/ प्रचार (योग्य शब्द कोणता?) करत होते.

धन्यवाद! प्रभूपादजींनी केलेले गीतेचे जसेच्या तसे भाषांतर मी पूर्ण वाचले आहे, आणि खरंच अगदी सुंदरपणे त्यांनी गीता समजावली आहे. त्यांचा हा जीवन प्रवास नक्की बघणार!
हरे राम हरे कृष्ण..