वाह्यात चित्रपटांचे ऑकवर्ड अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 December, 2017 - 17:38

नियम क्रमांक १ - जेव्हा तुम्ही ३ मुलींबरोबर पिक्चरला जाता तेव्हा तिघींना एकत्र घेऊन कधी जाऊ नये.
नियम क्रमांक २ - जेव्हा तुम्ही तिघींबरोबर एकत्र जाता येव्हा त्यातील एक तुमची गर्लफ्रेंड तरी असू नये.
नियम क्रमांक ३ - जेव्हा नियम क्रमांक १ आणि २ पाळणे अवघड जाते तेव्हा निदान चित्रपटाची चॉईस तरी चुकवू नये.
नियम क्रमांक ४ - जर चित्रपट कसा निघेल हे आपल्या हातात नसेल तर निदान थिएटर तरी चांगले निवडावे.
नियम क्रमांक ५ - जेव्हा वरील चारही नियमांची तुम्ही काशी घालता तेव्हा मग निमूटपणे आपल्याच कर्माला दोष देत जे जे होईल ते ते भोगावे. मी हेच केले!

काही वर्षांपूर्वीची घटना आहे.
गर्लफ्रेंडने कॉलेजमध्ये दोन नव्या आणि छान मैत्रीणी जमवल्या. त्यांच्यावर शायनिंग मारायला आपला एक बॉयफ्रेंड आहे आणि तो किती भारी आहे हे दाखवायचा तिने एक प्लान बनवला. पण त्याचवेळी त्या मैत्रीणींनी एकटक आपल्या बॉयफ्रेंडकडे बघत राहू नये म्हणून सोबत चित्रपट बघायचाही प्लान बनवला. म्हणजे थोडा चित्रपट बघा, थोडा माझा बॉयफ्रेंड बघा. पण दुर्दैवाने मला पुर्ण चित्रपटभर त्या दोघींनाच काय माझ्या गर्लफ्रेंडच्या नजरेला नजर देऊनही बघता आले नाही. कारण चित्रपटाची निवड चुकली!

देल्ही बेल्ली!
हि माझी झालेली अवस्था नसून चित्रपटाचे नावच असे आचरट होते. यातील पहिल्या देल्हीचा अर्थ बहुतेक भारताची राजधानी दिल्ली असा असावा आणि दुसर्‍या बेल्लीचा अर्थ मला पुर्ण चित्रपटभर कळलाच नाही. आधी मला वाटले देल्हीबेल्ली म्हणजे खेळीमेळीत बघायचा चित्रपट असेल. त्यत माझ्यासोबत मुलीबिलीही होत्याच. एकंदरीत मज्जाच मजा होती.
पण ट्रेलरमध्ये पाहिलेले "भाग डिके बोसडिके" असे आचरट बडबडगीत एक वॉर्निंग अलार्म होते.
ईथे आस्वाद घेऊ शकता - https://www.youtube.com/watch?v=glA-FIzDbpI

किंवा मग हे लिरीक्स एंजॉय करू शकता.

डॅडी मुझसे बोला, तू गलती है मेरी
तुझपे जिंदगानी, गिल्टी है मेरी..
साबुन की शकल मे,
बेटा तू तो निकला केवल झाग....
झाऽऽग... झाऽऽऽऽग ... भाऽऽग !!
भाग भागडिके बोस डिके बोसडिके बोसडिके.. भाग डिके बोसडिके भाऽऽग

पण दुर्दैवाने मी या वॉर्निंग अलार्म कडे दुर्लक्ष केले. कारण आमीर खान त्यावर म्हणाला होता, "गाण्यावर जाऊ नका, चित्रपट लहान मुलांनी बघावा असाच बनवलाय." आता जगाच्या पाठीवर कुठे अशी वाह्यात पोरे नांदत असतील ज्यांच्यासाठी आमीरने हा चित्रपट बनवला याची कल्पना नाही.
तसेच तो आमीरचा भाचा इम्रान खान, त्याचा तो पैलाच पिक्चर. जाने तू या जाने ना. त्यातील त्याची रोमांटीक सुपरक्यूट भुमिका. हा पुढे जाऊन आपल्या इम्रान नावाला जागत हाश्मीगिरी करेल असे वाटले नव्हते. पण तो हाशमी परवडला. फक्त चार चुंबने काय घ्यायचा तेवढ्यासाठीच बिचारा बदनाम व्हायचा. (एक चुंबन, अनेक चुंबन? की चुंबने? व्याकरण कर्रेकट करा प्लीज) असो, तर या चित्रपटाची माझी निवड चुकली हेच खरे..

तर आता किस्स्यावर वळूया. एके दिवशी गर्लफ्रेंड लाडात येऊन म्हणाली, चंदा आणि तानियाला तुला भेटायचे आहे. सोबत एखादा छानसा पिक्चर प्लान करूयात का?
चंदा आणि मंदा नाव ऐकले असते तर मी कधीच या फंदात पडलो नसतो. पण तानिया !! नाव ऐकूनच माझ्या डोळ्यात बदाम बदाम बदाम आले आणि मंदासारखा फटक्यात होकार देऊन बसलो. पुढे तिकीटे बूक करण्यापासून गाडीभाडे, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक्स हे सारे खर्च सारे मीच करणार हे ऐकून नको त्या धंद्याला लागलो असे झाले. त्यातच आदल्या दिवशी गर्लफ्रेंडने मोबाईलमध्ये तानियाचा फोटो दाखवला. आणि तिला पाहून "नाव तानियाबाई आणि हाती बर्फाचा गोळा" असे झाले. "तानियाच अशी तर चंदा नि कशी" म्हणून मी विभागातील सस्त्यातील सस्ती सिंग्ल स्क्रीन थिएटरची तिकीटे काढली. पण चित्रपटाच्या दिवशी धक्काच बसला. चंदा तर एकदम बंदा रुपाया निघाली. बोले तो एकदम शॉल्लिड! कसं वाटले असेल तिला, या रुनम्याने आपल्याला कसल्या थिएटरमध्ये आणले. पण ईतर सर्व थिएटरमध्ये या चित्रपटाचे सारे शो हाऊसफुल्ल आहेत, एकदम भारी चित्रपट आहे, आपल्याला हाच बघायचा होता म्हणून मी ईथली तिकीटे काढली असे बोलून मी वेळ मारून नेली. पण थोड्यावेळाने हिच थाप माझा काळ बनून येणार होती याची मला कल्पना नव्हती. कसं वाटले असेल चंदाला., या रुनम्याला कसले वाह्यात चित्रपट भारी वाटतात..

तर चित्रपटाची स्टोरी आता फार काही आठवत नाही. पण टॉयलेटमधील पाणी संपलेय म्हणून संत्रा ज्यूसने काम उरकणे. हिरे द डायमंड असलेली थैली मलमूत्राच्या टेस्ट सॅंपलशी बदलणे. आणि नंतर व्हिलनची माणसे हिरे कसे बदलले म्हणून तो मालमसाला चेक करत असताना त्यावर क्लोजअपमध्ये कॅमेरा मारत आपल्यालाही नको नको ते दाखवणे. आणि काय बोलू, काही काही कंबरेखालच्या दृश्यांबद्दल तर न बोललेलेच बरे.

एकंदरीत आजूबाजुची टवाळ झोपड पट्टी छाप पोरे खिदळत होती आणि मी तीन पोरींना सांभाळत गपगुमान बसलो होतो. समोर पिक्चर बघवत नव्हता आणि आजूबाजूला त्या तिघींना बघू शकत नव्हतो. निम्मे थिएटर भरले होते, पण दूरदूरपर्यंत एकही स्त्री देह नजरेस पडत नव्हता. मीच काय ते मुर्खासारखे तीन जणींना घेऊन आलो होतो. नाही म्हणायला दोन कोपर्‍यात दोन जोडपी बसली होती. पण ती पिक्चर बघायला नाही तर दाखवायला आली होती. पडद्यावर एखादे वल्गर दृश्य येताच किंवा एखादा नॉनवेज जोक घडताच माझी गर्लफ्रेंड मला जोरात कोपर ढोसत होती. ते फटके खात खात मी मोजतही होतो. तेवढाच विरंगुळा. अश्याने वेळ लवकर जातो असे म्हणतात.
चोवीस खाल्ले आणि मध्यांतर झाले. लाईट लागली आणि तोंड लपवून पळालो. पॉपकॉर्न घेऊन आलो. ते खाऊन झाले. पण तिघींच्या चेहर्‍यावरचा राग काही आटला नव्हता. मी पुन्हा जीव मुठीत घेऊन बसलो. सेकंड हाल्फमध्ये वल्गरता वाढली होती की गर्लफ्रेंडचा संताप याची कल्पना नाही, पण चोवीसचा आकडा थेट अठ्ठ्याऐंशीला येऊन थांबला आणि पिक्चर संपला. पुन्हा लाईट लागले. आम्ही चौघेही एकमेकांपासून तोंड फिरवत बाहेर आलो. आणि तसेच चार दिशांना निघून गेलो.

पुढे विशेष सांगण्यासारखे काही घडले नाही. पण दुसर्‍या दिवशी भर उन्हात मला रुमाल डोक्यावर ठेवून गार्डनच्या सात फेर्‍या माराव्या लागल्या. त्या मारताना उगाचच कानात भाग डिके बोसडिके बोस डिके भागडिके वाजतेय असा भास होत होता.
आजही ती आठवण काढून माझी गर्लफ्रेंड मला झापत असते. त्या चंदानंदा आणि तानिया सोनिया तर मला आयुष्यात पुन्हा कधी दिसल्या नाहीत.
कदाचित सम अनादर टाईम मलासुद्धा तो चित्रपट आवडला असता. कारण पुरेसा वाह्यातपणा माझयही अंगी ठासून भरला आहे. पण ती वेळ चुकली.
अश्याच चुकलेल्या वेळांना समर्पित हा धागा...
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट रिलीज होण्या आधी रिव्ह्यू वरून कळते पिक्चर ची लायकी. त्या मुली नक्कीच अलिबाग /ढेंगे पिंपळगाव हून आल्या नसतील. त्यांना नक्कीच माहिती असेल. सगळा मसाला.
तुमच्या उपस्थिती मुळे कदाचित आस्वाद घेऊ शकत नसतील. मैत्रीण कोपर टोचून इशारे देत असेल निघ म्हणून. पण तुम्हीच गुळाला मुंगळे चिकटतात तसे बसला असाल.
गार्डनला सात फेर्या म्हणजे गफ्रे प्रतीकात्मक सुचवत असेल , आता तरी लग्न कर.
अजुनही केले नाहीत? (असा माझा गोड गैरसमज आहे ) आता तरी करा. कोणा चंदानंदा ला तुमची गफ्रे फिरकू देणार नाही.
अशी अफवा आहे की ड्यू आयडी वापरून तुमच्या गफ्रे ने तुमचे सगळे लिखाण वाचले आहे. Rofl

पाफा, हाहा, भारी तर्क Proud

श्री, कुठे असता. आज बरेच दिवसांनी दिसलात.
बाकी स्वप्नरंजन नाहीये हो. जरा ईकडची नावे तिथे. अन्यथा खरेच या चित्रपटाला तीन तरुण मुलींसोबत जात त्यांच्या शिव्या खाल्या होत्या. त्या थिएटरचा क्राऊड वाह्यात असल्याने जरा जास्तच..

अंजू धन्यवाद, थम्स अप.. अश्याच प्रामाणिक प्रतिक्रिया अपेक्षित Happy

असामी, अजय चव्हाण, हर्पेन वगैरे मंडळींनी मला काल की परवा ट्रेलरच्या धाग्यावर उकसवल्याने आणि नवा धागा काढायचे सुचवल्याने हा धागा आला... हा त्याचा पुरावा
https://www.maayboli.com/node/61689?page=11

चंदा-मंदा, नाव तानिया हाती बर्फाचा गोळा, चंदा-बंदा रुपाया हे मस्त जमलंय. Happy

चुकीचा चित्रपट म्हणजे माझ्या लग्नाआधी आमचं प्रकर्ण घरी कळल्यानंतर माझ्या नणंदेला मला भेटायचे होते.
बघु रे कशी आहे मुलगी. मला भेटव एकदा असं माझ्या नवर्‍याच्या मागे लागली होती.
तर माझ्या नवर्‍याने पिच्चरचा प्लॅन केला. Uhoh आणि तो ही जीना सिर्फ मेरे लिये Angry
असले पकलो होतो की बासच.
फक्त होणारी मोठी नणंद तिची मुलं आणि दीर सोबत होते म्हणून अगदी शांत बसुन पिच्चर पाहिला. Lol

आम्ही तिघी मैत्रिणी आणि एकीचा बॉफ्रे चायना गेट समजून फायर ला बसलो होतो घाईत तिकिटे काढून (सध्याच्या काळात तिकिट काढताना नीट माईक वर अनाउन्स करतात शो कोणता पिक्चर कोणता.बुकमायशो वर तर अनेक मेल्स आणी मेसेज येतात.). आम्ही सुरुवातीचा १ तास पाहिला आणि त्यात सर्व सीन्स होते.आपण असं काही थिएटर मध्ये पाहतोय आणि एकीचा बॉफ्रे बरोबर आहे या कल्पनेने अतिशय वाट लागली होती.तो तर खुर्चीत रुतुनच बसला होता.
मग १ तासाने आम्ही बाहेर पडलो.(असे एक तासात बाहेर पडायचा योग मिथुनच्या एका ५ अक्षरी पिक्चर ला पण आला होता.तेव्हा अर्ध्या तासातच.)

आई बाबा भावाबरोबर लहानपणी चांदनी ची तिकिटे समजून तृषाग्नि नामक पल्लवी जोशी, आलोकनाथ, नाना पाटेकर संन्यासी भुमिकेस असलेला एक पिक्चर पाहिला होता.उशीर झाल्याने आधीच्या पाट्या बिट्या सर्व उरकल्यावर अंधारात जाऊन बसलो होतो.चांदनी आणि तृषाग्नि दोन्ही चे ट्रेलर पाहिले नसल्याने चांदनी मध्ये अर्धा तास असा वाळवंटाचा बोअर फ्लॅश बॅक का आहे हा प्रश्न मनाला छळत होता Happy अर्ध्या तासाने अर्थात बाहेर पडलो.

यानंतर एकदा रात्रीच्या बस च्या वेळेला उशीर म्हणून बॅग घेऊन दादा कोंडकेंचा 'आगे की सोच' पाहिल्याचा आणि चांगला असेल समजून ४ दिवस आधी तिकिट काढून रिकाम्या थेटरात मिस्टर या मिस पाहिल्याचा भीषणरम्य अनुभव गाठीशी आहे.

आम्ही तिघी मैत्रिणी आणि एकीचा बॉफ्रे चायना गेट समजून फायर ला बसलो होतो...
>>>>

त्या खुर्चीतच रुतून बसलेल्या बॉफ्रेची स्थिती मी समजू शकतो Happy
आता काय येणार.. आता पुढे आणखी काय दाखवणार.. नुसता भितीचा काटा अंगावर सतत!

अनु, स्मिता.. Lol

माझ्यावर अजूनतरी अशी ऑकवर्ड वेळ आली नाहीये.
हा पण एकदा पकण्याची वेळ आलीय नि तेव्हा पूर्ण सिनेमा बघायलाच लागला होता. Sad
एका मैत्रिणीसोबतच फिल्म बघायला गेलेले. तिचा बॉफ्रे आयत्यावेळी येऊ न शकल्याने (तो मुद्दामच आला नसणार) तिने मला बकरी बनवले. फिल्म कुठली तर तुषार कपूरची जीना सिर्फ मेरे लिये. तुषार तिचा जाम फेवरेट. (हे पण मला नंतर कळलं) Uhoh ही अगदी टक लावून फिल्म बघतेय नि मी प्रचंड वैतागलेली. शुक्रवार असल्याने थिएटरमध्ये खलाशांची गर्दी. तिला एकटीला सोडून उठून जाणेही अशक्य.

(तिला अभिषेक बच्चनही प्रचंड आवडतो हे कळल्यानंतर तर तिच्यासोबत कोणत्याही फिल्मला जायचं नाही याचा निश्चय करुन टाकलेला मी.)

जीना सिर्फ मेरे लिये पुन्हा एकदा Lol
एक खाकी चित्रपटात तेवढा तो सुसह्य वाटला... कारण त्यात त्याच्यापेक्षा (अतुल कुलकर्णीचा अपवाद वगळता) ईतरांनीच जास्त ओवरअ‍ॅक्टींग केली होती Happy

घरात पडून बोअर होत होतो म्हणून माझ्या रूममेटने "ओके जानू" ची टिकटे काढली .

मी ही तयार झालो कारण साऊथमध्ये हीट झाला होता तो सिनेमा..

पण त्याच हिंदी रीमेक इतका छळवादी होता की,विचारायला नको..

अक्षरक्षः इंटरवलला पळूनच जाणार होतो मी पण रूममेटने आई रक्ताची शपथ घातल्यामुळे जबरजस्ती पुर्ण पाहीला..

सुवासिनीची सत्वपरीक्षा म्हणजे काय असतं हे कळलं त्यादिवशी..

जीना सिर्फ मेरे लिये पुन्हा एकदा > Lol
निधि Lol

खाकी बोले तो अजय देवगण और बच्चन.

पण रूममेटने आई रक्ताची शपथ घातल्यामुळे>>>>>>>>>>> Lol
त्वरीत रुम नैतर रुममेट बदलुन घे. Lol

खाकी बोले तो अजय देवगण और बच्चन.
>>>>

कुठे तो जंजीर, दिवार, त्रिशूलचा अमिताभ आणि कुठे हा खाकीचा ओवरएक्टींग अमिताभ.. त्यातल्या त्यात लक्ष मधील सपाट अमिताभपेक्षा बरा..

आणि तो खाकीचा अजय देवगण पाहून मला वाटते तो पद्मावतीचा खिलजी म्हणूनही चालला असता..

भारी लिव्हलय! Lol
अशी गोची होते खरच!
धुळ्यात रहात होतो तेव्हाची गोष्ट: आम्ही १२वीत असतांना आमच्या मॅथ्सच्या क्लासच्या मॅडमने वर्ष संपायला आले तसे आम्हाला काही मुलींना घेऊन सिनेमाला जायचं ठरवलं. कुठल्या, तर म्हणे टारझनला जाऊ . प्राण्यांचे मुव्ही आवडतात म्हणे मला. हेमंत बिर्जे आणि किमी काटकर बाईंचा टारझन.
मला जरा कुणकुण होतीच.. मी दुसरा बघू म्हणत होते. पण त्यांनी ऐकले नाही. आणि गेलो आम्ही काही जणी!
धुळ्यात स्वस्तिक टॉकीजला तो पिक्चर. आधीच धुळ्यातलं पब्लिक बेकार. तरी बाल्कनीची तिकीट काढली. उशीर झाला म्हणून अंधारात जाऊन बसलो. नंतर हळूहळू फोकस पडल्यावर कळलं. लेडीज नाहीतच पिक्चरला! किमीबाईंचे उत्तान सीन सुरु झाले कि आख्ख पब्लिक थिएटर डोक्यावर घ्यायचं. एकमेकींकडे नजरा चुकवत बघत होतो. शेवटी कानात खासखुस करून एकेक जण सटकलो.

कॉलेजला असताना आमची एक साधी सोज्वळ मैत्रीण होती. आमच्याबरोबर पिक्चरला कधी यायची नाही. एकदा आग्रह करकरून तिला आम्ही ' धूम' बघायला नेलं. नेमकं सुरुवातीलाच अभिषेक बच्चन आणि त्याची बायको ( जी कोणी आहे ती, आता लक्षात नाही) यांचं एक बोल्ड गाणं. ते सुरू झाल्यावर माझी दुसरी मैत्रीण मला कानात म्हणाली, " आता हिचा आपल्याबद्दल काही गैरसमज नाही झाला म्हणजे बरं Lol "
पण पुढचा पिक्चर तसा सरळ होता .

दहावीची परिक्षा संपल्यावर मोठ्या कौतुकानं आठ दहा मैत्रिणी "फूल और कांटे " बघायला गेलो. गाणी ऐकून आवडलेली होती. बघण्याची उत्सुकता होती.
पिक्चर बघतांना embarrassment जास्त होती का संताप हे आता आठवत नाही.

एकदा लहान पणी आम्ही शान थियेटर मध्ये लहान मुलांचा चित्रपट बघायला गेलो होतो पण तिकीट मिळाले नाही म्हणून बाजूच्या लक्ष्मी थियेटर मध्ये दूसरा एक चित्रपट बघितला त्याचे नाव लड़ाकू आणि हीरो नन अदर than अमजद खान

चित्रपटाचे तिकीट होते एक रुपया दहा पैसे

बस इतकेच आठवत Lol

एकदा शाळेच्या ट्रिप ला बडोद्याला गेलेलं असताना 'लक्ष्मणरेखा' नामक जॅकी आणि नसरुद्दीन शाह चा एक पिक्चर पाहिल्याचे स्मरते.
त्यात क्या गाडी है, क्या नंबर है, क्या बॉडी है, क्या बंपर है, आगेसे देखो पिछे से देखो उपर से देखो नीचे से देखो कही से देखो जी , हाय क्या बात है असे संगीता बिजलानी जॅकी अभिनीत भयंकर गाणे होते Happy

मी का कोणास ठाऊक पण कुठून तरी ऐकून आई बाबांना जबरदस्तीने कभी अलविदा ना कहना बघायला घेऊन गेले होते.

मी 9 वी का 10 वी मध्ये असेन...

संपूर्ण चित्रपट भर आई संतापाने बघत होती माझ्याकडे.

शेवटी सिनेमा संपत आला तेंव्हा आई सरळ उठून बाहेर निघून गेली आणि मग आम्ही तिच्या मागे पळालो

करन जोहरने काळाच्या पुढे जाऊन बनवलेला सिनेमा... तू मागच्या जनरेशच्या आईला बघायला घेऊन गेलीस Happy
माझ्याही आईला त्याचा शेवट म्हणजे सांस्कृतिक धक्का होता.

<<<संपूर्ण चित्रपट भर आई संतापाने बघत होती माझ्याकडे.<<< Rofl रिया तुझी स्थिती समजु शकते अश्या वेळी!

Pages