विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग १

Submitted by डोनाल्ड डक on 8 December, 2017 - 14:27

“शोभाSS ए शोभाSS उठ जा अब्बी, उफ्फ, और कितना सोयेगी ये लडकी ” कावेरी मौसी च्या कंटाळेल्या हाका शोभाच्या कानात शिरल्या,अंथरुणातूनच डोळे किलकिले करून पलंगाच्या बाजूला खाली पहिले’, जागा रिकामी दिसली, आळोखे पिळोखे देत शोभा उठली, तोंड धुवून fresh झाली, बाजूला पडलेली ओढणी गळ्यात घेतली आणि टेबलपाशी येऊन चहाची वाट पाहात बसली. कावेरीने कप पुढे सरकवला.

“ सकीना चली गयी क्या मौसी ?” शोभाने आळसावलेल्या आवाजात विचारले.

“ फिर? साडे नौ बज गये महारानी, सकीना कब की गयी क्लास को , वो लडकी भी कमाल है, रात्री दोन दोन वाजे पर्यंत उकिरडा फुंकत फिरत असते, आणि सकाळी ७ ला बाहेर पण पडते, झोपते केव्हा? उठते केव्हा काय माहित? पक्या आज फिर बता रहा था मालूम, कल रात को वो नाकेपर खडा था, तब्बी ये मेड्डम बुरका पेहनके तेरी स्कूटीपर वापस आयी रात के २ बजे , उस दिन पक्याने पिछले दादरसे उसको ग्यारा बजे बाहर जाते देखा. देख, उस पर नजर रख , मेरे को वो सिधी लडकी नही लगती” कावेरी ची स्वत:शीच बडबड चालू होती.

“अब तुम्हे क्या करना है वो कब आती है, कब जाती है उससे?? रात्री माझ्या सोबतीला येते इकडे ती, ती आली कि आम्ही १०ला झोपतो, कोणी कुठे जात नाही रात्री, तुला तो पक्या काही तरी सांगणार आणि तू ऐकणार. देख, सकीना बोहोत सिधी लडकी है, बेचारी सुबह क्लास- फिर कोलेज जाके, शामको पार्लर मै जॉब करती है, उसके बाद कहा घुमेगी वो रातको, खाली पिली शक करना छोड, मौसी ” शोभा अर्धवट मजेत अर्धवट समज देण्याच्या सुरात बोलली.

चहाचा रिकामा झालेला कप घ्यायला कावेरी वाकली आणि शोभाच्या केसांचा वास तिच्या नाकात घुसला.
“ये क्या? अब सिगरेट फुकना कबसे शुरू किया?” कावेरीने शोभाचे तोंड आपल्याकडे वळवत कडक स्वरात विचारले.

“ आज क्या हुवा है तेरे को मौसी, सुबहसे शक किये जा रही हो दुनियापर,” तोंड फिरवत शोभा म्हणाली.

शोभा तिच्या शेजारी खुर्ची ओढून बसली, दोन्ही हातात शोभाचा चेहरा धरून आपल्याकडे वळवला आणि तो निरखत खालच्या स्वरात तिने विचारले “ क्या कर रही हो तुम लडकी लोक आजकल? देख, सही सही बता दे, नही तो दादा को बात दुंगी.”

“ अरे मौसी, छोड ना.. तू क्यू पका रही है?”

“ ए!! सुन, दस साल, पुरे दस साल धंदा करती थी मै, किस निशान का क्या मतलब वो अच्छा जानती है मै,” असे म्हणून शोभाच्या गोऱ्यापान मानेवर उमटलेल्या लाल खुणे वर तिने बोट फिरवले.

“तू भी ना मौसी, एक मच्छरने क्या काटा तू कहा से कहा बात लेगे जाती है “शोभा गडबडीने उठत म्हणाली आणि ओढणी गळ्याभोवती अजून गुंडाळून घेत बाथरूम मध्ये घुसली.

बाथरूमच्या बंद दाराकडे कावेरी आगतिकपणे पहात राहिली.
तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ सरकू लागला.

कावेरीची आणि शोभनाची पहिली भेट झाली तेव्हा शोभना ४ वर्षाची होती,शोभना आणि तिची आई , रेखा अक्षरश: हस्ते परहस्ते त्या कोठ्यावर आल्या होत्या. वर्षाभरापूर्वी नवर्या बरोबर मुंबई पाहायला आलेल्या रेखाला तिचा नवरा तिला कधी विकून गेला हे कळलेच नाही. तीने सहकार्य करावे म्हणून तिच्यावर अमानुष अत्याचार झाले, तिची परत परत विक्री झाली, परत परत अत्याचार झाले.

कावेरीला पण धंद्याला लागून काही वर्षे झाली होती, रेखा तिच्याच जिल्ह्याची म्हणून दोघींना एकत्र ठेवले. कामाठीपुर्यात लहान मुलीला घेऊन राहणे काही सोपे काम नव्हते.पण कावेरीच्या मदतीने रेखा कसेबसे ते आव्हान पेलत होती. त्यात शोभना भरभर मोठी होत होती, चारीबाजुला चालणाऱ्या गोष्टी फार काळ तिच्या नजरे आड राहणार नव्हत्याच. रेखाने हिम्मत करून एका समाजसेवा करणाऱ्या ताई बरोबर शोभनाची रवानगी एका सेवाभावी संस्थेच्या वसतिगृह असणाऱ्या शाळेत केली. शोभनाने सुद्धा त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला, शाळेत अभ्यासाबरोबरच ज्युडो कराटे मध्येही तिने प्राविण्य मिळवले, जिल्हास्तरीय स्पर्धांमधून बक्षिसे पण मिळवली.

इकडे रेखाकडे पण एक गिर्हाईक वारंवार येऊ लागले,तो एकेकाळचा त्या विभागाचा नगरसेवक होता, पण हल्ली त्याचे नाव गुन्हेगारी वर्तुळात आदराने घेतले जात होते. रेखाला मात्र त्याला त्याच्या “दादा ” या घरगुती नावाने हाक मारायची परवानगी होती, हळू हळू तिची सर्विस फक्त दादा पुरती सीमित राहू लागली, आणि एक दिवस ती कोठ्यावरून लग्नाची बायको म्हणून दादाच्या घरी गेली. एका वेश्येच्या जीवनातील अशक्य वाटणारे स्वप्न रेखापुरते तरी सत्यात उतरले होते, शोभनाला बाप मिळाला.

पण हे सुख फार काळ टिकले नाही, छोट्याश्या आजाराचे निमित्त होऊन रेखा हे जग सोडून गेली. आपला शेवट समोर दिसायला लागल्यावर शोभनाची काळजी घेण्यासाठी तिने कावेरीला सोडवून आणले, शोभनाला तिच्याकडे सुपूर्द करून तिने डोळे मिटले.
तेव्हा पासून कावेरी ,शोभनाची मौसी म्हणून दादा च्या घरीच राहत होती. दादा सुद्धा तिच्याशी घराचे माणूस समजूनच बोलायचे. त्यांचे पाहून दादांचा सहकारी आणि उजवा हात,पक्या सुद्धा तिच्याशी आदराने वागायचा.

आधी रेखाने आणि मग आपण इतक्या कसोशीने जपलेली पोरगी आता काय करतेय याची चिंता कावेरीच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती...........

शोभा बाथरूम मधून बाहेर आली तेव्हा कावेरी काम आटपून निघून गेली होती, आरश्यासमोर उभं राहून शोभाने आधी मानेवरच्या खुणेला कन्सिलर लावला, ओले केस पंचात गुंडाळून , laptop मांडीवर घेऊन ती सोफ्यावर बसली. मोबाईल फोन तिने laptop ला कनेक्ट केला आणि काल रात्री घेतलेले फोटो ती डाउनलोड करू लागली.

कॉम्प्युटर च्या स्क्रीन वर ते फोटो येताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले, ती फोटोंची अख्खी सिरीज होती, पहिला फोटो म्हणजे शोभाने एका हंक तरुणाबरोबर एका पब बाहेर काढलेली सेल्फी होती, एका मागून एक फोटो स्क्रीन वर येत होते आणि शोभा अजून अजून उत्तेजित होत होती.

त्याच फोल्डर मध्ये एक साउंड क्लीप होती, इअरफोन कानात खुपसून तिने ती प्ले केली, एका पुरुषाचे विव्हळणे, चित्कार, रडणे, गयावया याचा आवाज तिच्या कानात भरून राहिला. ऐकता ऐकता तिने मान सोफ्यावर मागे टेकवली आणि डोळे बंद करून ती कालची रात्र परत अनुभवू लागली.

विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग 2

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही माझी पहिलीच कथा आहे,
कथाबीज माझे नाही,
मायबोलीवर याच बीजाची एक अतिशय सुंदर कथा वाचली.
तीच गोष्ट आजच्या काळात घडली तर कशी असेल असा विचार मनात आला म्हणून हा प्रयत्न करत आहे
यात त्या मूळ गोष्टीचा उपमर्द करायचा हेतू नाही.

त्याने हॅम्लेट कसा, आजच्या पार्श्वभूमीवर मांडला,
किंवा अनुराग कश्यप ने जुना देवदास नव्या देव-D रुपात आणला??
तसेच हे...
विशाल भारद्वाज म्हणा, अनुराग कश्यप म्हणा किंवा राम गोपाल वर्मा म्हणा, कोणीतरी मनावर घेतल्याशी कारण .

छान सुरूवात.
मायबोलीवर याच बीजाची एक अतिशय सुंदर कथा वाचली. >> लिंक द्या प्लिज

पुढच्या भागात कथा स्पष्ट होईल तेव्हा काही ओळखीचे वाटतंय का पहा Happy

कदाचित शीर्षकाचा संबंध पुढच्या भाग मध्ये लागेल.

प्रतिसादांबद्दल आभार.

>> कथा छान आहे पण विशाल भारद्वाज नाही समजले.
>> कथा छान आहे मांडणी पण उत्तम पण समहाऊ टायटल नाही रिलेट झाले.

अगदी सहमत.

>> विशाल भारद्वाज म्हणा, अनुराग कश्यप म्हणा किंवा राम गोपाल वर्मा म्हणा, कोणीतरी मनावर घेतल्याशी कारण .

आणि त्यांनी कुणी मनावर घेतली नाही तर? कथेचा आणि त्याचा काय संबंध कळले नाही Uhoh टायटल संपूर्ण असंबंध. भारद्वाजच्या चित्रपटाचे परीक्षण असेल असे वाटते.