पुष्कर

Submitted by प्रकाश काळेल on 17 March, 2009 - 09:53

अतीशय सुंदर फोटो!!!

नाद खुळा..... ग्रेट. सही.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

खुपच छान ... कुठे आहे हे... जागेच नाव काय ?

सहीच...... पुष्करला दरवर्षी खूप मोठी जत्रा/यात्रा/फेस्टीव्हल असते ना, खूप परदेशी पर्यटक येतात तिथे त्यासाठी. पेपरात वाचल्याच आठवतय.
सास प्रकाशचित्राच नावच गावाचे नाव आहे.

जबरी फोटो....शेवटचा तर एकदम खल्लासच आलाय Happy
पुष्कर ला माझ्या मते जगातले एकमेव ब्रह्मदेवाचे मंदीर आहे....खूप ऐकलेय त्याबद्दल..

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

सुंदर फोटो... Happy

बरोबर केदार, पुष्करला ब्रह्मदेवाचे मंदीर आहे...
मी जाऊन आलोय पुष्करला. Happy

मस्त आलेत.

    ***
    तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||

    मस्त आलेत प्रकाश! पिक्चर ची ऑफर देऊ का?

    छान आहेत फोटो..
    जरा ह्या जागे बद्दल कोणीतरी लिहा ना डिटेल मधे... मी ऐकलं पण नव्हतं आधी.. !

    तिसरा फोटो एडीट केलेला आहे का? की त्यातल्या पुलाचा रंग तसाच आहे?

    पुष्कर बद्दल मला माहिती असलेले>>

    पुष्कर चा शब्दश: अर्थ म्हणजे फुलातुन निर्माण झालेले...ब्रह्म्देवाला तप करायचे होते म्हणुन त्याने त्याच्या कमळातिल एक पाकळी पृथ्वीवर सोडली...ती पाकळी पडुन जे सरोवर झालेले आहे तेच हे पुष्कर सरोवर..

    असे म्हणतात की येथे ब्रह्मदेव जेव्हा तप करायला लागला तेव्हा पत्नी म्हणुन देवी सरस्वती तेथे हजर राहु शकली नाही, मग ब्रम्हदेवाने तेथे तपासाठी दुसर्‍याच कुणाशीतरी लग्न केले...तेव्हा सरस्वतीने त्याला शाप दिला की तुझी जगामधे कुठेच पुजा केली जाणार नाही...मग उ:शाप म्हणुन फक्त पुष्कर लाच पुजेसाठी मंदीर बांधण्यात आले....येथे दरवर्षी भारतामधिल सगळ्यात मोठा उंटाचा मेळा भरतो...परदेशी लोकांसाठी हे एक आकर्षण असते...

    ०---------------------------------------०
    जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
    अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

    ब्रम्हदेवाने तेथे तपासाठी दुसर्‍याच कुणाशीतरी लग्न केले... )) तपासाठी लग्न ? Uhoh
    काही कळ्ळ नाही .
    -----------------------------------------
    - सक्षम दळवी

    खुप छान आलेत फोटो.

    कुठे आहे हे पुष्कर सरोवर?

    केदार! ब्रह्म्देवाचे हे एकच मंदीर आहे आणि ब्रह्म्देवाची सगुण साकार स्वरूपात मूर्ती किंवा प्रतिमा कोठे आढळत नाही याचे पुराणांत वेगळे कारण आहे! कारण ब्रह्म्देव हा स्वतःहून अदृष्य स्वरूपात आहे जेव्हापासून पुराणात सांगितल्याप्रमाणे "ते "सरस्वती प्रकरण झाले!

    सर्वांचे मनःपुर्वक आभार Happy

    हो पुष्करला एकमेव ब्रम्हमंदिर आहे ! तिथेही ब्रम्हाची पूजाअर्चा होत नाही.या पुष्कर सरोवराची निर्मीती ब्रम्हदेवांनी केली होती. विश्वामित्राने इथेच तप केले होते .पुष्कर सरोवराचे पाणी तसे खूप पवित्र मानतात.
    या सरोवरात स्वर्गातून मेनका अप्सरा स्नानासाठी येत असेही ऐकलेय.पण सध्या त्या पाण्यात तुम्ही हात देखील बुडवायला धजणार नाही,इतके ते प्रदुषीत झालेय. लोकांनी आपली पापे धुवून त्याची अगदी वाट लावलिये.तसे शुध्दिकरणाचे काम चालू आहे.
    दरवर्षी इथे कार्तिक पौर्णीमेला(त्रिपुरी पौर्णिमा बहुतेक!) खूप मोठा मेला असतो.उंटाच्या रेस हेही त्या मेळ्याचे खास आकर्षण असते.हजारो विदेशी पर्यटक ही इथे दरवर्षी पुष्कर मेळाव्याला येतात.

    अजुन काही माहिती असेल कुणाजवळ तर प्लिज लिहा.

    adm-पुलाचा रंग तसाच आहे

    प्रकाश
    -------------------------------------------------------
    Learn Guitar Online @ www.justinguitar.com

    केदार, उमेश
    धन्यवाद Happy

    प्रकाश
    -------------------------------------------------------
    Learn Guitar Online @ www.justinguitar.com

    मस्त आलेत फोटो. केदार , उमेश माहितासाठी आभार.

    ____________________________________________

    आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

    प्रकाश,

    सुरेख आलेत फोटो. अजून असले तर टाक.

    >>हो पुष्करला एकमेव ब्रम्हमंदिर आहे
    हे मात्र तेवढं खरं नाही. गोव्यात ब्रह्मा करमळीला (सत्तरी तालुका) ब्रह्मदेवाचे बरेच जुने देऊळ आहे.

    छान फोटो प्रकाश Happy
    -----------------------------------------
    - सक्षम दळवी

    सुंदर आहे ठिकाण आणि प्रकाशचित्रंही सुरेख.

    ही चित्रेही पिकासावरूनच इथे दिली आहेत असे दिसतेय. पण ही मला दिसत आहेत. हे काय गौडबंगाल आहे? Happy

    सुंदर फोटो.
    ************
    अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

    शेवटच्या फोटोत कलर काँबो काय जबरी आहे... ग्रेट.. फोटोही सुरेख आहेत..

    मुंबईत हवेत इतकी धुळ भरलेली आहे ना की असले फोटो पाहिलेत की तिथल्या लोकांचा हेवा वाटायला लागतो. किती स्वच्छ दिसतेय हवा...

    *****&&&*****
    Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

    छान फोटो...शेवटच्या फोटोत Green कलर फील्टर मुळे जरा भडक वाटतो...बाकि छान फोटो..

    जबरी आलेत फोटो.. पहिल्या फोटोतले प्रतिबिंब तर एक नंबर..
    =========================
    रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

    प्रकाश सुंदरच आले आहेत फोटो. Happy मस्त वाटले डोळ्याला एकदम. पाण्यातले प्रतिबींब आणखी स्पष्ट आले असते तर मजा आली असती. Happy

    इतक्या मोठ्या ऐतिहासिक स्थळाचे अजून फोटो असतील तर तेही टाका.. ३च कमी वाटतात.. हे तिन्ही फोटो सुंदर.
    विकिपिडीया वर ही माहिती सापडली- http://en.wikipedia.org/wiki/Pushkar

    -----------------------------------
    Its all in your mind!

    Pages