स्फुट - एक शाब्दिक वस्तरा

Submitted by बेफ़िकीर on 1 December, 2017 - 12:16

आयुष्य उधळलंय
नको वाटतंय सगळीकडून अंगावर येणं
घटनांचं, अपेक्षांचं, समाधानांचं, रोमांचांचं, शहार्‍यांचं

मी सापडत नाहीये कुठेच
मीपणा हवा तितका सापडतोय
पण टाळता येत नाहीये

कविता होऊन विरून जावंसं वाटतंय

विस्मरणात जावंसं वाटतंय, सगळ्यांच्या

निरर्थकाला अर्थ देताना वापरलेली बुद्धी
अर्थपूर्णतेला निरर्थक ठरवायला कमी पडतीय

माणसं नकोशी झालीयत

एकगठ्ठा चाललेली मेंढरं
एकमेकांना चिकटून चिकटून
निर्विकार डोळ्यांची निरुपद्रवी मेंढरं
आपल्यामुळे वाहतूक अडलीय
हे माहीतच नसलेली
बसवली की शेतात बसणारी
हाकलली की हाकली जाणारी
सणासुदीला कापली जाणारी

ही मेंढरं पाहून फार हेवा वाटतो
तसंच बनावंसं वाटतं

पाचोळाही व्हावंसं वाटतंय
कसाही, कुठेही, स्वेच्छेविरुद्ध उडणारा

फिटलेलं कर्ज व्हावंसं वाटतंय
स्वतःलाच अग्नी देणारं प्रेत
कुणाच्यातरी वक्षांवर घरंगळणारा दागिना
ओल्या डोळ्यांखालचा गाल
उंबर्‍यात उपडे ठेवलेले भांडे
दिवसभर वैतागून शेवटी सोडून फेकलेली साडी
एखाद्या कोनाड्यातील नगण्य वस्तू
दातात अडकलेली पेरूची बी
मजुराला चुकून सापडलेली नोट
गॅलरीतून नकळत खालच्या दिशेने सोडून दिलेले गुंतवळ
देवळातील पवित्र गंध

बरंच काही व्हायचंय!!!!

एक शाब्दिक वस्तरा मिळाला
तर सोलत जाईन स्वतःचा एक एक थर

=========
-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का माहिती नाही पण मला सगळं पटलं तुम्ही लिहिलेलं.
इतका खोलवर विचार करण्याची माझी कुवत नाही किंवा मांडण्याचीही.. पण मनात असे रँडम विचार येतात हे नक्की सांगू शकते.

Occam's razor (also Ockham's razor; Latin: lex parsimoniae "law of parsimony") is a problem-solving principle attributed to William of Ockham (c. 1287–1347), who was an English Franciscan friar, scholastic philosopher, and theologian. His principle states that among competing hypotheses, the one with the fewest assumptions should be selected.

In science, Occam's razor is used as a heuristic guide in the development of theoretical models, rather than as a rigorous arbiter between candidate models.[1][2] In the scientific method, Occam's razor is not considered an irrefutable principle of logic or a scientific result; the preference for simplicity in the scientific method is based on the falsifiability criterion. For each accepted explanation of a phenomenon, there may be an extremely large, perhaps even incomprehensible, number of possible and more complex alternatives. Since one can always burden failing explanations with ad hoc hypotheses to prevent them from being falsified, simpler theories are preferable to more complex ones because they are more testable.[3][4][5]

साभार, विकिपीडिया.

छान लिहिले आहे.

निरर्थकाला अर्थ देताना वापरलेली बुद्धी
अर्थपूर्णतेला निरर्थक ठरवायला कमी पडतीय >>> मस्तच !!