लग्नाआधीचे डेटींग ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2017 - 16:14

बेफिकीर यांच्या लग्नविषयक धाग्यावर लग्नात होणार्‍या खर्चावर चर्चा चालू होती. चर्चेच्या ओघात लग्नाआधी एकमेकांना समजून घेणे कसे आवश्यक असते यावर गाडी वळली. तिथे मी लग्नाआधी दोघांनी काही काळ एकत्र घालवण्याची गरज असते असे विधान केले. एकादोघांनी चुकून त्याचा अर्थ लिव्ह ईन रिलेशनशिप असा काढला आणि मला लिव्ह ईनवर वेगळा धागा काढायला सुचवले. पण मला लिव्ह ईन अभिप्रेत नव्हते. तरी जे म्हणायचे होते ते त्या धाग्याशी संबंधित नसल्याने हा वेगळा धागा काढला.

तर ज्यांची लग्ने ठरवून होतात, म्हणजेच जे अरेंज्ड मॅरेज करतात ते एकमेकांना कसे जाणून घेतात हे त्यांचे तेच सांगू शकतील. मला अनुभव नाही. पण लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाहात आपल्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे आपण एकमेकांना फार छान समजतो असा बरेच जोड्यांचा गैरसमज असतो. तो तसाच कायम ठेवून, ईतर शहानिशा करायची गरज न भासता बिनधास्त लग्न केले जाते. आणि मग लग्नानंतर प्रॉब्लेम्स सुरू होतात.
प्रत्येक प्रेमी युगुलाला वाटत असते की आपले प्रेम अमरप्रेम आहे, जगात आपल्यासारखे दुसरे कोणाचे नसावे. पण प्रत्यक्षात बरीच प्रेमप्रकरणे बाह्य सौंदर्यावर भाळून सुरू होतात. म्हणजे एखाद्या मुलाला एखादी सुंदर मुलगी आवडते. तो तिच्या मागे लागतो. तिला पटवायला तो बरेच पापड भाजतो. शेवटी त्याने आपल्या प्राप्तीसाठी केलेली धडपड हेच त्याचे प्रेम आणि तेच कायम राहणार असे समजून ती त्याला होकार देते. अर्थात तो आपल्या योग्यतेचा आहे का हे देखील साईड बाय साईड बघितले जाते. पण तेवढेच बघितले जाते. त्याचे आपल्याशी कसे जुळते हे तर अफेअर सुरू झाल्यावरच समजते. त्यामुळे अश्या प्रेमप्रकरणात प्रेम हे दोन्हीकडून उत्पन्न झालेले असेल याची खात्री नसते. ते आधी एकाच्या मनात उमलते आणि दुसर्‍याने केवळ त्याच्या भावनांचा स्विकार केलेला असतो. त्यातही ज्याच्या मनात हे प्रेम उमलले आहे ते वर नमूद केल्याप्रमाणे निव्वळ बाह्य आकर्षणावरून असेल तर पुढे त्यांचे दैनंदिन व्यवहारात कसे जमते यावरच त्यांचे नाते कसे फुलते आणि किती टिकते हे ठरते.

बरेचदा जे नाते मैत्रीपासून सुरू होते त्या नात्यांचे पुढे प्रेमात रुपांतर झाल्यास ते टिकायची संभावना जास्त असते. कारण त्यात केमिस्ट्री बरेपैकी आधीच जुळलेली असते.
पण यातही एक गंमत असते, दोघांमधील मैत्रीचे नाते मैत्रीच्या नजरेतून ठिकठाक असते. पण तेच नाते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे झाल्यावर काही समीकरणे बदलतात. एकमेकांवर सांगितला जाणारा हक्क आणि एकमेकांकडून धरल्या जाणार्‍या अपेक्षा यात आधीपेक्षा फरक पडतो. ते एकाला जरी उमजले नाही, किंवा उमजले पण जमले नाही तर नाते फिस्कटते. आणि मग फिरून मैत्रीही शिल्लक राहत नाही.

ईथे माझेच उदाहरण देतो.
मी आणि माझी सध्याची पर्मनंट गर्लफ्रेंड. आम्ही दोघे आधी मित्रच होतो. हळूहळू तिच्या बाजूने मैत्रीच्या पलीकडे गेले. आणि तिने मला प्रपोज केले. तिला नकार द्यावा असे काहीही कारण नव्हते. मात्र मी त्या नात्यासाठी तयार नव्हतो. मी तिच्याकडे वेळ मागितला. त्यानंतर आम्ही जवळपास दोन महिने एकत्र फिरत होतो. जवळपास दर संध्याकाळी भेटणे व्हायचे. कधी गार्डनमध्ये तर कधी मॉल वा रेस्टॉरंटमध्ये. दर शनिवारची एखादी वन डे ट्रिप व्हायची. बीच, रिसॉर्ट, वॉटरपार्क, नॅशनल पार्क, एलिफंटा केव्हस ते माथेरान, लोणावळा, मुंबई नजीकची सारी ठिकाणे यानिमित्ताने फिरून झाली. पण हे फिरणे नुसते मित्र म्हणून नव्हते. तर आम्ही डेटींग करत होतो. या मधल्या काळात आपल्या लग्नात येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणींवर देखील आम्ही चर्चा करायचो. तसेच संसार करताना काय मतभेद होऊ शकतील, कोणाला किती अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागतील याचीही एकमेकांना प्रामाणिक जाणीव करून द्यायचो. कारण क्षणिक भावनेच्या आहारी जात आम्हाला आयुष्यभराचा निर्णय घ्यायचा नव्हता. आधी लग्न करून तर बघूया, नाही जमले तर वेगळे होऊया असा उथळपणाही करायचा नव्हता. आणि मग पुढे दोनेक महिन्याने मलाही वाटले की येस्स, या नात्यातही आपण कम्फर्टेबल आहोत तेव्हा मी सुद्धा होकार दिला.

अरेंज मॅरेजमध्ये सध्या काय सिस्टीम आहे याची नेमकी कल्पना नाही. पण पूर्वीच्या काळी जी लग्ने ठरवून व्हायची त्यात कांदेपोहे कार्यक्रमात मुलामुलींनी एकमेकांना बघणे एवढीच काय ती मुभा असायची. त्यामानाने हल्ली दोघे बाहेर एकांतात एकदोन भेटी घेऊ शकतात. मात्र त्या भेटी एकदोनच असतात, आणि मर्यादा राखून असतात. मला अनुभव नसले तरी मित्रांचे ऐकतो. जास्त भेटी होत नाहीत कारण मग अमुक तमुक मुलगी तमुक तमुक मुलाबरोबर फिरत होती हा शिक्का बसायची भिती असते. अश्याने पुढचे स्थळ यायचे नाही. परीणामी पुर्णपणे समजून उमजून न घेताच होकार वा नकार कळवला जातो.

डेटींग ही आजही आपल्याकडे एक फिल्मी संकल्पना समजली जाते. पण हे चित्र बदलायला हवे. अरेंज मॅरेज असो वा लव्हमॅरेज, डेटिंग व्हायला हवी. अन्यथा लव्ह मॅरेजमध्येही एकाने प्रपोज केल्यावर समोरचा बोलणार मला वेळ हवा आहे. पण त्या मागून घेतलेल्या वेळेत डेटींग न करता फक्त घरी जाऊन, मित्रमैत्रीणींशी चर्चा करून, किंवा आणखी कसली आकडेमोड करून निर्णय घेणार याला काही अर्थ नाही. शेवटी लाख गोष्टींची एक गोष्ट - लग्नखर्चाचे बजेट निम्मे करा. आणि तो खर्च या डेटींग प्रकरणावर करा. लग्न टिकायचे प्रमाण वाढेल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नाच्या आधीचा डेटिंगचा रोमँटिक सुवर्णकाळ हे असले कॉन्ट्रॅक्ट करताना बनवतात तसले पेपर बनवण्यात वाया घालवायचा ???? देवा या पामरांना माफ कर!!!
>>>>>>>>

हे सारे डिस्कस कराल तरच अनुभवाल की किती मजा आलेली आम्हाला त्यावेळी हे सर्व डिस्कस करताना..
हे सारे डिस्कस करताना आपण आयुष्य एकत्र काढणार आहोत ही फिलींग ... जस्ट ईमॅजिन ... साला रोमान्स रोमान्स म्हणतात तो आणखी असतो काय..

साधी सुधी मिडलक्लास माणसं आपण. एक लोन काढून घर घ्यायचं, पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं, एवढेच काय ते इतिकर्तव्य. काय असे मोठे प्रॉब्लेम येणार आहेत आयुष्यात ?
>>>>>
ईनफॅक्ट म्हणूनच हे डिस्कस करायचे असते. जिथे साधेसुधे मिडलक्लास आयुष्य नसते तिथे मग मोकाट वार्‍यावर सोडलेल्या सुसाट गलबतासारखे जगायचे असते. मी सलमान खान असतो तर नसतो पडलो या फंदात Happy

ऋ, तुमचा हा डेटींग व लग्नाआधीचा करारनामा पाहून भयंकर न्यूनगंड आला होता आपण हे केवढं सगळं मिस केलं होतं म्हणून...पण असे बाकी कोणी सर्वसामान्य लोक्स करत नाहीत हे ऐकून बरे वाटले...धन्य आहात आपण..असते एकेकाची इश्टाईल, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Happy

Pages