न लिहलेलं पत्र...

Submitted by अजय चव्हाण on 23 November, 2017 - 16:08

प्रिय ..............

माहीतेय मला तुझ्या आयुष्याच्या डायरीतून माझं पान तु कधीच फाडून टाकलं आहेस आणि परत तुला ते कपटे जमा करून चिकटावावं असं वाटणारही नाही आणि कदाचित मलाही जोडून जोडून चिकटावासं वाटणारं नाही.....
गेलेले दिवस परत येत नाही आणि आलेल्या दिवसांत मला आठवणी सोडता आल्या नाहीत.
लेट ईट बी,मुव्ह ऑन स्वतःशीच बोलत खुप पुढे आलोय मी पण मनातल्या त्या छोट्याशा कोपर्यात अजुनही तु आहेस मेय बी तुझी ती जागा घेणारं कुणी भेटलचं नाही मला आणि परत असं कुणी भेटेलं असं वाटतं नाही आता...

आयुष्याचा तो प्रवास कधीच संपलाय..ते वळण खुप खुप मागे गेलयं...आता परत ते वळण येणं पुन्हा शक्य नाही....

ओंजळीत घेतलेली फुले टाकून दिली तरी तळहातांवर सुवास हा राहतोच ना?प्रेमाचही बहुतेक तसंच असावं..
तुझ्यावर प्रेम करणं सोडून जरी दिलं असलं तरीही...कुठेतरी मनात तो प्रेमसुवास अजुन आहे...त्या सुवासाने तु दिलेल्या आठवणी सुगंधतात.. फरक इतकाच आहे की, त्या आठवणी आता मला क्षुल्लक वाटतात...परत परत तेच निरर्थक जगणं आता नाही होत.. तुझं नि माझं जे काही नातं होतं त्याची गोळाबेरीज केली तर माझी बाजु नेहमीच वजाबाकीची होती..गुणाकाराने प्रेम जरी करत होतो तरी तु भागाकराने काटछुट करत राहीलीस...इतकी की, उरलेला शुन्यही तुला पुसायचा.. नको पुसायचा प्रयत्न करूस..मीच पुसतो...

माझं प्रेम तुझ्यासाठी त्रास असेल तर हो मी तुला त्रासच दिला पण तु मला खुप काही देऊन गेलीस...माझ्या कविता तु दिलेल्या भावनेने बहरतात...तु नसशील कधी वाचल्या पण कधीतरी शोधशील तर त्यात तुला तुच भेटशील...एखाद्या कागदाच विमान उडवण्यासाठी टीचकी द्यावी लागते आणि तीच टीचकी तु मला दिलीस..मी बदललो..खुप काही नव्याने कळलं आणि स्वतःला सिद्ध करायला धडपडायला लागलो आणि अजुनही धडपडतोय पण एकेदिवशी माझं कागदाच विमान नक्की उडेल..खुप खुप उंच जाईल...सो टीचकी दिल्याबद्दल धन्यवाद... खुष राहा...

फक्त .........

( तुझाच वैगेरे लिहण्यात काही अर्थ नाही....कारण तु माझी जरी असली तरी तुझा मी कधीच नव्हतो...सो टिंब टिंब बरंय आपलं.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कविता तु दिलेल्या भावनेने बहरतात...तु नसशील कधी वाचल्या पण कधीतरी शोधशील तर त्यात तुला तुच भेटशील.. >> भारी लिहिलय आवडल

छान.