पहाट

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 November, 2017 - 08:24

पहाट

पूर्वेला जाग आली
कोंबड्यान बांग दिली
मातीच्या कणाकणात
रानजाई गंधाळली

रासक्रीडा रातभर
खेळली चंद्रकोर
उधळून केशर, जाई
फुला फुलावर

धुरकट पांघरून
रान आळोखे देई
झाडावर भूपाळी
रानपाखरु गाई

गोकुळात गौळयाघरी
लगभग ही न्यारी
सडासंमार्जन करीती
दहीवराच्या घागरी

गोठ्यात क्षीरसागर
गुजगोष्टी पाणवठी
ओंजळीत सुवर्णकण
हरपले देहभान

पानोपानी सळसळ
रान घालीते शीळ
नंदी शिंपीतो मळा
ओवी जात्याच्या गळा

काकड्याला जाहला
विठू नामाचा गजर
जागं झालं पंढरपूर
कर्पूरगंध मनभर
पहाटगंध रानभर

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर

शशांकजी सुगंधी दादी साठी दरवळते आभार !
राहुलजी ,
पंडितजी ,
साधनाजी
तुम्हा सर्वांचेही खूप आभार उस्फूर्त प्रतिसादासाठी !