घनदाट काळोखानंतर...

Submitted by सचिन संदानशिव on 20 November, 2017 - 07:51

घनदाट काळोखानंतर...

घनदाट काळोखानंतर
झुंजुमुंजु होताना
पुन्हा मलूल दिवस
तुझ्या आठवणीत उगवताना...

निमूट आकाशाला व्यापून
काळे ढग दाटतात
मग तुझ्या आठवणीही
पुन्हा आपसूक मन कोरतात...

मग पावसाच्या सरी
हळूहळू बरसू लागतात
आणि खिडकीच्या काचेवर
मग चित्र तुझं रेखाकतात...

तू आहेस खिडकी पलीकडे
मग होतो त्या चित्रातून भास
ढगांमधून लख्ख वीज चमकावी
तशी तुला बघण्याची आस...

मग पुन्हा आठवू लागते
तुझ्या पत्यावरील ती भिजरी वाट
हळूहळू मग वाहू लागते
त्यावर तुझ्या आठवणींची लाट...

दिवस उगवणार
दिवस मावळणार
पाऊस बरसणार
आठवणी उसवणार
हा आठणभर पाऊस
शेवटी कधी सरणार...

Group content visibility: 
Public - accessible to all site users