सिनेमा रिव्ह्यू - तुम्हारी सुलु :) मैं कर सकती है!

Submitted by अजय चव्हाण on 19 November, 2017 - 17:45

तुम्हारी सुलु Happy मै कर सकती है!

सुपरमॅनच्या पोझमधली, साडी घातलेली, सुपरवुमन भासणारी विद्या आणि अगदी खालीच असलेला न्यु ब्रॅण्ड रिबिन लावलेला चकाकता प्रेशर कुकर... सिनेमाचं पोश्टरच सिनेमाविषयी एक वेगळपणं सांगून जातं...ह्या सिनेमाची रिसेपी थोडी वेगळी आहे नेहमीच्याच पठडीतला मसाला न वापरता किंवा कुठल्याही आडवळणाची फोडणी न घातलेला असा हा सिनेमा कुकुरमध्ये शिजवलेल्या साध्या खिचडीसारखाच रूचकर आहे..

"मैं कर सकती है !" सिनेमाच्या कॅचलाईनतच एक प्रकारचा पोझीटीव्ह अप्रोच आहे आणि हा पोझिटीव्ह अप्रोच पुर्ण सिनेमाभर थोडाफार टिकवून ठेवण्यात दिग्ददर्शक सुरेश त्रिवेणी यशस्वी झालेत हयात नो डाऊट...सिनेमा नायिकाप्रधान आहे हे ट्रेलर पाहून कळतंच पण त्याहीपेक्षा तो स्त्रीसुलभ भावप्रधान आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये..

कधी कधी आपल्याला जिंकायचं असतं, आपल्याला काहीतरी करायचं असतं, नेहमीचंच चाकोरीबध्द जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं धाडसं असतं अंगात पण नेमकं काय करावं हेच कळत नाही म्हणून आपण दिसेल, सापडेल त्यात उडी मारून "ते वेगळं" शोधायचं प्रयत्न करतो...अशाच काहीशा संभ्रमात असलेली सुलोचना अशोक दुबे ऊर्फ सुलु (विद्या बालन) ही आपला नवरा अशोक,11 वर्षाचा मुलगा प्रणव,नेहमी टोमणे मारणार्या मोठ्या बहीणी आणि त्या कशा बरोबर आहेत हे सांगणारे तिचे बाबा ह्या सार्यात ती स्वःतला शोधतेय.. एक पत्नी, एक आई, एक गृहणी म्हणून ती उत्तम आहेच पण फक्त गृहणी म्हणून आयुष्य किचनमध्ये, कपड्याभांड्यामध्ये न घालवता काही तरी केलं पाहीजे असं तिला नेहमी वाटतं असतं आणि जिंकण्याची हौस कुणाला नसते..प्रत्येकालाच जिंकायचं अगदी छोटया छोट्या गोष्टीतही स्वतःला जिंकलेलं पाहणं आवडत तिला मग मुलाच्या शाळेत असलेली चमाचा लिंबूची स्पर्धा असो की,रेडीओवर झालेली काॅन्टेस्ट ह्या सार्यात ती जिंकतच असते..सुलु ही फुल ऑफ लाईफ जगणारी व्यक्ती आहे..ती स्वतःची फेवरेट आहेच शिवाय तिला श्रीदेवी,हेमामालिनी, बालसुब्रहमण्यमची मिमिक्री चांगली करता येते असं तिला वाटणारी, नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात सहभाग घेणारी आणि त्यात जिंकण्याची हौस असणारी , स्वप्ने बघणारी अशी सुलु आपल्याला आपलंसं करते..

रेडीओची काॅन्टस्ट जिंकल्यानंतर बक्षिस घ्यायला गेलेल्या सुलुला एक "आप आर.जे बन सकते हो" अशी जाहीरात दिसते आणि त्यासाठी ती स्वतःला क्वालिफाय करायला कशी धडपडते आणि आर जे बनल्यानंतर ती भुमिका निभवता निभवता तिच्यातली बायको,आई,गृहणीची भुमिका निभावणं तिला जमतं का? आणि त्यात तिला कुठले संघर्ष येतात त्यावर ती कशी मात करते हे सर्व सिनेमात पाहीलेलच बरं..

ह्या सिनेमाची कथा ही प्रत्येक त्या स्रीची कथा आहे जी घर आणि काम दोन्ही सांभाळत तारेवरची कसरत करत घरादाराचा तोल सांभाळते मग त्यातली घुसमट, कधी वाटलेला आनंद, काळजी,कुतुहूल,भीती, विरोध, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास ह्या सार्यात गुंतलेल्या स्रीसुलभ भावभावना म्हणजेच हा सिनेमा..
फस्ट हाफ मस्त हलकाफुलका झालाय कित्येकवेळा खळाखळाळून हसतो आपण पण मध्यतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळला जरी असला तरी वास्तववादी दाखवल्याने जमून जातं.

अभिनयाच्या बाबतीत विद्या बालनने कमाल केलीय अगदी सहजरितीने स्वतःच्या खांद्यावर पेललाय तिने हा सिनेमा ..ह्या सिनेमातला तिचा गोड चेहरा आणि हावभाव अगदी "कभी आना तु मेरी गल्ली" गाण्यामधल्या नवख्या विद्याची आठवण करून देतात तरीही कुठेतरी आपल्या नकळत आपण सुलुची तुलना इंग्लिश विंग्लिशमधल्या श्रीदेवीने साकारलेल्या "शशी"शी करू लागतो आणि त्यात विद्या थोडीशी डावी वाटते इतकंच..
बाकी मानव कौलने साकारलेला नवरा, कर्मचारी मस्तच.. स्पेशली त्याने केलेला "बन जा तु मेरी रानी" मधला डान्स नॅचरल वाटतो...
नेहा धुपियाला बर्याच वेळाने चांगला रोल मिळालाय म्हणून की काय अंगप्रदर्शन आणि रोडीसची फालतुगिरीची नाटके सोडून तिनेही "मारीया" साकारायला थोडीफार मेहनत घेतलेली दिसतेय...
विजय मोर्याने साकारलेला कवि कम स्क्रिपरायटर "पंकज"धमाल उडवून देतो...
आर.जे. मलिश्काला आर.जे अलबेलीच्या रोलमध्ये परद्यावर पाहणं तितकसं झेपत नाही..

चित्रपटातलं संगीत छान आहे "बन जा तु मेरी रानी हे गाणं अप्रतिम तर आहेच शिवाय हवा हवाई हे गाणं फारशी भेसळ न करता साकारलयं हे नशिब फक्त तुकड्या तुकड्यात हे गाणं चित्रित केल्यामुळे थोडासा हिरमोड होतो..
छायांकन बर्यापैकी चांगल आहे आणि दिग्ददर्शनही ठिकठाकच आहे..

पात्रे :

सुलोचना दुबे ऊर्फ सुलु : विद्या बालन
अशोक दुबे : मानव कौल
मारीया : नेहा धुपिया
विजय मौर्या :पंकज
मलिश्का: आर जे अलबेली
पाहुणा कलाकार: आयुष्यमान खुराना.

का पाहावा:

स्वतःवर आत्मविश्वास असल्यावर काय करता येत हे आजमावण्यासाठी व "मै कर सकती हू"किंवा "मैं कर सकता हू "
हे स्वतःला परत एकदा सांगण्यासाठी.

नामांकन: ***1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय माधुरी माधुरी करता रे.. कोणत्या चित्रपटात खूप भारी अकटिंग केलीय तिने?
श्रीदेवी आणि विद्या अनिटाईम 100 टाइम्स बेटर than माधुरी.

माधुरी, जुही आणि श्रीदेवी यांच्यातील सामाईक बाब म्हणजे चुलबुल्या भुमिका त्या तिघी उत्स्फुर्तपणे साकारायच्या. त्यांच्या काळातल्या चित्रपटात हिरोईनकडून याच आणि ईतक्याच अपेक्षा असल्याने त्यांनी आपापला काळ गाजवला. हिरोईनींमधील स्टार मटेरीअल तिघींमध्ये अर्थातच ठासून भरलेले होते.

आणखी एक म्हणजे गोल चेहर्‍याच्या हिरोईनी त्या काळी पारंपारीक प्रेक्षकांकडून पटकन स्विकारल्या जायच्या. उभट चेहर्‍याच्या मॉडर्न समजल्या जायच्या.. हल्ली मॉडर्न उभट चेहरेही तितक्याच आवडीने स्विकारले जातात

बघितला. संवाद एेकू आले नाहीत अगदी प्राण कानात गोळा करून ऐकायचा प्रयत्न केला तरी. एकतर त्या सिनेमाघराची आवाजाची यंत्रणा खराब असेल किंवा आजूबोजूला चाललेला प्रंचड गोंधळ, गडबड, कोलाहल, खूप सारी लहान मुलं आणि लहान मुलांच्या वरताण आवाज करणारे मोठे ( फक्त वयाने). सतत काय खायचं याची चर्चा, सगळ्यांचे पाय तुडवत ते बाहेर जाऊन घेऊन यायचं, रॅपरचे आवाज करत उघडायचं आणि खायचं. लोकांंना चित्रपटाला जाणं म्हणजे पिकनीकला जाणं वाटतं का. यापुढे जास्त तिकीट असलेल्या ठिकाणी जाऊन चित्रपट बघावा असं मनात आहे. तिथे कदाचित लोक कमी आवाज करत असतील.

बाल्कनीतच बसले होते मी Happy बांद्राच्या प्रसिद्ध गॅलेक्सीमध्ये. सबरबिया किंवा ग्लोबसला असा क्राऊड नसावा कारण तिथेे तिकीट अडीचशे वगैरे आहे.

Once upon a time we use to consider Galaxi in Bandra as high class theater Happy>>>

अगदी खरं..ती तीन थिएटर होती ना.. गॅलेक्सी, गेईटी आणि तिसरे असेच ग वरून सुरु होणारे..नाव आठवत नाही.. मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जायचो तिकडे तर तिथे जाऊन नवीन सिनेमा बघणे हा ट्रिपचा हाय पॉईंट असायचा Happy तेव्हा एकदम पॉश वाटायचा तो सगळा माहोल..आता काय परिस्थिती आहे माहिती नाही.

>> बांद्राच्या प्रसिद्ध गॅलेक्सीमध्ये. सबरबिया किंवा ग्लोबसला असा क्राऊड नसावा कारण तिथेे तिकीट अडीचशे वगैरे आहे.

टू जज्जमेन्टल? Happy

ती तीन थिएटर होती ना.. गॅलेक्सी, गेईटी आणि तिसरे असेच ग वरून सुरु होणारे..नाव आठवत नाही.. >>>>> आठवत नाही, मग गझनी असेल Happy

ती तीन थिएटर होती ना.. गॅलेक्सी, गेईटी आणि तिसरे असेच ग वरून सुरु होणारे..नाव आठवत नाही.. >>>>> आठवत नाही, मग गझनी असेल >>>>>1 Happy

ऋन्मेऽऽष भारीच...हं..

काही हाय क्लास वगैरे नाहीये. बाल्कनीत हा गोंधळ तर स्टाॅलचा विचारच न केलेला बरा. जजमेंटल नाही झालं पाहीजे, बरोबर आहे सशल तुमचं. असा अनुभव कुुठेही येऊ शकतो. आता तिथे सात चित्रपटगृहं आहेत. तीन मुख्य मध्ये मासला अपील होणारे म्हणजे व्यावसायिक तर बाकी चार छोट्या थेटर्समध्ये मराठी किंवा हिंदी कलात्मक असे चित्रपट लागतात. पण एवढा पसारा वाढला तरी तिथे लिफ्ट का नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. तिन मजले चढून जावं लागतं बालकनीसाठी. डोंबिवलीला मधुबनमध्ये तर चार सुनसान मजले चढून गेल्यावर दंगल चित्रपट बघायला मिळाला होता.

टू जज्जमेन्टल?>>> No but this is fact in India now. The multiplex crowd is better and you can go there with family. In fact in Gurgaon (where I stay) there are hardly any single screen cinemas exists. Yes we have to pay premium for this. (Rs. 375/- per ticket in PVR and 250/- in other multiplexes for big star new release).

No but this is fact in India now.
>>
+१

मागे लपाछपी बघायला गेले असता, विशिष्ट राज्यातले ८-१० लोक मराठी चित्रपट बघायला आलेली होती व प्रत्येक भीतीदायक सिनला मोठ्याने कमेंट्री करुन पुर्ण चित्रपटाला विनोदी चित्रपट करुन ठेवला व माझे पैसे वाया घालवले. ते मुख्य गाणे परत परत वाजते, तेव्हा तर त्यांना अजुनच जोर चढत होता. अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली म्हणुन यांचे सगेसोयरे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करतात, तिथे मी एकटा काय करणार ते ही नया बंबई सारख्या त्यांच्या इलाख्यात म्हणुन मला गप्प बसावे लागले.

Mandard +१

मी सिनेमा पाहिला .आवडला .सगळ्यांचीच काम मस्त झालीत .हे परीक्षण ही योग्य आहे

Pages