जळते जंगल ...रस्ता नाही !

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 November, 2017 - 13:46

मार्ग काढ वणव्यातुन याही
जळते जंगल... रस्ता नाही !

बंद घराचे कुलुप बिचारे ;
वाट तुझ्या येण्याची पाही

कुणी वाचले नाही ह्यातुन
अहंकार जाळेल तुलाही !

उघड्यावरही घुसमट होते
चांदण्यातही लाही-लाही !

वेळ येउ दे त्याच्यावरती
समजुन येइल मग त्यालाही

तुझी काय पत्रास ठेवतिल ?
विकून खातिल धरणीलाही

उद्या तुझा होईल कदाचित !
आज नसावा तो त्याचाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>उघड्यावरही घुसमट होते
चांदण्यातही लाही-लाही !>>>वाह् ! आह् खरंतर! सुरेख शेर!

>>>उद्या तुझा होईल कदाचित !
आज नसावा तो त्याचाही>>>मस्तंच!