सुरक्षा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 November, 2017 - 02:26

सुरक्षा

(नुकत्याच झालेल्या कोठडी मृत्यू नंतर वाटले कितीही चौक्या , पहारे बसवले तरी आईच्या पोटातच आम्ही सुरक्षित असतो .)

सुरक्षित मी आईच्या उदरी
घाव किती घेइ ती स्वता:वरी ?
मोजायला पडती अंक अपुरे
अशी सुरक्षा ना कोठे भूवरी

कवचकुंडल ते ममतेचे
अभेद्य सामर्थ्य तयाचे
अबोल मी जरी पोटात
बोल मौनाचे ऐके कानात

जरी फिरतो आता चिलखतात
अथवा कडक सुरक्षा घेऱ्यात
तरीही असुरक्षित मी असतो
मृत्यू मागावर येताना दिसतो

शहाळे झेलते घाव जोवरी
पाणी आत खळाळ करी

कळीतून बाहेर येता
फुल लागते मृत्यू पंथा

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरक्षित मी आईच्या उदरी
घाव किती घेइ ती स्वता:वरी ?
मोजायला पडती अंक अपुरे
अशी सुरक्षा ना कोठे भूवरी >>> मस्तचं