कोरियन स्पाईसी चिकन

Submitted by अदिति on 14 November, 2017 - 20:48
लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

चिकनः १२-१५ मध्यम आकाराचे तुकडे, मी बोनलेस घेतलेत
सॉस साठी:
सोया सॉस : ३/४ टे. स्पु.
तिळाचे तेल: १.५ चमचा
लिंबु रस : १/२ लिम्बु
ब्राउन शुगर : ३ चमचे (मी गुळ घेतला, त्यावर ईन्डियन ब्राउन शुगर लिहीले होते :प )
मिरे पुड : १ चमचा
व्हिनेगर : २ चमचे
अद्रक लसुन पेस्ट : १ चमचा
कांद्याची पात : बारीक कापुन २ चमचे
तिळ : १ चमचा
कोरियन चिली पेस्ट (गोचुजांग) : चवी प्रमाणे (मी २ मोठे चमचे घेतली)
मिठ : चवी प्रमाणे (सोया सॉस मधे व चिली पेस्ट मधे मिठ असतेच, मी अज्जिबार घेतले नाही)
सॅलाड साठी:
मुळा सॅलाड
१. कोरियन मुळा : बोट्भर लांबीच्या बारीक सळ्या कापलेल्या १ वाटीभर
२. मिठ: चवीपुरती
३. साखर : चवीपुरती
४. राईस वव्हिनेगर: २ चमचे
५. मिरे पावडर : १/४ चमचा
६. तिखट हव असेल तर लाल तिखट पुड
काकडी सॅलाड
१. काकडी: बारीक तुकडे करुन. १ कप (चौकोणी साधारण शेंगदाण्याच्या आकारा ईतके)
२. गाजर : १/४ कप (काकडी कापली त्याच आकाराचे)
३. मिठ : चवीपुरते
४. साखर : चवीपुरती
५. लिंबाचा रस: १ चमचा
स्प्रिन्ग ऑनियन सेलाड
१. कांद्या ची पात : बोटभर लांबीची कापुन त्याचे लेन्थ वाईस बारीक तुकडे करायचेत. म्हणजे एका बोट्भर पातीचे उभे ४ तुकडे
२. सोया सॉस: १/२ चमचा
३. तिळाचे तेल: १/२ चमचा
४. तिळाचे भाजलेले दाणे : १ चमचा
५. चवीला लाल तिखट
६. मिठ : सोया सॉस टाकला असल्यामुळे मिठ जास्त लाग्णार नाही त्यामुळे चवी प्रामणे अ‍ॅडजस्ट करा.

क्रमवार पाककृती: 

१. सॉस चे जिन्नस एकत्र करुन मिक्स करुन घ्या
२. त्यात चांगले धुउन आणि निथळुन चिकन चे तुकडे टाका
३. साधारण १ तासभर फ्रिज मधे ठेवुन मुरु द्या
४. चिकन मुरेपर्यन्त सॅलाड चे जिन्नस एकत्र करा. चव घेउन मिठ, साखर, आंबट्पणा अ‍ॅडजस्ट करा Happy हे मुरल्यावर छान लागतात, जेवण्याच्या १/२ तास तरी आधी बनवा.
५. मुरलेले चिकण एका पॅन मधे एका लेयर मधे रचुन झाकण ठेउन शिजवा. चिकण काढुन घेतल्यावर उरलेला सॉस बाजुला ठेवा.
६. साधारण १० मिनीट एका बाजुला शिजवुन उलथण्याने उलथुन घ्या. उरलेला सॉस परत चिकणवर लावा
७. दुसरी बाजुही साधारण १० मिनीटे शिजवुन घ्या.
IMG_7855.jpgIMG_7860.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

स्टिकी किंवा आपाल्या नेहमीच्या भाता बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांनाब१/२ चमचा कांद्याची पात आणि भाजलेल्या तिळाने सजवा. (ऑपशनल)
गरम गरम खायला द्या.
लागणार्या वेळात १/२ तास तयारीसाठी, १ तास मुरवण्यासाठी आणि १/२ तास शिजवण्यासाठी धरला आहे.

माहितीचा स्रोत: 
नेट वरुन, रेस्टॉरन्ट मधे खाउन आणि ट्रायल आणि एरर करत
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

नाव वाचुन या रविवारी लगेच मेन्युमधे नविन डिश टाकुन दिली, पण पहिल्या ५ ingredients मधे गुळ वाचला आणि रेसिपीला लगेच पास. साखर आणि गुळ असलेली चिकन रेसिपी कित्त्त्त्त्त्तीही बेस्ट असली तरी नाहीच विचार करु शकत. मलाका स्पाइसमधे किंचित गोडसर चवीच्या साउथ इस्ट एशियन डिशेस खाल्ल्य्या आहेत, पण तेवढ्च. माझ्या टेस्ट बड्स चिकन आणि गोड चव एकत्र नाही अ‍ॅक्सेप्ट करु शकत.

किंवा मग without brown sugar / Jaggery करुन पाहिली तर?

फोटोशिवाय लोकांना रेसिपी मस्त आहे हे कसे कळते कमाल आहे... Happy
बाकी माझ्या तर स्पाईसी चिकन वाचूनच तोंडाला पाणी सुटले ती गोष्ट वेगळी..

ह्या विक एन्ड ला परत बनवणार आहे तेव्हा फोटो टाकेन. पण त्यात सॅलाड वेगळे असणार आहे Happy
काल बनवलं तेव्हा ईथे रेसिपी टाकेन असा विचार केला नव्हता Happy

मी हा ब्रॅन्ड वापरला >> https://www.amazon.com/Chung-Jung-One-Gochujang-500g/dp/B013HB0CC4

प्राजक्ता शुगर चवी साठीच वापरली.

मनीमाउ, साखरेशिवाय कोरियन स्पायसी चिकन वाटणार नाही पण चव चांगलीच लागेल

आभा, वेगवेगळी ठेवायचेत.
आमच्या ईथे, रेस्टॉरंट मधे सर्व्ह करतांना एका प्लेट मधे चिकन (किंवा जी काही मेन डिश ऑर्डर केली असेल ती) आणि छोट्या छोट्या वाट्यांमधे भात आणि ईतर ८/१० प्रकार तरी असतात. ऑर्डर दिल्यावर ह्या साईड डिशेश आधी सर्व्ह केल्या जातात. आणि मग मेन डिश येते. ह्या साईड्स मधे किमची, सॅलड्स चे प्रकार, स्टिम/ फ्रिईड वेजीस, पिकल्स, एक ग्लास नुडल नावाचा प्रकार असतो. क्वांटीटी अगदी चमचाभरच असते पण आवडलेला प्रकार परत मागवता येतो.

मनीमाउ, साखरेशिवाय कोरियन स्पायसी चिकन वाटणार नाही पण चव चांगलीच लागेल >>>> थॅन्क्स आदिती. साखर सोडता बाकी कोणत्याही इन्ग्रिडिअंट्स मधे कॉम्प्रमाइज केलं नाही. सगळे तु सांगितलेस तेच वापरले आणि चिकन अतिशय आवडलं. नेहमीची एकच चवीची ग्रेव्ही खाउन कंटाळा आला होता. गरम भात आणि स्पाइसी चिकन = बेस्ट रविवार दुपारचं जेवण.