हम तो तेरे आशिक हैं...... नवि मालिका

Submitted by निर्झरा on 8 November, 2017 - 02:34

आज पासून झी मराठी वर " हम तो तेरे आशिक हैं ही नवि मालीका सुरू होत आहे. प्रोमो वरून तरी ' भाभीजी घर पर है' ह्या मालीकेसारखी असेल असे वाटते आहे. मालीका बघायला कारण म्हणजे दोन मुख्य पात्र पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच टिपिक विषय वाटतोय.
बायका शेजारयावर लाईन मारतात असा ट्रॅक ट्राय करायला हवे होते.
बाकी हा विषय पुरुषांनाही जिव्हाळ्याचा असल्याने मालिका चालायला हरकत नाही.

रीमा लागू, जतीन कनकिया( हेच ना नाव?) , अर्चना पूरणसिंह.आणि राकेश बेदी यांची एक मालिका होती . श्रीमान श्रीमती . ?

बायका शेजारयावर लाईन मारतात असा ट्रॅक ट्राय करायला हवे होते. >> मग ती मालिका सेक्स अँड द सिटी वर आधारित आहे अशी ओरड झाली असती. Happy
बरे आहे, झी अशाच मालिका आणू दे म्हणजे टीव्ही पासून अजून दूर राहायला कारण असेल.

बरे आहे, झी अशाच मालिका आणू दे म्हणजे टीव्ही पासून अजून दूर राहायला कारण असेल.

>> हम्म. ऑलरेडी होम मिनिस्टर बघणं सोडून दिलं आहे, लागीर झालं जी बघितलंच नाही एकदाही, तुझं माझं ब्रेकप सुद्धा पाहिलं नाही एकदाही आणि आता चला हवा येऊ द्या सारख्या हलक्या फुलक्या मालिकेला थांबवून तिथे ही येडछाप मालिका. झी शी नातं हळूहळू तुटून जाईल अश्याने.

आता चला हवा येऊ द्या सारख्या हलक्या फुलक्या मालिकेला थांबवून तिथे ही येडछाप मालिका.
>>

चला हवा येऊ द्या बंद होतेय?

चला हवा येऊ द्या बंद होतेय? >>> काही दिवस gap घेतायेत. सारेगमप आहे आता. मार्चमध्ये परत सुरु करणार असं काल news मध्ये सांगितलं.

याविषयावर अनेक मालिका येऊन गेल्या आहेत, भाभीजी घर पे है, श्रीमान श्रीमती वगैरे.
या मालिकेत काही नावीन्यपुर्ण दाखवले तर विशेष, नाहीतर बघण्यात काही अर्थ नाही.

पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओकसाठी बघायला आवडेल मला ही मालिका. त्यांचं काॅमेडीचं टायमिंग मस्त असतं. Happy प्रसाद ओकची बायको झालीय तिचं काम पण आतापर्यंत बघितलंय तर चांगलं करते ती.
काॅमेडीच असेल तरच बघेन.

नवऱ्याची बायको कधी बंद होणार?

>> तिचा टीआरपी घसरला तर एका दिवसात पण बंद होईल.
पण सगळ्यात हायेस्ट टीआरपी तिचाच आहे सध्या असं ऐकिवात आहे.

मग ती मालिका सेक्स अँड द सिटी >>>>> आता ही कोणती मालिका? वेब सिरीज असेल तर होऊ दे ओरड.. छोट्या पडद्यावर असे विषय यायला हवेत.. समाज कुठे चाललाय आणि मालिका कुठे चालल्या आहेत.. मला वाटते की करन जोहारने यात हात टाकावा. तो तर काळाच्या पुढे जाणारा दिग्दर्शक आहे. निदान यांना काळाबरोबर तरी घेऊन येईल

हे असे शेजा-याच्या बायकोवर लाईन मारणे वगैरे अजिबात आवडत नाहीत, श्रीमान श्रीमती अपवाद, स्टार्ट टू एन्ड मनोरंजन केलंं मालिकेने. ही मालिका काही विशेष दिसत नाही. नागपूरचा हेल काढून झाला आता कोल्हापूरच्या मागे लागलेत.

नवऱ्याची बायको कधी बंद होणार? >>> चिरंजीव होण्याचे वरदान आहे तिला बहुतेक. Trp वर एक नंबरला असते असं मागे tv वर सांगितले. त्यामुळे धोका नाही अजिबात.

जीव रंगला पण बंद झाली पाहिजे.. राणा तालमीत जातो, अंजली शाळेत जाते रोज.. असे च एपिसोड वाढवत जातायत..
लागीर भारी वाटते.. जयडी एक नंबर आहे...

जीव रंगला पण बंद झाली पाहिजे
>>>>
नको त्याचे टायटल सॉग खूप मस्त आहे.

@ पुष्कर श्रोती आणि प्रसाद ओक, यांची कॉमेडीची स्टाईल आता आऊटडेटेड झाली आहे.

पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओकसाठी बघायला आवडेल मला ही मालिका. त्यांचं काॅमेडीचं टायमिंग मस्त असतं. >>> + १००००० .
त्यान्ची फार पूर्वी एक सिरियल लागायची . आदिति सारंगधर होती त्यात . ते दोघ मित्र की काहितरी असतात . एकाच घरात भाडेकरू म्हणून रहात असतात .
जबरदस्त कॉमेडी होती त्यात.

हि खूप चकचकीत मालिका आहे ..अस वाटत सिनेमाच बघतोय ..पहिला भाग मस्त होता ...कलाकार सगळे चांगले आहेत ..पण भाषा डोक्यात जाते ..

पहिला एपिसोड जसाच्या तसा छापला,
भाभीजी शिल्पा शिंदे असती तर खूप मज्जा आली असती तिज्यासारखेच नखरे असतील तर नक्की बघेन... बाकी पुष्कर नि प्रसादची जोडी कमाल करेल असे वाटते...

शिल्पा शिंदे सध्या बिग बॉस मध्ये बिझी आहेत. मी ती काम करत असलेले दोन भाग बघितले असतील. छान करायची. दीप्ती केतकर तेवढं नाही करू शकणार अर्थात तुलना अशी करणे पण योग्य नाही. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते.