कॉन्सर्ट्स लुक

Submitted by GANDHALI TILLU on 7 November, 2017 - 13:15

कॉन्सर्ट्स लुक
गंधाली टिल्लू
हिवाळ्याच्यी चाहूल लागली असताना मित्र आणि मैत्रिणींबरोबर लाईव्ह म्युसिकचा आनंद घेत संध्याकाळच्या सतरंगी आकाशात हात उंचावून मन आणि तन डोलावण्याचा नवीन ट्रेंड हल्ली पुण्यात बघायला मिळत आहे. ह्यावर्षीच्या सुरवातीपासूनच भारतात अनेक जागतिक कीर्तीचे तरुणाईच्या गळ्यातले ताईत असणारे बँड्स आणि कलाकार येऊन गेले आहेत. दरवर्षी साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यात अनेक कॉन्सर्ट्सचे,संगीत कार्यक्रमांचे आयोजन केला जाते .अगदी भारतीय शास्त्रीय संगीताला दाद देणारी सवाई गंधर्वला जाणारी तरुण मंडळी NH7 च्या रॉक आणि पॉप कॉन्सर्ट्सना थिरकताना दिसत आहेत.इंटरनेटच्या जमान्यात जगातल्या दर्जेदार संगीताचा ठेवा एका क्लीकवर उपलब्ध असताना त्यातून चांगल्या संगीतप्रकारांना प्रोत्साहन देणारी आजची तरुण पिढी ह्या कार्यक्रमांना स्वतः ऐकायला, अनुभवायला जाते हे कौतुकास्पद आहे.अशाच हटके कॉन्सर्ट्सना जायला मुलींना वेगळे कपडे घालावे लागतात तर त्यासाठी क्लुप्त्या!

वन पीस/ ड्रेस : ड्रेस हे अर्थातच मुलींना सुंदर दिसतात पण अशा कार्यक्रमांना विशेष म्हणजे टवटवीत आणि भडक रंगाचे कपडे नक्कीच चांगले दिसतात. काळ्या, गडद निळ्या आणि लाल रंगाचे अनेक ड्रेस अंगावर उठून दिसतात. त्यावर एखादी छानशी फेडोरा हॅट तुमच्या संपूर्ण लूकला चार चांद लावेल. शक्यतो तुमच्याबरोबर एखादा फिकट रंगाचा स्कार्फ किंवा स्टोल ठेवा ज्याचा वापर तुम्ही उठवासाठी आणि थंडीपासून अंगाचे रक्षण करण्यासाठीसुद्धा वापरू शकाल. साध्या ड्रेसवर बेल्ट कमरेला बांधला तरी ते साधे आणि सोप्पे दिसेल. चकचकीत ड्रेस शक्यतो घालू नयेत. ते दिवसा जर तुम्ही जाणार असाल, तर सुंदर दिसत नाहीत.तुमच्या मानाप्रामाणे साजेसा विचार करून लांब ड्रेस किंवा लहान ड्रेस निवडावा.

black dress.jpgtshirts d.jpeg

लांब टीशर्ट ड्रेस : सध्या बाजारात लांब टीशर्ट आणि ड्रेस ह्यांचे संमिश्रण असलेले ड्रेस लोकप्रिय झाले आहेत. ते होजियरी आणि कॉटनच्या कापडाचे असल्याने अतिशय आरामदायक आहेत. त्यावर वेगळ्या प्रिंट्स, चेक्स , किंवा ग्राफिक्समुळे ते तरुण मुलींना आकर्षित करत आहेत. अनेक वेबसाईट्सवर तुम्हाला कस्टमाइज्ड ड्रेस मिळू शकतात ज्यात तुमच्या आवडीचे प्रिंट तुम्ही त्यावर छापून घेऊ शकता. शक्यतो अशा ड्रेस ची गुडघ्यापर्यंत लांबी असते. त्याखाली पांढरे किंवा काळे शूस घातलेत तर तुमचा लुक समकालीन आणि हटके होईल. साधारण ५०० ते १००० रुपये ह्याची किंमत आहे.

डेनिमचा जॅकेट: डेनिमचा गडद किंवा फिकट निळ्या रंगाचा जॅकेट तुमच्या कुठल्याही ड्रेसला खुलवण्यास मदत करतं! फ्लोरल किंवा साध्या ड्रेसवर हे जॅकेट सुंदर दिसते. शक्यतो जर का तुम्ही साधा ड्रेस घातला असेल तर हे जॅकेट घातल्यावर तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल ह्यात काहीच शंका नाही! लीलया आणि सहज दिसण्यासाठी त्याखाली साधे सँडल्स किंवा चामड्याचे बूट घालावेत.

फ्लोरल वन-पीस: अनेकविध रंगांमध्ये, कपड्यांमध्ये तुम्हाला फ्लोरल म्हणजेच फुलांचे प्रिंट असलेले वन पीस बघायला मिळतील.पुण्यातील ‘नीलम बुटिकचे’ रईस खान म्हणतात कि, त्यांच्याकडून रोज किमान २० ते ३० फ्लोरल ड्रेस मुली, बायका घेऊन जातात. हि फॅशन खूप जुनी असली तरी तिला अतिशय मोठी मागणी आहे. सभ्य आणि सुरेख अश्या प्रिंट मुळे नक्कीच एक प्रसन्नता तुम्हाला जाणवते. शक्यतो पिवळ्या, गुलाबी, निळ्या, लाल, नारंगी अशा आनंदी आणि उल्हसित करणाऱ्या रंगांचे ड्रेस वापरावेत.३०० रुपांपासून २००० रुपयांपर्यंत तुम्हाला हे मिळतील.

dress floral.jpegjeans.jpg

क्रॉप टॉप आणि जीन्स : अर्थातच खिशाला परवडेल अश्या कपड्यांचं योग्य स्टायलिंग केलंत, तर त्यामुळे तुम्ही नाक्कीच इव्हेंट साठी तयार होऊ शकता! काळ्या किंवा गडद निळ्या, ब्राऊन, पांढऱ्या अशा रंगांच्या हाय वेस्ट जीन्स म्हणजे कमरे पर्यंतच्या पँट्स घालून त्यावर क्रॉप टॉप घातला किंवा कापरेपर्यंत टॉप घातलात, ग्राफिक्स प्रिंट्सचा टीशर्ट घातलात तरी तुम्ही चांगले दिसू शकता! त्याखाली बूटीस किंवा हिल्स चांगल्या दिसतील.तुम्ही टॉप वर चाम्बड्याचे जॅकेट घातले तरी एक वेगळी ओळख तुम्हाला मिळेल.

शॉर्ट्स: शॉट्स म्हणजे लहान पँट्स ज्या विविध प्रकारात आणि रंगछटांमध्ये उपलब्ध आहेत. रिप्प्ड शॉटर्स , डेनिम शॉर्ट्स , स्पोर्ट्स शॉर्ट्स ह्या विशेष मागणी प्रकारातल्या शॉर्ट्स वर ढगळ टीशर्ट , शर्ट घातलात कि तुम्ही कूल आणि मस्तमौला दिसाल!योग्य रंगसंगतीचा आणि कापडाचे संयोजन केलेत तर कमीत कमीत खरचातला हा लुक तुम्हाला जास्तीतजास्त लोकप्रिय बनवेल! त्याखाली लोंफेर्स, स्नीकर्स आणि रेनबूट्स क्लासिक पोशाख बनेल !
crop top.jpegwhite-summer.jpg

डंगरी: लांब आणि लहान अशा दोन्ही प्रकारात हे उपलब्ध आहेत. डेनिमचा डंगरी हा कुठल्याही टीशर्टवर चांगला दिसतो तसेच चाम्बड्याचे सुद्धा उत्तम आहेत. त्याच्या आत अर्धी बाही असलेले, पूर्ण बाही असलेले रेघांचे, चेक्सचे किंवा साधे सुती कापडाचे टीशर्ट्स अप्रतिम भासतात! फिकट रंगाचे टीशर्ट्स आणि निळ्या रंगाचा डंगरी हे संयोजन सुरेख दिसते. अनेक चित्रपटातील नायिकांनी हा लुक घातला आहे. कतरीना कैफच्या जग्गा जासूस मधील पिवळ्या टीशर्ट्सवरील निळी डंगरी व त्याखालील स्नीकर्स गोंडस दिसले आहेत. साधारण ५०० ते १००० रुपयापर्यंत हे तुम्हाला विकत घेता येतील.

पलाझो पँट्स आणि टॉप : पारंपरिक
आणि आधुनिक ह्या दोन्हीचा संगम म्हणजे हा लुक आहे ! त्तुम्ही रेघांच्या पँट्स, विविध रचनेच्या, आकाराच्या प्रिंट्स असलेल्या पँट्स तुम्ही टॉप बरोबर संयोजन करून घालू शकता. साधा कुर्ता किंवा सुती कापडाचा लहान टॉप घालून त्यावर लांब कानातले घातलेत ,तर व्यक्तिमत्वाला एक सुंदर आब मिळेल ! रंगसंगतीचे अनेक प्रयोग तुम्ही करू शकता! शक्यतो ह्याखाली चपला किंवा साद्या सॅंडल, चप्पल, मोजड्या सुरेख दिसतील!
dungeree.jpgpants.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा मस्तं , खूप दिवसात वाचलं इथे फॅशन ट्रेंड्स वर !
बाकी पुण्यात रॉक कॉन्सर्ट सिझन , कॉन्सर्ट फॅशन्स वगैरे , looks like new Pune .
यु.एस. मधे स्प्रिंग मधल्या फेस्टिवल फॅशन्स, त्यातला कोचेला व्हॅली फेस्टीवल हे मेजर चर्चेचे विषय आहेत, मजा येते त्या ट्रेंड्स् इन्स्टाग्रॅम वर फॉलो करायला.
इथला कोचेला पाम स्प्रिंग्स म्युझिक फेस्टीवल वाळवंटातल्या एरीयात असतो त्यामुळे तिथे अर्थातच क्रॉप टॉप्स, ब्रालेट्स, बिकिनि टॉप्स हे शॉर्ट्स वर घालणे ही मुख्य ट्रेंड .त्यावर बांगड्या आणि इतर देशी इन्स्पायर्ड ज्वेलरी , मेंदी आणि फॉइल टॅटुज.
गंमत म्हणजे सोशल मिडीयावर नॉन देशी लोकांनी म्युझिक फेस्टिवलला बिंदी आणि मेंदी काढून घेतल्याबद्दल प्रोटेस्ट गृप्सही म्युझिक फेस्टिवलच्या वेळी अ‍ॅक्टिव्ह होतात . ( Its not fashion for your music festival, it’s my culture ‘ अशी भंपक टिप्पण्णी करणारे.)
बाकी अर्टिकल मधले फोटो बघून तिथेही कायली , केंड्ल , जिजि हदिद इ. लोकांचा प्रभाव आहे असं दिसतय.

छान लेख! प्लाझो सध्या हिट आहे असं दिसतंय.

बाकी पुण्यात रॉक कॉन्सर्ट सिझन , कॉन्सर्ट फॅशन्स वगैरे , looks like new Pune .

+१ सिरियसली! आम्ही आपले अजून नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे पुण्यात सवाई गन्धर्व, पार्किंग कुठे करू आणि काय काय खाऊ हाच विचार करतो! सवाई लास्ट अटेंड करूनच खूप वर्ष झाली.

हिवाळ्याच्यी चाहूल लागली असताना मित्र आणि मैत्रिणींबरोबर लाईव्ह म्युसिकचा आनंद घेत संध्याकाळच्या सतरंगी आकाशात हात उंचावून मन आणि तन डोलावण्याचा नवीन ट्रेंड हल्ली पुण्यात बघायला मिळत आहे.>>>>>>>>>>> ऐकावे ते नवलच. खरंच पुणे बदलतंय.. बाकी कपड्यांच्या ट्रेंड्सबद्दल काही एवढी आयडिया नाही.

तुमचा लेख इतक्या विचित्र मराठीत का लिहिला आहे? मूळ लेख तुमचाच आहे का की अनुवाद केला आहात?
भारतातल्या फॅशन ट्रेंड्सची कल्पना नाही पण वरचे फोटो पाहून आपल्याकडच्या हवामानाला किंवा क्राऊडला सूट होणार्‍या स्टाईल्स टाकल्या असत्यात तर ते जास्त बरं वाटलं असतं बघायला.

गंधाली,
मायबोलीवर स्वागत आणि इथल्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन. या आधी मटा मधे तुझे काही लेख वाचले आहेत. तुझ्यासारख्या तरुणाईला मराठीत काही लिहायचं आहेत याचंच आम्हाला अप्रूप आहे. तुला जसं जमेल त्या भाषेत आणि हव्या त्या विषयावर लिही. आधीच मराठीत लिहण्याची इच्छा असणारे तुझ्यासारखे महाविद्यालयीन तरूण कमीच. तुमच्या भाषेचा लहेजाही सगळीकडे माध्यमातून कानावर पडणार्‍या मराठीचा असणार. शहरी भागात तुझ्यासारखी मराठीत लिहिणारी तरूणाई नामशेष होणारी जमात आहे (Endangered Tribe) असं मी गमतीने म्हणेन पण ते कदाचित सत्यही असू शकेल.
मायबोलीवर अनेक जण पहिल्यांदाच मराठीत लिहायला लागले आणि त्यातल्या काहींनी नंतर पुस्तकेही लिहिली आहेत. तेव्हा इथल्या काही कॉमेंटसमुळे घाबरून जाऊ नकोस. लिहित रहा. लग्गे रहो !

मला यातलं काही कळत नाही पण तुझ्यामुळे मला माझ्या नातीच्या विश्वात थोडंसं बघायला मिळतं आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून लेखन वाचायला आवडेल.

Hello, All the images were taken from royalty free image websites like pexels and free stock. Thank you everyone for your kind words!