हा जन्म पुन्हा नको...!

Submitted by sandip dake on 6 November, 2017 - 08:17

hijra_0.jpg
एखाद्या सिग्नल वा पेट्रोल पंपावर थांबल्यावर एखादा हिजडा येताना दिसला की, आपण पळ काढण्याचा प्रयत्न करतो.माञ तो आपल्याकडे येतो ते फक्त भिक मागण्यासाठी.हिजड्यांना समाजाने मुख्य प्रवाहात कधीचं राहु दिलं नाही.त्यामुळे भिक मागुण आपल्या पोटाची खळगी भरण्याशीवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो.
हिजड्यांना बघुन काहींना आनंद होतो तर काहींना राग येतो.माञ याचं समाजातील काही लोक या हिजड्यांचं लैंगीक शोषण करतात...त्यांना अश्लिल भाषा आणी वाईट नजरांनी त्यांच जगणं मुश्कील करुन टाकतात.
त्यांना ना कोणी कामावर ठेवतं ना त्यांना कोणी आपलं समजतं.पावला-पावलावर समाज त्यांची चेष्टा करायला तयार असतो.ट्रेन मध्ये हे हिजडे भिक मागण्यासाठी फिरत असतात.
ऐ चिकने...ऐ हिरो...म्हणतं तरुण,कॉलेजकुमार यांच्या गालावरुन हात फिरवतं पैसे जमा करतात.त्यांनी ठरवलं तर पैसे घेतल्याशिवाय एखाद्याला सोडतसुध्दा नाहीत व गरज पडल्यास ...वर करण्याची धमकी सुद्धा देतात.हा प्रसंग रेल्वेप्रवाश्यांना एकदा तरी आलेला असतो.
हा सगळा प्रकार पाहुन कुणीही त्यांचा द्वेषचं करणार हे तर साहजिकचं आहे.परंतु हिजड्यांना हे करावंचं लागतं कारण परीस्थीतीने त्यांना हे सगळं करण्यासाठी मजबुर केलेलं असतं.स्वतः च घर सोडलेलं असतं,कुटुंबाने,समाजाने वाळीत टाकलेलं असतं आणी मग जगण्यासाठी,पॊटाची आग विझवण्यासाठी भिक मागावी लागते.भीक मागण्याची पध्दत "दिली तर प्रेमाने नाहीतर धमकीने".
रेल्वेतही आम्हाला हिजड्यांच्या हातातील दहा रुपयांच्या नोटा दिसतात.माञ या नोटा गोळा करताना हवसचे गिधाडं जो ञास त्यांना देतात ते आम्ही मस्त उघड्या डोळ्यांनी बघत असतो.गर्दीचा फायदा घेतं कुणी त्यांच्या अंगावर-अंग घासतो तर कुणी त्यांच्या हिप्सला हात लावतो तर कुणी "चलतीक्या म्हणुन त्यांच्या देहाचे लचके तोडण्यासाठी तयार असतो.
"मी हिजडा व्हावं वा आपला मुलगा ट्रान्सजेंडर जन्माला यावा अशी कुणाची मनो-मन इच्छा असते का?" नाही,अशी कुणाचीचं इच्छा नसते परंतु मुलगा वयात आल्यानंतर त्याला मुलांबद्दल लैंगीक आकर्षण वाटायला लागतं व त्यावेळेस त्याला आपल्यातला स्ञीभाव लक्षात येतो.गर्भात झालेल्या गोंधळामुळे ट्रान्सजेंडर म्हणुन त्यांचा जन्म होतो.यासाठी त्यांचे आई-वडीलही दोषी नाहीत आणी स्वतः ही ते नाहीत.देवा-दिकांच्या काळापासुन त्यांच अस्तित्व आहे.महाभारतात त्यांचे उल्लेख "किन्नर" म्हणुन सापडतात.
भारतीय संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिले परंतु आजही समाजात विषमतेची बीजं वाढताना दिसत आहेत.हिजड्यांना आजही समाजाचा घटक म्हणुन बघीतल्या जात नाही.
अलिकडे माळशिरस तालुक्यात एका ट्रान्सजेंडरला सरपंच म्हणुन निवडुन आणले अशा घटना अपवादानेचं दिसतातं.भारतात ३०००००० लाख ट्रान्सजेंडर आहेत.त्यांनी लढा देऊन २०१४ साली भारतातील कायदाव्यवस्थेला ट्रान्सजेंडरला तिसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणुन मान्यता देण्यास भाग पाडलं.माञ समाजाकडुन त्यांच्या पदरी निराशाचं पडली.
सध्या समाजात हिजड्यांना दिलेलं स्थान पाहता "हा जन्म पुन्हा नको" असचं प्रत्येक हिजड्याला वाटत असतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्दीचा फायदा घेतं कुणी त्यांच्या अंगावर-अंग घासतो तर कुणी त्यांच्या हिप्सला हात लावतो तर कुणी "चलतीक्या म्हणुन त्यांच्या देहाचे लचके तोडण्यासाठी तयार असतो. >> किळस वाटली.