नेणिवेला जाणिवेने छेदता...

Submitted by अनन्त्_यात्री on 2 November, 2017 - 07:41

नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
सकल ते समजून घेणे कधिच का सोपे नसे?

या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी

कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम

वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त..... केवळ सुंदर....

हत्ती आणि आंधळे.... उपमा फारच चपखल..

शेवटची द्विपदी... कळसच....

______/\____

Shashankji, sincere thanks for your insightful response!

शशांकजी च्या जाणिव धाग्यावरच्या लिंक मुळं पुन्हा वाचली....
पुन्हा आवडली
एकच विषय दोन पद्धतीने उमगला...किती , कसा विचारु नका ?