उपास एक गैर समजूत
कालच कार्तीकी एकादशीचा उपास झाला. आपल्यापैकी बर्याच जणांनी तो खिचडी, बटाट्याचा किस, दाण्याची आमटी अशा विविध पदार्थानी साजरा केला. आपण उपासाची परंपरा पाळली. परंपरा म्हणण्याचे कारण साधारणतः वेद, उपनिषिदे, पुराणे , कथा आणि परंपरा असा धर्माचा प्रवास झालेला आहे. प्रत्येक वेळेस त्याच्यात बदल होत गेलेले आहेत.
खरं म्हणजे तो शब्द उपास नसून उपवास असा आहे . उपवास म्हणजे उप + आवास. म्हणजे जवळ राहणे किंवा देवाजवळ राहणे. आपल्यापैकी किती जण त्यादिवशी निदान परमशक्तीची आठवण करतात, तिचे आभार मानतात, हे प्रत्येकाने आपल्या मनाशी तपासून बघावे . महाराष्ट्रात उपसत प्रामुख्याने साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे हे पदार्थ खाल्ले जातात.
बटाटा :
हा पदार्थ अँडीज पर्वत रांगेच्या पायथ्याशी पेरू आणि बोलिव्हिया देशात प्रथम उत्त्पन्न झाला.सोळाव्या शतकात त्याचा प्रवास स्पॅनिश लोकांमार्फत यूरोपमध्ये झाला. आणि त्या नंतर तो कधीतरी सतराव्या शतकात भारतात आला.
साबुदाणा :
साबुदाणा हा पदार्थ इंडोनेशिया किंवा मलेशिया या देशात पूर्वपाररित्या झाडाच्या चीक पासून तयार होत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साबुदाणा टॅपिओका किंवा कॅसाव्हा या कंदमुळांपासून होऊ लागला.
शेंगदाणे:
रानटी शेंगदाणे प्रथम साऊथ अमेरिकेत आढळून आले बहुदा अर्जेंटिना मध्ये त्याची सुरवात झाली असावी त्यातून तो संकरित जाती होऊन पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे व इतर देशात पसरला. साऊथ अमेरिकेत जरी तो सात हजार वर्षांपासून अस्तित्वात असला तरी भारतात तो कधी आला हे माहिती नाही .
थोडक्यात हे तिन्ही पदार्थ भारतीय नाहीत. त्याशिवाय उपासाला खाण्याला अजून काही नियम लागू होतात. जसे शेंगदाणा चालतो पण तेल नाही, कोथींबीर चालते पण धने नाही. बरे याला आहारातील बदल म्हणावे तर हे सर्व पदार्थ वातूळ व पचायला जड असतात. बऱ्याच जणांना हे पदार्थ खाल्यामुळे पित्त होते व पचन क्रिया मंदावते. या परंपरा सोळाव्या सतराव्या शतकानंतर सुरु झाल्या असाव्यात हे उघड आहे. वेदात किंवा उपनिषिदांत कोठेही अशा प्रकारच्या उपवासाचा उल्लेख नाही. निर्जळी किंवा तत्सम उपासाने कुठलाच धर्म पळाला जात नाही. शरीराला त्रास देणे याचाच अर्थ धर्माच्या साधनाला त्रास देणे असा आहे. शरीरं अद्यं खलु धर्म साधनम I असे धर्म वचन आहे.
कर्नाटक मध्ये तर वेगळीच तर्हा तिथे उपासाला चिवडा, पोहे असे भात सोडून बरेच पदार्थ चालतात. बंगाल मध्ये काही ठिकाणी मासे ही चालतात. त्याला ते गंगेची फळे म्हणतात .
थोडक्यात उपवास पाळणारे कमीच. आणि उपासाची परंपरा पाळतात.
खऱ्या अर्थाने उपवास करू या. त्या पर्मशक्तीचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया आणि चुकीच्या परंपरेपासून दूर जाऊया .
उपास एक गैर समजूत
Submitted by अविनाश जोशी on 1 November, 2017 - 05:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरा भारत समजून घ्या. प्रत्येक
खरा भारत समजून घ्या. प्रत्येक गोष्टीसाठी वेद्पुराणात घुसायची काही-एक गरज नाही. जे वेद-पुराणे काही मूठभरांची मक्तेदारी होती आत्ता-आत्तापर्यंत. त्यात काय लिहिलं की नाही यावर भारतीयांनी कसे वागावे हे ठरवायची काही-एक आवश्यकता नाही.
खरा तो एकचि धर्मः मेरे मन को भाया मै कुत्ता काटके खाया.
आपआपल्या घरात आपआपल्या पद्धतीने उपास करणार्या, हवे ते खाणार्या, नको ते सोडणार्या लोकांना त्यांच्या मताप्रमाणे करु द्यात. तोच खरा सहिष्णु भारतीय धर्म आहे.
बाकी बटाटा, साबुदाणा, शेंगदाणे वगैरे चे मूळ 'कंदमूळ व फळे खाऊन' वाल्या उपासनेत आहे. कंदमूळ जमिनीखाली येतात, तेव्हा जमिनीखाली जे जे पिकतं ते सर्वच उपासाला चालतं प्रकारात मोडतं. तसेच लोक मेरे मन को भाया पद्धतीने स्वतःचे नियम करतात तयार.
उपवासाचा खरा अर्थ काय आहे त्या फंदात पडू नये असे वाटते. काहीकाळाने लंघन करणे उत्तम असते शरीरासाठी, त्या काळात शरिराला कष्ट पडू नये म्हणून आराम करावा, आराम चालु असतांना डोक्यात शैतान माजू नये म्हणून साधना करावी असा सिम्पल फंडा आहे. तो बदलत बदलत भलताच झाला आहे.
धर्म-पंथाच्या नावाखाली काय खावे-प्यावे चे नियम आहेतच. बराच गोंधळ आहे. हे गैर ते गैर करणारे सामान्यांना कन्फुज करतात, गिल्ट वाढवतात, त्यांना आपल्या पद्धतीने वागण्यास भाग पाडतात. तुम्ही खाताय ते खरे धार्मिक खाणे नव्हेच, तुम्ही पाळताय तो खरा धर्मच नव्हे, आमच्या पद्धतीने वागा तो खरा धर्म ती खरी इश्वरभक्ती असे सुप्त मेसेजींग असते या सगळ्या उपदेशा-चर्चांच्या पाठी.
वाह छान लिहलेले आहे
वाह छान लिहलेले आहे
विषय चोथा झाला असला तरी
मग नक्की खायच काय ??? फक्त
मग नक्की खायच काय ??? फक्त फळे आनि दुध का उपवासाकरिता.
की सगळे खाऊन देवाजवळ राहायच म्हण्जे उपवास ???
उपवासाकरता कोणतेही खाण्याचे
उपवासाकरता कोणतेही खाण्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही. आरोग्य दृष्ट्या आहारबदल अवश्य करावं पब त्याला धर्माची झालर लावू नये.
देवाजवळ असणे म्हणजे अंतर्मुख होणे.
की सगळे खाऊन देवाजवळ राहायच
की सगळे खाऊन देवाजवळ राहायच म्हण्जे उपवास ???
>>>>
या केस मध्ये माझ्यासारखा नास्तिक माणूस कसा उपवास करत असेल?
आणि आस्तिक माणसेही मनाने देवाजवळ राहत असतील, पण जर प्रत्यक्षात देव वगैरे काही नसेलच (ज्याचे चान्सेस जास्त आहेत) तर त्यांनी केलेला उपवास हा सुद्धा एक भ्रमच झाला नाही का?
बाकी देव (असल्यास) काही खा आणि काही खाऊ नका असे सांगत नाही याच्याशी सहमत.
त्यामुळे अमुक तमुक देवाच्या नावाने वार पाळणे आणि मांसाहार न करणे हे मलाही मजेशीर वाटते. जर तुम्ही मांसाहार करता तर उपलब्धतेनुसार वर्षाचे ३६५ (लीप ईयर असेल तर ३६६) दिवस कधीही खायला हवे.
देवाजवळ असणे म्हणजे अंतर्मुख
देवाजवळ असणे म्हणजे अंतर्मुख होणे.
साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे
साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे परदेशी म्हणून वाईट म्हणता. बंगाली लोक तिकडे लोकल मिळणारे मासे खातात तर त्यांनाही नावे ठेवताय. कर्नाटकातही लोकल पदार्थ खात आहेत तर ते ही बरोबर नाही म्हणताय.
उपवासाला काही करायची गरज आहे का नाही हे प्रत्येक जण आपलं आपलं बघून घेईल असं वाटत नाही का?
उपवासाला काही करायची गरज आहे
उपवासाला काही करायची गरज आहे का नाही हे प्रत्येक जण आपलं आपलं बघून घेईल असं वाटत नाही का?
>>>>
उपवासाचा संबंध धर्माशी जोडला जात असेल तर तो कसा करायचा हे आमचे आम्ही बघून घेऊ असे बोलणे धाडसी ठरेल. तुम्हाला त्या धर्मात लिहिलेल्या प्रथापरंपरांच्या चौकटीतच तो पाळावा लागेल. तुम्ही त्याबाहेरचे स्वत:चे मनाचे नियम बनवू शकत नाही.
ऋ बाळा, परत एकदा वाच. ते सगळे
ऋ बाळा, परत एकदा वाच. ते सगळे एकाच हिंदू धर्माबद्दल आहे.
हिंदू धर्माला अशी काहीही चौकट
हिंदू धर्माला अशी काहीही चौकट नाही.
उपासाला अमूक चालते, तमूक चालत
उपासाला अमूक चालते, तमूक चालत नाही अश्या परंपरा/पद्धती पुर्वीही असणार. आता ज्या गोष्टी बाहेरून आल्या जसे बटाटा, मिरची, साबुदाणा, शेंगदाणे ते 'उपासाला चालत नाही' या यादीत नसणार कारण हे जिन्नसच नव्हते पुर्वी. म्हणून मग ते 'चालतात' असे झाले असणार.
बाकी धर्म, धर्मचिकित्सा, तत्वज्ञान, संस्कृती, रुढी, परंपरा या सगळ्याचा चिवडा सगळीकडे आहे. त्या चिवड्यातून फक्त भांडणे होणार. आणि एखादा विषय तपासताना यातल्या एखाद्या अंगाने पुढे जायचे तर त्यासाठी अभ्यास हवा, चिकित्सक वृत्ती हवी, शिक्षण (मेथॉडॉलॉजी) हवी. आमचे आदर्श पांडुरंग सांगवीकरबुवा म्हणून गेलेत 'कागद स्वस्त आहे म्हणून लिहितात, उद्या एक कागद एक लाख रुपायला मिळायला लागला तर कोण लिहील'. इंटरनेटने तर स्वस्त काय, कागद फुकटच केला.
एकदा जंगलात सगळे प्राणी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या देवळाकडे चालत निघालेले असतात. तेव्हड्यात त्यांच्या बाजूने एक कोंबडी भुर्र्कन स्कुटीवरून बुंगाट जाते. का?
.
.
.
.
.
कारण एकादशीला कोंबडी चालत नाही.
सोनू,
सोनू,
माझ्या वाक्याचा अर्थ काढण्यात काहीतरी गल्लत होतेय बहुधा.
ते सारे एकाच हिंदू धर्माचे आहे पण जर एखादी गोष्ट धर्माच्या नावावर जर तुम्ही काही पाळत असाल वा आचरणात आणत असाल तर त्यात माझ्या मर्जीने मी काहीही करेन असे चालत नाही.
खाली अमितव यांनी प्रतिसाद दिला आहे बघा - हिंदू धर्माला अशी काहीही चौकट नाही - त्यांनी माझ्या पोस्टचा बरोबर अर्थ काढलाय पण प्रत्युत्तर म्हणून जे लिहिले आहे ते मान्य नाही.
हिंदू धर्माची चौकट मोठी आहे किंवा तुलनेत फ्लेक्सिबल आहे असे बोलू शकता पण चौकट ही आहेच.
मी नास्तीक आहे, पण मम्मी
-
असो बापडी.
असो बापडी.
तुमचा आणि आमचा हिंदू धर्म वेगळा दिसतोय.
अमितव, जेव्हा तुम्ही एखाद्या
अमितव, जेव्हा तुम्ही एखाद्या माणसांच्या समूहाला एका धर्माच्या नावावर एकत्र आणतात तेव्हा ती कन्सेप्ट म्हणजेच चौकट नाही का झाली ..
बाकी मी कुठला धर्म वगैरे मानत नाही. मी माझ्या मनाने वागायला मोकळा आहे.
माझ्या स्माजेनुसार हिंदू
माझ्या स्माजेनुसार हिंदू धर्माला अशी कोनाती चौकट नाही
चौकटीशिवाय एखादा धर्म किंवा
चौकटीशिवाय एखादा धर्म किंवा व्यक्तींचा समूह डिफाईन कसा होतो?
>>>>चौकटीशिवाय एखादा धर्म
>>>>चौकटीशिवाय एखादा धर्म किंवा व्यक्तींचा समूह डिफाईन कसा होतो?.>>>
जसा कुठल्याही वेद /उपनिषदात "हिंदू" शब्द न येता , हिंदू धर्म define होतो तसा
एखादी परंपरेने चालत आलेली
एखादी परंपरेने चालत आलेली गोष्ट निरर्थक वा कालबाह्य आहे हे माहीत असून देखील त्याच त्याग करायला मन धजावत नाही अशा गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे सध्याचा उपवास. आरोग्यासाठी लंघन करणे त्या त्या प्रकृतीच्या साठि उपयोगी असते हे सर्वांना माहित आहे. पण उपवासाची सर त्याला नाही. उपवास ही एक (अंध)श्रद्धा आहे त्यामुळे काही लोकांना बर वाटत. कुणाला त्रास तर नाही ना? असे समजून लोकही दुर्लक्ष करतात.
प्राणघातक उपास, आरोग्यावर
प्राणघातक उपास, आरोग्यावर दूरगामी परिणाम करणारे उपास हे धर्मश्रद्धांच्या नावाखाली केले जातात. त्यांच्याबद्दल धर्मधुरिणांकडून कधी प्रबोधन झालेले दिसत नाही.
अंनिसवाल्यांनी केलं तर विपरित परिणाम होतो.
सिंम्बा, ये वेदो मे क्या लिखा
सिंम्बा, ये वेदो मे क्या लिखा गया है मुझे पता नही.
पण मला एकापेक्षा जास्त लग्न करायची असतील तर माझे हिंदू असणे याच्या आड येते.
तर ही चौकट नाही का झाली?
ती धर्माची चौकट आड नाही येत,
ती धर्माची चौकट आड नाही येत, कायद्याची येते
>>>>उपवासाकरता कोणतेही खाण्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही. आरोग्य दृष्ट्या आहारबदल अवश्य करावं पब त्याला धर्माची झालर लावू नये.>>>
याला अनुमोदन.
तरी अजून "तुम्ही फक्त हिंदू धर्मियांच्या उपासाबद्दल बोलता,
रोजे सोडताना मुसलमान किती हेवी खातात, त्याच्या बद्दल बोलायची हिम्मत नाहीं का?" वगैरे ओरड करणारी यशस्वी गँग आली नाही का इकडे?
जाऊ दे...मी कटतो या धाग्यावरून.
बरं.
बरं.