ताटातुट

Submitted by Vishal More on 31 October, 2017 - 00:01

आयुष्य सुंदर असाव अस नेहमी वाटत नेहमी हसता याव रोज सगळ स्वप्नवत व्हाव हे शेवटी एक स्वप्नच राहिल तुझ्या सनिध्यत घालवलेला प्रत्येक क्षण मन मोहरून गेला.सगळ आगदी मनाप्रमाने जुळून आल्यानंतर ही आपली ताटातुट होइल अस कधि वाटल नव्हतं काय चुकल आणि नेमक कोनाच चुकल? या प्रश्नांची उत्तर शोधन आता निरर्थक आहे अस मला वाटत.
माझ अस कधीच नव्हतं की लग्न करेल तर फक्त तुझ्याशिच पण जिच्याकडे बघून लग्न कराव वाटल ति तुच. तु सांगत होतीस आपण कुठेतरी थांबायला हव पण मी ते कधी ऐकलच नाही मला नेहमी वाटायच सगळ ठिक होईल पण तेव्हा कळत नव्हतं ना इथे कोणतीच गोष्ट मनाने घडत नाही.
मुळात आपला वेगळ होण्याचा निर्णय हा एका दिवसात झाला अस नाही मागील बऱ्याच दिवसांपासून मला अस जाणवत होत की आपण एकमेकापासुन खुप दूर गेलोय.
तुझ्यावरती निस्निम प्रेम केल अगदी मनापासून कदाचित हेच चुकल कारण याच प्रेमापोटी माझ्या अपेक्षा वाढल्या तु फक्त माझी आहेस ही भावना बळावली कदाचित याच भावनेमुळे तुझ्या स्वातंत्र्यावर गदा आली असेल पण मला ती कधीच जाणवली नाही.
इतके दिवस आपण दोघानी बरच काही सहन केल समाजाकडून, घरच्याकडून, मित्राकडून ते आपण दोघानी समर्थपणे निभावुन नेल त्रास झाला पण एकमेकांच्या सनिध्यात तो कधि जाणवलाच नाही.
खर सांगु ह्या सगळ्यत माझ्या मनाची निरागसता पार हरवून गेली होती. तुझ्यावर प्रेम करता करता तुझ्या डोइवर माझ्या अपेक्षाच ओझ मी वाढवतच गेलो तुझ्या सुखासाठी तुझ्या इच्छेखातर जगाची कसलीच तमा न बाळगता.
मी पूर्णपणे तुझा झालो
तुझाच होतो.
तुझाच आहे.
अजुनही...

#मोरे_विशाल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
शुद्धलेखनाच्या आणि लिहिण्याच्या ओघात झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात.
पुलेशु.