स्पेशल प्रॉसीक्यूटर रॉबर्ट म्यूलर आणि आतापर्यंतच्या घडामोडी

Submitted by अजय on 30 October, 2017 - 10:32

गेले काही महिने स्पेशल प्रॉसीक्यूटर रॉबर्ट म्यूलर आणि त्यांचे काम याबद्दल अमेरिकन माध्यमातून वेळोवेळी वाचायला, ऐकायला मिळत होते. दोन्ही राजकीय पक्ष आपआपल्या दृष्टीने त्याला रंग देत होते. अगदी शुक्रवार सकाळपर्यंत रॉबर्ट म्यूलर ला काढून टाकण्याच्या मागण्या होत होत्या.

आज दोन व्यक्तींवर खटला भरून हे प्रकरण एका निश्चित पातळीवर पोहोचले आहे. खटल्याचे मूळ कायदेशीर कागदपत्र प्रकाशीत झाले आहे. सहज गंमत म्हणून ते वाचायला घेतले. अगदी सर्वसामान्य वाचकाला कळावी अशी भाषा पाहून जरा धक्काच बसला. पण शक्य झाले तर हे वाचण्यासारखे आहे.
https://www.justice.gov/file/1007271/download

(हे डॉक्युमेंट लोड व्हायला जरा वेळ लागू शकतो.)

स्पेशल प्रॉसीक्युटरची वेबसाईट सुरु झाली आहे. आणि या बाबतचे सगळे अधिकृत आणि सार्वजनिक कागदपत्र तिथे उपलब्धआहेत,/
https://www.justice.gov/sco

या बातमीबद्दल आणि पुढील घडामोडीबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आपलं राजकीय धागा शोधायला गेलो अन मग लक्षात आलं, तुम्ही धागा बंद केला ते. हा उघडलात ते बरं केलत.
अनिवे, झाला दंगा सुरु.
https://www.yahoo.com/news/george-papadopoulos-bad-news-donald-180310317...

वेगवेगळ्या कायदेतज्ञांनी केलेले हे विश्लेषण वाचण्यासारखे आहे. त्यातून अनेक खाचाखोचा कळतायेत. बहुतेक जणांनी मॅनाफोर्ट्/गेटस पेक्षाही पापादोपूलोस चा दोषी कबुलीजबाब जास्त महत्वाचा आहे असं लिहिलं आहे.
https://www.politico.com/magazine/story/2017/10/30/where-is-bob-mueller-...

मी न्यूज आल्यावर आधी फॉक्स लावला होता तिथे 'हे आरोप काही खास नाहीत, सिरीयस नाहीत, इलेक्शनशी संबंध नाही, ट्रम्प ला तर देणं नाही नी घेणं नाही' असा सूर लागला होता.
तेच सीएनएन ला स्विच केलं तर फुल शतकांनंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट असा घरचं कार्य असल्यासारखा उत्साह होता. मला दोन वेगळ्या समांतर विश्वात जगत असल्याचा भास झाला!

शतकांनंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट >>> Lol
टिपिकल आहे हे. त्यांनी कोमीच्या टेस्टिमोनीच्या वेळी पण असेच मोठे सेलिब्रेशन सुरु केले होते.

पापादोपूलोस च्या मदतीने मोठे मासे गळाला लागतात का हे येत्या काही दिवसात समजेलच. म्युलर टिमची पुढची तयारी झालेली असेलच.

मस्त. मी हे फॉलो करते आहे. आता ह्यावरून जनतेचे लक्ष हटावे व देश प्रेमाचा सामुदायिक झटका यावा म्हणून कुठेतरी रँडम बाँबिंग करणार. नेहमीचेच आहे. सी एन एन वर अगदी अगदी...

कालपासून स्पेशल प्रॉसीक्युटरची वेबसाईट सुरु झाली आहे. आणि या बाबतचे सगळे अधिकृत आणि सार्वजनिक कागदपत्र तिथे उपलब्धआहेत,/
https://www.justice.gov/sco

अजून खूप डीटेल्स पाहिले नाहीत त्यामुळे खूप माहिती नाही. पण वरकरणी ट्रम्प चा संबंध अजून थेट दिसत नाही. कारण या घडामोडी २००६ ते २०१५ आहेत. अजून काही असेल तर कल्पना नाही.

वरती सनव यांनी लिहीलेली मीडिया रिअ‍ॅक्शन परफेक्ट आहे Lol कायम असेच चित्र असते आजकाल