यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे

बनेशच्या जिगरी दोस्त शरद शास्त्रीने म्हटलेली ही ओळ ह्या चित्रपटालाही तन्तोतन्त लागू पडते. मुळात फास्टर फेणेची कथा चित्रपट स्वरूपात मान्डणे हे मोठे धाडसाचे काम आहे. धाडसाचे अश्यासाठी की मध्यम वयीन आणि सत्तर ऐशीच्या दशकातील पिढीच्या डोळ्या मनात फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा ठसलेली आहे त्यामुळे त्या व्यक्तीरेखेला जरा जरी धक्का लागला तरी हा प्रयोग फसण्याची भिती होती. तसेच हॅरी पॉटर च्या जमानातल्या नव्या पिढीला फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा तितकीशी माहीत नाही. त्यामुळे ही व्यक्तीरेखा चित्रपटात उभी करणे हे मोठे धाडसाचे काम होते. तसेच दिवाळीच्या सुटीत येणारा ह्या चित्रपटाला बच्चे कम्पनीची हजेरी लागण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे हा चित्रपट कितपत चालेल आणि मुळात आपल्या मनातल्या फास्ट फास्टर फास्टेस्ट व्यक्तीरेखेला चित्रपट स्वरुपात कितपत बघवेल ही साशन्कता मनात होती पण लेखक दिग्दर्शक द्वयीने ही जवाबदारी यशस्वी रित्या पेलली आहे.

जुन्या काळातला फास्टर फेणे हा नविन रुपात सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये सध्याच्या तन्त्रज्ञानची जोड देण्यात आलेली आहे. गुगल मॅप, जी पी आर एस, फेसबूक एथिकल हॅकीन्ग ह्या सन्कल्पनान्चा पुरेपूर वापर या चितत्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये नविन पिढीलाही आकर्षीत करण्यात आले आहे. उदाहर्णाथ चित्रपटातील खलनायक अप्पा हा नायकाला धमकी देऊन त्याला फेसबुक वर " फीलीन्ग फ्रायटण्ड विथ वन अदर" असे स्टेटस टाक म्हणून सल्ला देतो किन्वा सहकलाकाराने नायकाला सन्कटात सापड्लेले असताना जी पी आर एस ने ट्रॅक करणे ह्या सन्कल्पना भन्नाट वाटतात.

चित्रपटात मुळ गोष्टीतल्या सुभाष, शरद जोशी ह्या महव्ताच्या व्यक्तीरेखा वगळण्यात आल्या आहेत. पण चित्रपटात स्वतः भा रा भागवत (आजोबा) व्यक्तीरेखा आणणे हा ह्या चित्रपटातला यु एस पी आहे. भा रा भागवत त्यान्च्याच पुस्तक रुपी व्यक्तीरेखेला स्वतःच अनुभवतात ही सन्कल्पनाच भन्नाट आहे. आणि ती चित्रपटाला वेगळ्याच उन्चीवर नेते. चित्रपटात अमेय वाघ ह्याने व्यक्तीरेखेसाठी विशेष मेहेनत घेतली आहे. मुळात त्याने शैलेश परुळेकरान्च्या मार्गदर्शनाखाली दहा किलो वजन कमी केले आहे जेणेकरून लहान्पणीचा तुडतुडीत किडकीडीत बनेश हा मोठा झाल्यावर अगदी असाच दिसेल असे प्रेक्षकाना वाटतेही आणि पटतेही. चित्रपटात भुषन उर्फ भु भु, अबोली, आजोबा ह्या मुळ कथेत नसलेल्या व्यक्तीरेखा आणण्यात आल्या आहेत आणि फास्टर फेणेच्या मुळ कथेतल्या काही व्यक्तीरेखा वगळण्यात आल्या आहेत पण त्याने चित्रपटाची कथा कुठेही ठीसूळ होत नाही. ह्या चित्रपटात गाणी नसल्यामूळे प्रेक्षकाला कथेतून बाहेर पडण्यासाठी अजिबात फुरसत मिळत नाही आणि त्यामुळे चित्रपटाचा वेग आणि मोमेन्टो कायम रहातो.

चित्रपटाचा हाय पॉइन्ट आहे तो चित्रपटातला खलनायक अप्पा म्हणजेच गिरीश कुलकर्णी त्यामुळे खलनायका बद्दल मुद्दाम लिहीण्या साठी एक पूर्ण परीछेद खर्च करीत आहे.गिरीश कुलकर्णीला आपण कित्येक व्यक्तीरेखेत पाहीले आणे त्याने स्वतातल्या अभिनेत्याला नटाला अनेकदा सिद्ध केले आहे(विश्वास नसेल तर त्याचे चित्रपट प्रत्यक्ष बघाच आणि प्रचिती घ्या) त्याने खलनायकाची भुमीका बहुदा प्रथमच केलेली आणि ती भुमीका अक्षरशः जगली आहे. रीयल लाईफ मधला खलनायकी छटा असलेली व्यक्तीरेखा कशी असेल हे त्याने चित्रपटात अगदी पुरेपूर उतरवले आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून त्याने ह्या व्यतीरेखेचे बारकावे अगदी सहज दर्शवले आहे. त्याचे हसणे, त्याचे बोलणे, त्याची थण्ड भेदक नजर, त्याची सन्वाद फेक सर्वच लाजवाब आहे. अतिशयोक्ती नाही पण गिरीशच्या अभिनयामुळे, पटकथेमूळे ही व्यक्तीरेखा नायकालाही डोईजड होते असे म्हणायला हरकत नाही आणि हे विधान अगदी सत्य आहे.

चित्रपटाची कथा मुद्दामच सान्गत नाही आणि त्यामुळे स्पॉईलर अ‍ॅलर्टही देत नाही. हा चित्रपट चित्रपटात जाउन स्वतः अनूभवा हेच सान्गणे. आणि हा चित्रपट खुप खुप चालावा म्हणून अनेकानेक शुभेच्छा.

फास्ट फास्टर फास्टेस्ट

केदार अनन्त साखरदाण्डे
दिनान्क ३१/१०/२०१७

विषय: 
प्रकार: 

चित्रपटाचा हाय पॉइन्ट आहे तो चित्रपटातला खलनायक अप्पा म्हणजेच गिरीश कुलकर्णी त्यामुळे खलनायका बद्दल मुद्दाम लिहीण्या साठी एक पूर्ण परीछेद खर्च करीत आहे>>>>
+++१११
हे चांगल केलात
परीक्षण आवडले

+++१११ Happy