हात नगा लाऊ त्याचा गाडीला

Posted
11 months ago
शेवटचा प्रतिसाद
11 months ago
Time to
read
<1’

संजयचा बाप्यानी युपीचा या भैयानी
मुम्बई ही काढली विकरीला
हात नगा लाऊ त्याचा गाडीला

निरूपम हा चाले कसा तोर्या ने
पैसे ओढितो हा कसा खोर्या ने
भाउ लोकाना घाली पाठीला
हात नगा लाऊ त्याचा गाडीला

घालतो हा छटपूजा कशी जोमात
मनसैनिक येता जाईल कोमात
त्यानी याचा मिशीचा केस का हो ओढिला
हात नगा लाऊ त्याचा गाडीला

लाज थोडी ठेव राहतया जागेची
माज नको करु खात्या अन्ना ची
मुम्बई हया नगरीने तुला का ग पोशिला
हात नगा लाऊ त्याचा गाडीला

केदार

30/10/2017

विषय: 
प्रकार: 

दुखती रग, पण मुंबईकर आधी चुकचुकणार, मग म्हणणार की आधी बरे होते ट्रेन मधून उतरल्यावर लगेच 2 मिनिटांमध्ये भाजी/वस्तू घेता येत होती, आता वाट वाकडी करून मंडई/दुकानात जावे लागते.

छान आहे,

दुखती रग, पण मुंबईकर आधी चुकचुकणार, मग म्हणणार की आधी बरे होते ट्रेन मधून उतरल्यावर लगेच 2 मिनिटांमध्ये भाजी/वस्तू घेता येत होती, आता वाट वाकडी करून मंडई/दुकानात जावे लागते. >>> हे ही खरे आहे

खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी.
पहिलं कडवं मीटर मध्ये बसायला तिसर्‍या ओळित ५ अक्षरे कमी पड्लीत Proud
चालित म्हणताना चांगलीच ठेचकाळले तिथे, बाकी उत्तम.