"राजगड पहिला पावसात भिजताना"

Submitted by राहुल सलगर on 29 October, 2017 - 10:50

"राजगड पहिला पावसात भिजताना"
वेळ मिळत नव्हता म्हणून लेख लिहायला थोडा उशिरच झाला . कसाबसा वेळात वेळ काढून तो पूर्ण केला.
तशी राजगड ट्रेक ची माझी ३ री वेळ. २ वेळा वाट पाली गावातून ठरवण्यात आली होती म्हणजे पाली दरवाज्यातून पण यावेळेस वाट थोडी बिकट आणि अंगावर शहारे आणणारी होती ती म्हणजे "चोर वाट". गुंजवणे गावातून या चोर वाटेला सुरुवात होते. पुण्यापासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजवणे येण्याच्या अनेक वाटा आहेत. कात्रज घाट - सातारा रोड मार्गे जाण्याचे ठरवण्यात आले कारण पेब घाटमार्गे जर ठरवले असते तर खूप उशीर झाला असता कारण आधीच खूप उशीर झाला होता . सकाळी ८.३० ला आमच्या बाइक्स तयार झाल्या होत्या. ट्रेकर्स ची संख्या बघता बघता १० वरून फक्त ४ वर आली . सकाळी पाऊस हि नव्हता क्षणाचाही विलंब न करता आम्ही राजगडाच्या दिशेने निघालो ..
IMG_20170730_132002.jpgIMG_20170730_131930.jpgIMG_20170730_143545.jpg

गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून गौरवलेला आणि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी , चारही बाजूने पसरलेला प्रचंड विस्तार , बालेकिल्ला च्या प्रचंड उंचीने ढगांशी गोष्टी करणारा राजगड आजही स्वपराक्रमाच्या कथा व शिवपराक्रमाच्या गाथा सांगत ताठ मानेने उभा आहे. जवळ जवळ २७ वर्षे महाराज इथे राहिले होते . प्रचंड धबधबे, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहणारी ती लालबंद माती , भक्कम अशी सुवेळा आणि संजीवनी माची आजही महाराज इथे आहेत याची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्याचे मी वर्णन तरी कसे करू? काय या किल्याची उंची , काय त्याचा विस्तार जणू काही आकाशच पसरले आहे . त्याचे उंचच उंच टोक पाहून छाती धडधडते.

३ तास चालून झाल्यावर चोर दरवाज्याजवळ आम्ही पोहोचलो . एक छोटासा भुयारी मार्ग असल्यासाखं ती चोर वाट होती . गडावर पोह्चल्याच क्षणी चहा बिस्कीट वर ताव मारला . थोडा आराम करून आम्ही निघालो site seeing साठी ... अबबब काय गडाची उंची , काय तोच सुसाट वारा , घनदाट जंगल हे सगळं दृश्य बघून स्वर्गातच आलोय असं वाटत होत. बाले किल्ला तर पूर्ण पने ढगात गेला होता होता काहीच दिसत नव्हता. अजून आम्हाला बालेकिल्ला ट्रेक हि करायचा होता त्यासाठी अजून अजून १ - २ तास लागणार होता कारण वाट खूप अवघड आणि छोटी होती. वरून खाली उतरणारे ट्रेकर्स पण त्याच वाटेने खाली उतरत होते . पावसानेही हजेरी लावायला सुरुवात केली उत्साह वाढत चालला होता. बरोबर एकतासाने आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो काहीच दिसत नव्हते जर तुम्ही उन्हाळ्यात आलात तर तुम्हाला रायगड , सिह्गड ,तोरणा असे अनेक किल्ले स्पष्ट दिसतात .

ट्रेक ला आलेल्या ट्रेकर्स ची संख्या हि खूप होती .. जागा शोधून बाइक्स पार्क करण्यात आल्या . पुन्हा एकदा बॅग्स तपासण्यात आले. पाणी किती आहे , खायचे सामान किती आहे, सगळं बरोबर आहे ना या गोष्टी झाल्या. ट्रेक स्टार्ट होताच चिखलाने आमच्या पायावर घाव घालण्यात सुरुवात केली . लाल माती आणि पावसामुळे झालेला चिखल पाय पूर्ण आत रुतत होता . मनात च विचार करत होतो "वाट लागणार आहे आज". ४ महिन्याआधी माझ्या गुडघ्याला लिगामेंट इंज्युरी झाली होती त्याचीच भीती मनात होती . कारण ट्रेक खूप अवघड होता . तशी मी माझी स्पीड कमीच ठेवली माझे सहकारी पुढे जाऊन माझी वाट बघत थांबत होते.

ट्रेक च्या अर्ध्या तासातच धमछाक होत होता. आणि माझ्या साठी चिखलात चालणे तर एक challenge च होता. २ मोठं मोठ्या टेकढ्या पार करून झाल्यावर थोडा रेस्ट घेण्यात आला . आणि बगतो तर काय अजून बराच ट्रेक बाकी होता आता फक्त रॉक patch उरले होते एका वेळेस एकाच माणूस जाऊ शकतो असा हा रस्ता . वरून खाली येणाऱ्या ट्रेकर्स हि खूप होते म्हणून रस्ता मधेच जाम ह्यायचा . पूर्णपणे खडी चढाई होती.
३ तास चालून झाल्यावर चोर दरवाज्याजवळ आम्ही पोहोचलो

खरी परीक्षा तर खाली उतरताना होती . धुक्यानी पूर्ण किल्ला झाकून गेला होता. आणि मलाही गुडघ्यामध्ये थोडा त्रास जाणवत होता . हळू हळू रॉक patch उतरून पुन्हा चिखलाच्या वाटेने जाण्यास सुरुवात केली, पायातील बूट चिखलात अडकत होते आणि त्यामुळे पायावर जोर पडत होता .. अजय , विजय, आणि आदित्य ने मिळून मला चांगलाच support केला आणि आम्ही सुखरूप ७.३० वाजता base village ला पोहचलो . खरंच हा अनुभव अतिशय थरार होता . जवळ जवळ ४ दिवस पाय दुखतच होते. थोडा विचार केला जेव्हा महाराजाना पन्हाळगडावरून खाली पालखित आणणारे ते मावळे त्यांची शरीर यष्टी काय असावी .. आम्हाला साधं आमची बॅग घेऊन खाली नीट उतरता येत नव्हता .
"गडांचा राजा राजगड मी पहिला पावसात भिजताना".

लेखन करण्यास खुप मेहनत घेतली आहे. आमची अशी भटकंती आवडल्यास नक्कीच कमेंट करा
धन्यवाद।
राहुल

ट्रेक चा पुर्ण विडिओ : https://www.youtube.com/watch?v=RHq046PsP_w

नक्कीच लाइक आणि subscribe करा।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा सेल्फिचा भडीमार???
एवढ्या जणांनी पुन्हा पुन्हा समजवून ही तोच प्रकार??
Inshort तुम्हाला काही समजवणच चुकीच आहे अस वाटतयं.

"राजगड पहिला पावसात भिजताना">>>
पहिल्या पावसात