कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का? ---- प्रतिक सुर्वे

Submitted by प्र. स. on 27 October, 2017 - 00:47

माझ्या वडिलांचे २०१५ मध्ये निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात मी त्यांचा मुलगा, माझी आई , बहिण व वडिलांच्या ६ बहिणी असे वारस आहोत. वडिलांच्या ६ पैकी ५ बहिणींनी २००९ मध्ये रजिस्टर हक्कसोड पत्र दिले होते.
सध्या मी, आई व माझी बायको असे आम्ही तिघेच आमच्या घरी राहतो. राहते घर हे माझ्या वडिलांनी स्वकष्टाने बांधले आहे त्यामुळे त्यांची १ बहिणीचा त्यामध्ये कोणताही अधिकार नाही. परंतु गावाकडील जमिनी मध्ये तीचे नाव व आमचची ३ नावे (मी, आई, माझी बहिण) लागली आहेत. माझ्या बहिणीचे आत्ताच लग्न झालेले आहे.
आता माझ्या आईचे माझ्या बरोबर तसेच माझ्या बायको बरोबर वागणे खूपच विचित्र आहे. आम्हाला सतत असे वाटते, जसे तिला फक्त सर्व मालमत्ता हवी आहे. आणि ती अशी वागते जसे तिला मुलागा व सुन नाही. कित्येक वेळा छोट्या काही कारणांवरून तिने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलेली आहे. तिच्या अश्या वागण्याने मला आता आमच्या भविष्याची काळजी वाटू लागली आहे. अशा स्तिथीत मी माझे नावावर असलेली गावाकडील जमीन (एकत्रित ) विकू शकतो का ?( फक्त माझा निर्माण होणारा हिस्सा. ) कारण मला आता खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे. व मला असे वाटते त्याचा त्रास माझ्या होणाऱ्या बाळाला सुद्धा होत असेल व भविष्यात ही होईल.
जमिनीचे वर्णन काहीसे खालील प्रमाणे आहे,
एकूण जमीन १० एकर व या जमिनी वरती ७/१२ मध्ये आमच्या चौघांची नावे आहेत. (मी, आई, माझी बहिण, वडिलांची १ बहिण)

कृपया कायदेशीर सल्ला लवकरात लवकर द्यावा ही विनंती कारण हा त्रास खूपच वाढलेला आहे.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गावी आमची एकत्रित जमीन होती ज्यात वडीलांच आणि माझ्या तीन काकांच सातबार्‍याला नाव होत पण वडीलांनी त्यांच्या वाट्याची जमीन विकली होती अर्थात वकीलांचा सल्ला घेऊन सगळा व्यवहार केला .सगळा व्यवहार व्यवस्थित झाला काही प्राॅब्लेम आला नाही
मला वाटत तुम्ही तुमच्या वाट्याची जमीन विकू शकता पण वकीलांशी सल्लामसलत करा