Submitted by अलका_काटदरे on 15 March, 2009 - 02:04
(कविवर्यांची क्षमायाचना करून)
धन मागशी माझ्या सख्या परी
तिजोर्याच रिकाम्या पडती घरी !
आजवरी अलंकार मोडुनि
पैसा पुरविला तुला करांनी
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करी रोष न सखया, कृपा करी !
नोकरीचा एकच रस्ता
आहेत चालू माझ्या खस्ता
पोटपूजेस्तव ही भांडीकुंडी
राखी घरामधि कशीतरी !
पिणे भटकणे पिक्चरला बळी
त्यासाठी सर्वत्र हाती झोळी
विलासाचे मर्म हवे तुज
पैसा ओढण्यापरी रे बळ न करी !
आला रे आला दिन सखया
थकली गात्रे भिवविती र्हदया
आता धनाचे नाव कासया
लागले नेत्र रे निवृत्तीवरी !!
गुलमोहर:
शेअर करा
आम्हांला
आम्हांला ही कविता (मधु मागशी माझ्या सख्या परी) बहुधा दहावी-अकरावीला असणार. त्याच वर्षी विडंबन केलेले.
हल्लीहल्लीच मायबोलीवरील 'मोळीवाली' वरून माझ्या हस्तलिखिताची आठवण झाली.
सभोवती सगळ्या मोळीवाल्या, मोलकरणी, इ. फक्त त्याच काम करतांना दिसायच्या त्यांच्या कुटुंबात, म्हातार्या होईपर्यंत; म्हणून सुचली असणार.
थकली गात्रे भिवविती र्हदया- येथे देणेकरी भिववती र्हदया
लागले नेत्र रे निवृत्तीवरी !!- येथे जप्तीवरी
अशी त्या बालवयात लिहिली होती.
आत्ताही मोलकरणींच्या आयुष्यात खूप काही बदल झाला आहे असे वाटत नाही. त्यांच्या राहणीमानात फरक झालाय; पण कामातून सुटका हवी असते, अशा अर्थी बदल केलाय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..