काळजाशी

Submitted by vilasrao on 9 October, 2017 - 16:23

जपले एवढे मी घाव काळजाशी
वसले वेदनेचे गाव काळजाशी

यंत्रासारखे वागाव रोज वाटे
ठिक ठिक फक्त ते सांगाव काळजाशी

ज्यांचा रे भरोसा बेइमान झाले
समजेना किती समजाव काळजाशी

शिकलो हेच बाजारात मी जगाच्या
करता येत नाही भाव काळजाशी

शाश्वत काय नश्वर काय ते असूदे
खोटे की खरे शोधाव काळजाशी

जेव्हा वाटते भुलल्यापरी मला मी
घेतो मग जरासा ठाव काळजाशी! ंंं

विलास खाडे

Group content visibility: 
Use group defaults