बडबडगीत

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 October, 2017 - 03:54

बडबडगीत

खुळखुळ खुळखुळ खुळखुळा
हसवतो कसा रडणाऱ्या बाळा

भिरभिर भिरभिर भिंगरी
बाळ गेले डोंगरी

डोंगरात भेटले वाघ सिंह
बना घोडा बाळ म्हणं

बाळ बसले पाठीवर
फिरून आले जंगलभर

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults