'कासव'च्या खेळांचं वेळापत्रक

Submitted by चिनूक्स on 7 October, 2017 - 01:58

'कासव' हा राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवलेला चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.

या चित्रपटांच्या खेळांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

१. सिटीप्राईड, कोथरुड - स. ११.४५ आणि संध्या. ६.३०
२. सिटीप्राईड अभिरुची - दु. १२ आणि संध्या. ६
३. सिटीप्राईड, सातारा रस्ता - संध्या. ६
४. सिटीप्राईड आर डेक्कन - स. ११, दु. ३.४५ आणि संध्या. ७.४५
५. सिटीप्राईड मंगला - दु. १.१५
६. सिटीप्राईड रॉयल सिनेमाज, रहाटणी - दु. १.४५, संध्या. ६, रात्री १०.१५
७. किबे लक्ष्मी - रात्री ९

८. सिटीलाईट, माहीम - दु. ३

९. रिगल, अकोला - संध्या. ६

१०. अलंकार, नागपूर - संध्या. ६

११. महालक्ष्मी, नाशिक - रात्री ९

या आठवड्यात अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि अगोदर प्रदर्शित झालेले चित्रपटही होतेच, त्यामुळे 'कासव'ला मुंबईत चित्रपटगृह मिळू शकलं नाही. पुढच्या आठवड्यात मुंबईत अधिक खेळ असतील, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

'कासव'च्या प्रीमियरला काही मायबोलीकर उपस्थित होते. चित्रपट पाहून त्यांनी त्याबद्दल मायबोलीवर लिहिलं आहे.

चित्रपटातले संवाद मराठीत असले, तरी सबटायटल आहेत, शिवाय चित्रपटाचा विषय मराठी आणि महाराष्ट्र यांच्यापुरता मर्यादित नाही. तेव्हा तुमच्या परिचयातल्या अमराठी प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दल सांगण्यास हरकत नाही.

'कासव' पाहा, परीक्षणं वाचा आणि लिहा, ही विनंती.

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम-प्रायोजक आहेत.

poster01c.png
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिनुक्स.
हे वाचलं नव्ह्तं. म्हणून त्या धाग्यावर विचारलं.

मॅगी,
आज ११३०चा खेळ होता, उद्या ११.४५ला आहे. बदल केला आहे.
सिटीप्राईड रहाटणीला दोन खेळ वाढले आहेत.

'कासव'ला मिळणारा प्रतिसाद बघून चित्रपटगृहांकडून खेळ वाढवून मिळाले आहेत.

येस , आमच्याइथे रहाटणीला ३ खेळ आहेत , आज परत बायकोला घेऊन १:४५ ला जाणार आहे Happy
सगळ्या मित्रानाही सांगितलय , अप्रतिम चित्रपट चुकवू नकाच Happy

कालच संध्याकाळी सिटीप्राईड कोथरुड ला पाहिला. आवडला हे वेगळे सांगायची गरजच नाही. सुमित्रा भावे सुनिल सुकथनकर म्हणजे सिनेमा अप्रतिमच असणार.

त्यांना सांगा की पुढचा चित्रपट मुंगी असा काढा. मी हे गंमत म्हणून म्हणत नाही. वर्कहोलिक लोकांवर एखादा सिनेमा हवा.

बंगळूरला 'कासव' येण्याची शक्यता आहे का?

अवांतर:-

Tata sky वर showcase म्हणून जी channels असतात त्यात मराठी ( कुठलेच प्रादेशिक भाषांमधील ) चित्रपट नसतात. असं का?

आज कोथरुडच्या सिटीप्राईड चित्रपटगृहात संध्याकाळी ६३० आणि ६४५ असे दोन खेळ आहेत.

उद्यापासून आर डेक्कनला सकाळी ११ वाजता जादा खेळ आहे.