कर वस्तूवर कर सेवेवर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

(कर वस्तूवर कर सेवेकर सध्याच्या वस्तूसेवा करावर एक भाष्य)

कर वस्तून्वर कर सेवेवर
कर भरणा कर करदात्या रे करदात्या

अधिया येतील बदल सुचवतील
क्षणोक्षणी ते गॅजेट निघतील
कर भरणा कर करदात्या रे करदात्या

उठता बसता दर बदलतील
मिळेल कधी का परतावा
कर भरणा कर करदात्या रे करदात्या

साईट चालतील नाईट मारतील
भर विवरण(पत्र) (लेखा) परीक्षका
कर भरणा कर करदात्या रे करदात्या

कर (हात) डोक्यावर कर (हात) पाठीवर
कर भरणा कर करदात्या रे करदात्या

सीए केदार अनन्त साखरदान्डे
दिनान्क ०७/१०/२०१७

विषय: 
प्रकार: