गटग (झक्की - मुंबईकर भरत भेट )

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अखंड महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले श्री झक्की हे लवकरच मुंबईत येणार येणार अशी आवई काही दिवस मुंबईतल्या काही बा फ वर उठत होती. विशेषतः पुणा दौरा गाजवून आलेले श्री झक्की हे प्रत्यक्षात कशे असतील असे कुतुहल बर्‍याच मुंबईकर मायबोलीकरांच्या मनात होते. आपले मुंबईतले मायबोलीकर चि. कुलदीप ह्यांना दिनांक १४/०३/२००९ रोजी श्री झक्की हे ठाण्यात असतील अशी खबर लागली आणि त्यांनी ती तात्काळ व्यवस्थापक श्री इंद्रा ह्यांच्याकडे पोहोचवली. इंद्रदेवांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून ती खबर समस्त मायबोलीकरांकडे पोहोचवली आणि श्री झक्की ह्यांना भेटण्याची सुवर्ण संधी आम्हा मायबोलीकरांना उपलब्ध झाली.
.
ठीक संध्याकाळी ६.४० वाजता मी गटग चे ठीकाण गडकरी रंगायतन ठाणे येथे पोहोचता झालो. प्रवेशद्वारापाशी आल्यावर स्कॅनींग मशीन बघून श्री झक्कीना भेटण्यासाठी किती ही तपासणी असे आश्चर्य करत आत प्रवेश करते झालो. मशीन बिचार मूग गिळून गप्प राहील. आत पोहोचल्यावर एक घोळका दिसला. जरा जवळ जाऊन पाहील्यावर श्री घारु अण्णा, चेतना, नील-वेद, आनंद अशी ओळखीची मंडळी दिसली. ही सर्व मंडळी चक्राकार उभी असल्याने आत (म्हणजे चक्राच्या आत) श्री झक्की असतील अशी मनात आशा पल्लवीत झाली. पण चक्रात कुणीच नव्हत. त्यामूळे थोडासा हीरेमोड झाला.तेवढ्यावेळात चि. कुलदीप, अमर कुलकर्णी, किशोर मुंढे अश्या माझ्यासाठी नविन मायबोलीकरांशी ओळख झाली. त्या तिघा नवोदितांच्या डोळ्यात मला पाहून ' श्री झक्की' ते हेच असा भाव दिसला. पण मी तात्काळ 'तो मी नव्हेच' असा खुलासा केला. आणि त्यांना तो पटल्यासारखा दिसला. इतक्यात समोरच्या रस्त्यावर एक गृहस्थ दिसले. हेच 'श्री झक्की' अशी बहुतेक मा बो करांची समजूत झाली. आणिक दोन तीन गॄहस्थांना पाहून असाच काहीसा समज मा बो करांचा झाला. मीराबाईंना जसा प्रत्येक ठीकाणी कॄष्ण दिसत होता अगदी तसाच भ्रम मा बो करांना होऊन त्यांना प्रत्येक मध्यमवयीन मनुष्याच्या चेहेर्‍यात श्री झक्की दिसत होते.
.
साधारण सातच्या सुमारास श्री झक्की आज येणार का नाही अशी चर्चा मायबोलीकरांमध्ये चालू असताना एक टोपी वाले गृहस्थ येताना दिसले. त्यांनी टोपी घातली असल्यामूळे ते झक्की नसावेत असा बहुतेक मा बो करांचा समज झाला. पण मा बो करांच्या अगदी निकट येऊन त्यांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि समस्त मायबोलीकरांना श्री झक्की ह्यांचे दर्शन झाले. पुण्यातील वाडेश्वराचा अनूभव लक्षात घेऊन मा बो करांनी कोपर्‍यातील एक टेबल निवडून त्याभोवती खूर्च्यांचा फेर धरला. मग श्री घारु अण्णा आणि श्री झक्की ह्यांच्यात 'विचारा तुम्ही सांगतो आम्ही' असा खेळ रंगला. घारु अण्णांच्या प्रत्येक सवालाला श्री झक्की ऐका..... असे म्हणून अगदी खुसखुशीत जवाब देत होते. कुण्या एका नादान मायबोलीकराने त्यांना तुम्ही अमेरीकेत कधी आणि कसे गेलात असा प्रश्न विचारला आणि श्री झक्की ह्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि त्याहून दीर्घ असा उछ्श्वास सोडला. आता श्री झक्की हे अमेरीकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून अगदी बोस्टन टी पार्टी पासून सांगायला सुरूवात करणार की काय अशी भिती काही जुन्या जाणत्या मा बो करांच्या मनात उभी राहीली पण श्री. झक्की ह्यांनी १९६० सालापासून आपले 'दादरचे दिवस' पासूनची हकीकत सांगायला सुरूवात केल्यावर बर्‍याच माबो करांनी (आधी श्री झक्की ह्यांनी उत्तर देताना जितका दीर्घ उछ्श्वास सोडला होता त्याही पेक्षा दीर्घ असा ) निश्वास सोडला. कुणीतरी झक्कींच्या लग्नाला किती वर्ष झाली असा 'कळीचा' प्रश्न उपस्थीत केल्यावर श्री झक्की ह्यांनी नकळतपणे जेंव्हापासून कळायला लागलय तेंव्हापासून ती स्त्री माझी पत्नी आहे असे सांगीतले. आणि वर हे माझ्या पत्नीला सांगू नका अशी कळकळीची विनंती केली. मध्येच श्री झक्कींना ३-४ फोन येउन गेले. त्यांनी ते प्रश्नकर्त्यांचे नसून घरन होते असा तात्काळ खुलासा केला.
.
तितक्यातच कुणाला तरी खान पान (संकष्टी होती आज ) करण्याची आठवण झाली आणि लागलीच घारु अण्णांनी आज काय मिळेल अशी पृच्छा केली. थांबक्याने (वेटरने) मिसळ , कटलेट आणि बटाट वडा असा तीहेरी मेनू सादर केल्यावर, घारुअण्णांनी मिसळ आणि कटलेटवर फुली मारली. मग बटाट वड्याची ऑर्डर एकट्या घारुअण्णांनी सर्वानूमते दिली (अनूमती दिली म्हणजे काय द्यावीच लागली). तसेच थांबक्याला बटाट वड्याबरोबर लाल चटणी वेगळी आण अशी मौलिक सुचना केली. ती ऐकून 'येथे बहुदा चटणी ही बटाट वड्याच्या आतच घालून देत असावेत' अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली पण मी त्या पालीला 'त्या काव्य झुरळांसारखच' उडवून लावल. श्री घारु अण्णा, किशोर आणि अमर ह्यांचा उपवास असल्यामूळे त्यांनी 'रफल्स लेज' ची ऑर्डर दिली आणि ते खातखातच 'लेज' उपवासाला चालते का नाही अशी गहन चर्चा केली. बटाट वड्यांची ऑर्डर देताच चि. रीना हीने प्रवेश केला आणि ती लांबूनच मायबोलीकरांशी बोलत आली. आणखी थोडी जवळ आल्यावर तीने ती मायबोली करांशी बोलत नसून प्रत्यक्षात तिच्या 'तिकडच्या होणार्‍या स्वारींशी' बोलत होती असा खुलासा केला आणि थोडासा लाजल्याचा अभिनय करून आपल लग्न ठरल्याची बातमी दिली. हे कळताच घारु अण्णांनी तात्काळ तिला संसार उपयोगी असे काही सल्ले दिले. ते तीने निमूटपणे ऐकून घेतले. इतक्यात श्री झक्कींना तिची दया येऊन त्यांनी लागलीच हजेरी बूक काढून सगळ्यांची हजेरी (कागदावर) घेतली. चि. कुलदीप ह्याने आपले नाव मराठीत लिहीण्यास असामर्थ्य दर्शवल्यावर आता बहुदा त्याला अंगठे (स्वतःच्या पायाचे ) धरुन उभे रहावे लागते असे आम्हास वाटले. पण श्री झक्की ह्यांनी 'शेम शेम' असे म्हणून केवळ शाब्दिक मार चि. कुलदीप ह्याला दिला. चहापान झाल्यावर मी माझ्या साखरपुड्याची बर्फी सगळ्यांना वाटली. तेंव्हा चि. रीना हीच्या होऊ घातलेल्या साखरपूड्याची बर्फी आताच का वाटली जातेय अशी कुत्सीत विचारणा काही मा.बो करांनी केली आणि ती माझ्या सा.पु ची बर्फी आहे असे कळल्यावर माझे अभिनंदन केले आणि मला शुभेच्छा दिल्या.
.
चित्रपटाच्या शेवटाला जसा पाहुणा कलाकार प्रवेश करतो (आठवा लगे रहो मुन्ना भाई मधला अभिषेक बच्चन) अगदी तसाच प्रवेश 'धुम स्टाईल मध्ये किरू ह्याने केला आणि ' लिंबू टींबू नाम तो सुना होगा' असा धोबी पछाड श्री झक्की ह्यांना टाकला. पण श्री झक्की ह्यांनी अनेक पावसाळे पाहीले असल्यामूळे त्यांनी किरु ला तात्काळ ओळखले. ग ट ग च्या शेवटी घारु अण्णा ह्यांई प्रत्येक मा बो करा करून ५० रुपये टोल वसूल केला. काही इरसाल मायबोलीकरांनी हे 'श्री झक्की ह्यांना भेटण्याचे तिकीट आहे का काय?' अशीही विचारणा केली. पण घारु अण्णांनी त्याकडे दूर्लक्ष केले. कार्यक्रमाच्या शेवटी चि. रीना हीने आपल्या 'तिकडच्या स्वारींशी' समस्त मा बो करांची ओळख करुन दिली. निघताना श्री झक्की ह्यांनी 'बराक ओबामा' ह्यांच्या वतीने समस्त माबो करांना अमेरीकेला यायचे जाहीर आमंत्रण दिले. आणि माबो करांनी आता पासपोर्ट काढायला हरकत नाही असे म्हणून ते आमंत्रण हसत हसत स्वीकारले. तर असा हा गटग नेहेमीसारख्या उत्साहात हसत खेळत, एकमेकांना कोपर खळ्या मारत यशस्वी रीत्या पार पडला.
ग ट ग ला उपस्थीत राहून तो यशस्वी करणार्‍या मा बो करांना खुप खुप धन्यवाद

समाप्त

विषय: 
प्रकार: 

तर मंडळी अन् केदारबुवा, (नविन थ्रेड न काढता) इथच मी माझा अन् झक्कींमधला मूक संवाद टिपायचा प्रयत्न करीन! (थोडा वेळ लागेल ह्याला) >>>>
अवश्य अवश्य. फक्त पुढल्या ग ट ग व्हायच्या आधी टाक Wink Light 1

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

छान. Happy
पार्ल्यातही होणार आहे का संम्मेलन? केव्हा?

झालं पार्ल्यातलं गटग...

श्री झक्की ह्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि त्याहून दीर्घ असा उछ्श्वास सोडला.

>>>

हे काय? इनपुट पेक्षा ऑउट्पुट जास्त कसे असेल? मग ही जादाची हवा कुठून आली? Uhoh

>>>>> मग ही जादाची हवा कुठून आली?
च्यामारी............. (थयथयाट करणारा चेहरा)
हुडा,उच्छ्वास सोडला म्हणजे नाकानेच ना? मग ढेकरेतून जादाचि हवा आली असेल!
(येवढे कसे कळत नाही तुला??? नाही नाही त्या शन्का घेतो????? Proud )
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

रॉबीन , लिंबू दा Rofl
.
हे काय? इनपुट पेक्षा ऑउट्पुट जास्त कसे असेल? मग ही जादाची हवा कुठून आली? >>>
तो जादाचा पुण्यातल्या भेटीतला उरलेला होता Lol

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अखंड महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले श्री झक्की >> झक्की शिर्डीला साईबाबांना भेटायला केव्हा येताय मग? वाटेत आमचे श्रीरामपूर नावाचे गाव लागते. तुमच्या भेटीचा अलभ्य लाभ आम्हालाही घेता येईन.

निल, माझा फुटु कुठय?
बर्फी छान होती. वडा चांगला असेलच
आमचा उपास असल्या मुळे आणि
लेज सोडुन उपासाचे
(लेज हा उपासाचा पदार्थ आहे की नाही ह्या वर घारुअण्णांचे अद्याप संशोधन चालु आहे) पदार्थ शिल्लक नसल्या मुळे आम्हा उपासकर्याचा (उपासकर्त्यांचा) वडा झाला.
असो, झक्कास झाली झक्कींची भरत भेट आता परत परत त्यांच्या भारत भेटीची वाट पहात आहोत.

************
आपला अमर..... Happy

खुसखुशीत !!
आम्ही मिसलं हे ऐवऐठी .. Sad आणि बटाटेवडे सुद्धा .... Sad

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

मे महिन्यात जर्सीमध्ये असताना झक्कींची भेट थोडक्यात हुकवली होती मी... Sad त्यांनी स्वतःहून भेटूया असे आमंत्रण देऊनही... Sad बघुया आता कधी भेट होतेय ते... Happy

बाकी गडकरीच्या कॅन्टीनला ब.व. पेक्षा कांदाभजी चांगली असते. कधीकाळी पडीक असायचो तिथे दररोज संध्याकाळी... Happy

Pages