कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

Submitted by अनिरुद्ध on 6 October, 2017 - 07:30

गाभा:
माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !

१) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स
मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सांगितलेले नसल्यामुळे हा आता पेचात पडला आहे.त्यांच्याकडे तक्रार करून पण काही उपयोग होत नाहीये.या केस मध्ये सेबी कडे तक्रारीत करून काही फायदा होऊ शकेल का?गेलेले ब्रोकरेज वजा करून उरलेले पैसे मिळू शकतील का ?

२)याच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या "एका महिन्यात दुप्पट" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला! यांच्याकडे याचे document वगैरे काही नाही फक्त एका महिन्यात दुप्पट चा whatsapp मेसेज,त्यावरील यांचे chat आणि त्याची ५ हजार फी भरल्याची नेट बँकिंग ची रिसीट आहे. या बळावर सायबर complaint करू शकतो का?काही फायदा होईल का?

सर्वांचे धन्यवाद , आपल्या सल्ल्या च्या प्रतीक्षेत !

Group content visibility: 
Use group defaults

याच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या "एका महिन्यात दुप्पट" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला>>>
पासवर्ड शेअर केल्यावर काहिच करु शकत नाही. हॅक वगैरे प्रकार असता तर तक्रार करता आलि असति. हे तर असं झालं की चोराने 'मी तुमच्या तिजोरीत पैसे ठवतो' असं सांगितल्यावर तिजोरीची किल्ली त्याच्या हातात देण्यासारखं आहे..

for :१)
५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज चा slab ?? कोनता ब्रोकेर हो ?
high turnover करयचा असेल तर झिरोधा चालला असता ना....
ऍडव्हान्स ब्रोकरेज परत मिलत नसतात...
पर्यायः१ विसरुन जा...
पर्याय२: small brokerage मुळे small exit point असनार.. त्यामुळे high turnover मारुन ०.२०-०.५० पोइन्ट मध्ये ट्रेड exit करुन ऍडव्हान्स ब्रोकरेज वापरुन प्लन संपवा (रिस्कि आहे)

For २): सेबी registered असला तरि क्लायंटचा लॉगिन पासवर्ड मागता येत नाही...
आणि non registered असला तर त्याची अजुन पंचाईत होईल....

first off all take all screenshots of chats, keep all records of emails, ECN, ledgerbook details etc..
Lodge complaint in local police station, & take FIR copy... then go to sebi website... lodge complaint.. or call helpline ... they will guide....... BUT.........
before that call the fraudster .. ask him to pay all loss created by him... if rejected.. then do all above actions on him...
पण एक प्रष्न आहे त्या नॉन सेबी registered माणसाला वैयक्तिकरित्या ओऴखता का? नसाल तर अवघड आहे.... नाव खोटे, नंबर ही खोटे असतत... कंप्लेन्ट झालि कि ते नंबर बंद होतात..
anyways, police can take action on him even if he gave wrong details about him... try it..