हवं होतं...!

Submitted by वैभव जगदाळे. on 4 October, 2017 - 15:40

बेसुर माझ्या गीतांना तुझ्या प्रीतीचा सुर हवा होता....
आठवणींना माझ्या तुझ्या सहवासाचा एखादा क्षण हवा होता ...

हवा होता माझ्या निरर्थक शब्दांना तुझ्या भावनांचा अर्थ...
हवा होता माझ्या अश्रूंना तुझ्या सहानुभूतीचा स्पर्श....

तुझी वाट पाहणार्या डोळ्यांना हवी होती तुझ्या येण्याची चाहुल...
आयुष्याच्या वाटेवर हवं होतं तुझ्या सोबतीने एखादं पाऊल....

खूप काही हवं होतं पण नियतीने सारच नेलं....
मी तरी काय करणार जर तुच मला मान्य नाही केलं...

फार काही नको तुझ्या नजरेचा एखादा प्रेमळ कटाक्ष देऊन जा...
मग आनंदाने सांगेन मी देवाला आता माझी नजरही घेऊन जा....

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच, खुप छान

तुझी वाट पाहणार्या डोळ्यांना हवी होती तुझ्या येण्याची चाहुल...
आयुष्याच्या वाटेवर हवं होतं तुझ्या सोबतीने एखादं पाऊल.... >>> अहाहा ,.सुंदर

छान आणि सुंदर रचना! आवडली. Happy
खूप काही हवं होतं पण नियतीने सारच नेलं....
मी तरी काय करणार जर तुच मला मान्य नाही केलं...
>>
"मी तरी काय करणार कारण तुच मला नाकारलं...."
हा बदल केलांत तर ह्या दोन ओळी जास्त सहज वाचल्या जातील. शेवटी अधिकार आपला. गैरसमज नसावा.

धन्यवाद VB
&
धन्यवाद राहुल
तुम्ही जी गोष्ट सुचवलीय तीचा आदरच आहे. गैरसमजाचे काही कारण नाही. अशाच सुचना वारंवार येउद्या त्या स्वागतार्ह आहेत...

तुझी वाट पाहणार्या डोळ्यांना हवी होती तुझ्या येण्याची चाहुल...
आयुष्याच्या वाटेवर हवं होतं तुझ्या सोबतीने एखादं पाऊल....
>>> जबरदस्त लिहिलय.
प्रत्येक ओळ मनाला भावली Happy