उंच नेतो, खेचतो खाली झुला

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2017 - 00:31

भेटते आहे नव्याने मी मला
एकदा परके समजल्यावर तुला

आपले म्हणतो कधी दुर्लक्षितो
उंच नेतो, खेचतो खाली झुला

ती.. तिची दुनिया.. तिचा सच्चेपणा !
माहिती नाही कुठे नेइल तिला

तो तुला उचलून नाही घ्यायचा
चमकता बाजार भवताली खुला

एवढ्यासाठीच बसते शांत मी
त्याविणा पर्याय नाही राहिला

शेवटी होणार त्याला उपरती
एकदाचे गमवल्यावरती तिला

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users