कुणीतरी मोहरुन जावे

Submitted by कुणी दिवाणा on 30 September, 2017 - 07:05

वा-दळात एकटीच दोघे सोसाट्याचे वारे होते
एकेकांना झेलायाचे किती इरादे न्यारे होते

आणीक बाका तुझा इरादा खिंडीत गोठवण्याचा होता
मीच एकटा बाकी होतो तुझ्याकडेला सारे होते

डावपेच ते शिवाशिवीचे लपवाछपवी सुसाट होती
तरी तुझे ते तसेच असने नितांत निर्मळ प्यारे होते

असे मला झोंबले तुझे की उनाड गजरे अपार तेही
हळुच डोऴ्यामधुन त्यांनी फास फेकले घारे होते

कितीक रात्रींमधुन आपण खेचखेचुनी आणले इथवर
तुला निरंतर आवडणारे आकाशातील तारे होते

आताकुठे दाटली आभाळे समोर व्रष्टी अजुन आहे
विजा कडाडुनही सरींचे मार्ग कसे अंधारे होते

असे कुणी पाठि लागले की विसावण्याचेही भान नाही
मणामणांचे जरी मनांवर जडाहुनी जड भारे होते

आणि अचानक नभ कोसळले दिवे बिचारी विरुन गेली
कुणीतरी मोहरुन जावे कुणी अता विझणारे होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users